‘जागतिक स्ट्रोक दिन’: कोरोनाकाळात निरोगी राहण्यासाठी माहीत असायलाच हव्यात स्ट्रोकबाबत या गोष्टी

By manali.bagul | Published: October 29, 2020 02:16 PM2020-10-29T14:16:31+5:302020-10-29T14:19:23+5:30

CoronaVirus News & Latest Updates : 'कोविड-19'ने हृदयविकाराचा झटका आणि ‘स्ट्रोक’सारख्या इतर आपत्कालीन आजारांवरही त्याचा परिणाम झाला आहे.

‘World Stroke Day’: What you need to know to stay healthy in covid-19 period | ‘जागतिक स्ट्रोक दिन’: कोरोनाकाळात निरोगी राहण्यासाठी माहीत असायलाच हव्यात स्ट्रोकबाबत या गोष्टी

‘जागतिक स्ट्रोक दिन’: कोरोनाकाळात निरोगी राहण्यासाठी माहीत असायलाच हव्यात स्ट्रोकबाबत या गोष्टी

Next

(Image Credit-Yahoo Canada Style)

- डॉ. तुषार राऊत, सल्लागार, न्यूरॉलॉजी, कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालय

स्ट्रोक हे जगभरातील अनेकांच्या अपंगत्वाचे आणि मृत्यूचेही एक प्रमुख कारण आहे. सध्या ‘कोविड-19’ साथीच्या काळात प्रत्येकाची जीवनशैली बदलली आहे. कोविड हे जगभरातील आरोग्यसेवा यंत्रणेला मिळालेले एक मोठे आव्हान आहे. 'कोविड-19'ने गंभीर आजारी असलेल्या रुग्णांच्या उपचारांवर या आजाराचा परिणाम झाला आहेच, त्याशिवाय हृदयविकाराचा झटका आणि ‘स्ट्रोक’सारख्या इतर आपत्कालीन आजारांवरही त्याचा परिणाम झाला आहे.

‘अमेरिकन मेडिकल असोसिएशन न्यूरॉलॉजी’च्या 2020 मधील जर्नलमध्ये प्रा. अलेक्झांडर ई. यांनी लिहिल्यानुसार, ‘’कोविड-19'मुळे आजारी असलेल्या सुमारे 0.9 टक्के ते 23 टक्के रुग्णांना स्ट्रोक झालेला आहे.’’ स्ट्रोक हा केवळ वृद्धांनाच होतो असे नाही, तर 45 वर्षांपेक्षा कमी वयाच्या अनेक तरुणांनाही होतो. सद्यस्थिती लक्षात घेता, आवश्यक ती काळजी घेणे आणि ‘स्ट्रोक’ची लक्षणे व जोखमीचे घटक वेळेवर ओळखणे हे अधिक महत्वाचे आहे.

वयोमान, उच्च रक्तदाब, मधुमेह, उच्च कोलेस्टरॉल आणि धूम्रपान हे स्ट्रोक होण्यास कारणीभूत असलेले घटक आहेत. हे घटक नसतानाही ‘कोरोना व्हायरस’मुळे एखाद्याला स्ट्रोक होऊ शकतो. एकापेक्षा जास्त आजारांची गुंतागुंत असलेल्या रूग्णांमध्ये ‘कोविड-19’चा संसर्ग अधिक तीव्रपणे होण्याची व त्यामुळे जोखीम वाढण्याची अधिक शक्यता असते.

हर 40 सेकेंड में एक व्यक्ति स्ट्रोक का शिकार

‘कोरोना व्हायरस’ हा केवळ फुफ्फुसांवरच नव्हे, तर हृदय, मूत्रपिंड आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मेंदूवर परिणाम करतो. त्यातून स्ट्रोक होण्याची शक्यता बळावते. या अवस्थेमध्ये शरीरात जास्त प्रमाणात जळजळ होते आणि रक्त गोठण्याची प्रवृत्ती निर्माण होते. यामुळे रक्त अधिक घट्ट होऊन विविध अवयवांना रक्त पुरविणाऱ्या वाहिन्यांमध्ये गुठळी तयार होतात. या गुठळ्या मेंदूच्या दिशेने ढकलल्या गेल्यावर मेंदूला होणारा रक्तपुरवठा बाधित होतो आणि त्यामुळे वेगवेगळ्या तीव्रतेच्या ‘स्ट्रोक’चा त्रास होतो. कोरोनामुळे तसेच, त्यावरील औषधांच्या दुष्परिणामांमुळेही मेंदूमध्ये गुठळ्या तयार होण्याची आणि रक्तस्त्राव होण्याची उदाहरणे आम्ही मुंबईच्या कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयात पाहिली आहेत.

