ऑक्टोबर महिना म्हटलं की, सणासुदीची रांग लागते. दिवाळी चालू होण्याची तयारी सुरू होते. अशा वेळी पाऊस पडला की सगळ्यांचीच पंचाईत होते. कपाटात ठेवलेल्या छत्र्या परत  काढाव्या लागतात. या वर्षी जणू असेच काही तरी आहे. आपले शरीर देखील  ऋतू प्रमाणेच बदलत राहते, म्हणून ऑक्टोबर हा महिना पिंक अवेरनेस महिना (स्तन कर्करोग जागरूकता महिना) म्हणून साजरा केला जातो.

अलीकडे धावपळीच्या जीवनात आजची स्त्री स्वतःकडे दुर्लक्ष करत आली आहे. विशेषतः तीस ते चाळीस वयोगटातील स्त्रिया. स्त्रीमध्ये सर्वाधिक प्रमाणात आढळून येणारा स्तन कॅन्सर आहे. २०१९  मध्ये भारतात  १.५० लाख स्तनाचा कर्क रोगाचे रुग्ण व त्यापैकी ३० हजार योग्य ते उपचार मिळाले गेलेले आहेत. इंडियन काउन्सिल फॉर मेडिकल रिसर्चने(ICMR) नुकताच एक अहवाल प्रकाशित केला आहे. ज्यामध्ये असे म्हटले आहे की 2020 मध्ये कर्करोगाच्या एकूण नवीन रुग्णांची संख्या 17.3 लाखांपर्यंत वाढेल. भारतात स्तनाच्या कर्करोगाचे जगण्याची दर कमी आहेत कारण शोध उशीर झाल्याने होते. शहरातील स्त्रीमध्ये कॅन्सर हे मृत्यूचे सर्वाधिक प्रमाण असून तसेच ग्रामीण भागात दुसऱ्या क्रमांकचे आहे. तसेच तरुण महिलांमध्ये प्रजननक्षम वयोगटात सक्रिय संप्रेरक (Hormonal Imbalance) चढउतारांमुळे स्तनांचा कॅन्सर अधिक असल्याचे जाणवते तर पुरुषामध्ये १% स्तन कॅन्सरचे प्रमाण आहे. स्तनांच्या कॅन्सरला प्रतिबंध करता येत नाही. त्यामुळे आजाराच्या सुरवातीलाच निदान झाले तर त्यावर उपचार करता येतात. प्रत्येक स्त्रीला स्तनांच्या कॅन्सर लक्षणांची माहिती असावी.

लक्षणं

- स्तनांमध्ये गाठ

- स्तनांचा बदललेला आकार

- एक भाग कठीण जाणवणे

- त्वचेच्या पोतामध्ये बदल (संत्र्याची सालीसारखा दिसणे)

- लालसर पणा, पुरळ येणे

- स्तनांग्रंथामधून कोणताही दाब न देता द्रव बाहेर पडणे (Nipple Discharge)

- काखेजवळ सूज, वेदना होणे

प्रत्येक स्त्रीने योग्य सर्जनकडून तपासणी करणे गरजेचे आहे.

स्तनाच्या कॅसरचे तिहेरी मूल्यांकन

१) योग्य सर्जनकडे जाऊन तपासणी करणे (Clinical examination by Qualified  Surgeon)
२)मॅमोग्राफी  (by Qualified Radiologist)
३) बायोप्सी (FNAC, Trucut Biopsy)

उपचार पद्धती

शस्त्रक्रिया आणि किमोथेरपी/ हार्मोनल थेरपी (हिस्टोपँथोलाँजी  रिपोर्टवर आधारित)/रेडिओथेरपी. रुग्णाच्या कर्करोगाच्या टप्प्यावर अवलंबून उपचार करण्याचा निर्णय घेतला जातो.
              
स्तनाचा कर्करोग जागरूकता महिना 2020 थीम

लवकर तपासणी जीवन वाचविण्यात मदत करू शकते. काही स्त्रिया हे सर्व असून सुद्धा न्यूनगंडता बाळगतात व दुसऱ्या किंवा तिसऱ्या टप्यात कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी पोहचतात.  या विषयीआपण सर्वानी न्यूयुगंडता सोडून, या विषयीबाबतीत मोकळेपणाने बोलून, चर्चा करणे आणि स्तनाच्या कॅन्सरची योग्य वेळी योग्य ट्रीटमेंट घेऊन जीवन गुणवत्ता अथवा जगण्याची दर सुधारुया. पिंक अवरनेस मंथमध्ये वरळी- बांद्राच्या सी लिंक देखील पिंक लाईट ने सजवण्यात आले होते. So let’s paint Pink together आणि स्तन कर्करोगावर मात करूया!  

- डॉ. मानसी ठाकूर भावसार
- M.S,FIAGES ( General, Laparoscopic & Breast Surgeon)
Lakshmi Hospital Dombivli (East )
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Breast Cancer Awareness Month: Everything to know about breast cancer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.