‘’फास्ट’’ या घोषवाक्यातून आपल्याला ‘स्ट्रोक’ची लक्षणे ओळखता येतात (एफ - फेशियल वीकनेस, ए - आर्म वीकनेस, एस – स्लरिंग ऑफ स्पीच आणि टी – टाईम टू रीच हॉस्पिटल अर्जंटली). सध्याची ‘कोविड’ची परिस्थिती पाहता, स्ट्रोकचे उपचार उपलब्ध असणाऱ्या प्रत्येक रुग्णालयात आपत्कालीन परिस्थितीत या रुग्णांना प्राधान्य देण्यासाठी निश्चित योजना आखणे आवश्यक आहे. यामध्ये, ‘कोविड-19’च्या लक्षणांच्या तपासणीसाठी रूग्णांची चाचणी घेणे, ‘कोविड-19 आरटी पीसीआर’ चाचणीसाठी नाकातील द्रवाचे स्वॅबने नमुने घेणे, छातीमध्ये काही लक्षणे आहेत का हे पाहण्यासाठी छातीचा ‘सीटी स्कॅन’ करणे आणि ‘अ‍ॅंजिओग्राम’ने मेंदूचे स्कॅनिंग करून ‘स्ट्रोक’चे निदान करणे यांचा समावेश होतो.

World Stroke Day 2020: 'ही' ४ लक्षणं दिसत असतील तर कधीही उद्भवू शकतो स्ट्रोकचा धोका

संसर्गाची पातळी शोधण्यासाठी आणि रक्ताच्या गुठळ्या होण्याची प्रवृत्ती तपासण्यासाठी रक्ताच्या चाचण्या (कोअॅग्युलेशन प्रोफाईल) करण्याचीही गरज असते. यातून आजाराच्या तीव्रतेची कल्पना येते. मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या धमनीमध्ये गुठळ्या बनतात व त्यामुळे स्ट्रोक होतो. याला ‘इस्केमिक स्ट्रोक’ असे म्हणतात. त्यावर प्रमाणित उपचार करताना गुठळ्या विरघळविणारी औषधे देऊन किंवा गुठळी बाहेर ओढून काढून या धमनीतील रक्तपुरवठा पुन्हा सुरळीत करण्यात येतो.

सावधान! 'ही' ५ लक्षणं असल्यास कोरोना संक्रमणानंतर उद्भवतोय 'लॉन्ग कोविड' चा धोका, रिसर्च 

‘स्ट्रोक’चा झटका आल्यावर पहिला तास (गोल्डन अवर) रुग्णासाठी अत्यंत मौल्यवान असतो. गुंतागुंत होण्याआधीच लक्षणे ओळखणे आणि उपचार सुरू करणे अतिशय आवश्यक असते. उपचार सुरू झाल्यावर सतत देखभाल व आरोग्यविषयक मार्गदर्शक तत्वांचे पालन झाल्यानंतर काही वेळाने ‘कोविड-19’ व ‘स्ट्रोक’सारखी गुंतागुंत झालेल्या रुग्णांची प्रकृती सुधारत असल्याचे दिसून आले आहे. तसेच मृत्युमुखी पडणाऱ्यांची देशातील संख्याही घटल्याचे आढळून आले आहे. ‘टेलिमेडिसीन’मधील प्रगतीमुळे रुग्णांच्या प्रकृतीचा पाठपुरावा आणि त्यांचे पुनर्वसन करण्यात मदत झाली आहे.

Breast Cancer : स्तनाचा कर्करोग जागरूकता! जाणून घ्या काय आहेत लक्षणं आणि कसा होईल प्रभावी उपचार?

जोखीम निर्माण करणाऱ्या घटकांवर कठोर नियंत्रण, योग्य औषधांचा वापर यामुळे पुढील गुंतागुंत टळून रुग्ण लवकर बरा होण्यास मदत होते. दरवर्षी 29 ऑक्टोबरला ‘जागतिक स्ट्रोक दिन’ पाळला जातो. या दिवशी ‘स्ट्रोक’विषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी, ‘स्ट्रोक’च्या रुग्णांना अपंगत्वमुक्त जीवन जगण्यास मदत करण्याचे मी वचन देतो. आपणा सर्वांस ‘स्ट्रोक’च्या जोखमीच्या घटकांची माहिती असणे आवश्यक आहे. तसेच ‘स्ट्रोक’ची काही लक्षणे दिसल्यास आपण तातडीने नजीकच्या रुग्णालयात जाणेही गरजेचे आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: ‘World Stroke Day’: What you need to know to stay healthy in covid-19 period

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app