World Rabies Day: कुत्रा चावल्यानंतर त्वरित करा 'हे' उपाय, अन्यथा सामोरे जाल मृत्यूला...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2021 12:51 PM2021-09-27T12:51:43+5:302021-09-27T12:57:19+5:30

कुत्र्याच्या चाव्यामुळे रेबीज सारख्या आजाराचा धोका वाढतो. म्हणूनच कुत्र्याने चावा घेतल्यास किंवा त्यांच्या दातांचा, नखांचा ओरखडा पडल्यास तात्काळ उपचार करणे आवश्यक आहे.

world rabies day home remedies after dog bite tips to do after dog bite | World Rabies Day: कुत्रा चावल्यानंतर त्वरित करा 'हे' उपाय, अन्यथा सामोरे जाल मृत्यूला...

World Rabies Day: कुत्रा चावल्यानंतर त्वरित करा 'हे' उपाय, अन्यथा सामोरे जाल मृत्यूला...

googlenewsNext

रस्त्यावरील कुत्र्या, मांजरांशी खेळणे अनेकांना आवडते. मात्र पाळीव प्राण्यांशी खेळताना काळजी घेणे आवश्यक आहे.अन्यथा काही आजारांचे संक्रमण किंवा पसार होण्याची शक्यता असते. प्रामुख्याने कुत्र्याच्या चाव्यामुळे रेबीज सारख्या आजाराचा धोका वाढतो. म्हणूनच कुत्र्याने चावा घेतल्यास किंवा त्यांच्या दातांचा, नखांचा ओरखडा पडल्यास तात्काळ उपचार करणे आवश्यक आहे. 

  • कुत्रा चावल्यानंतर झालेल्या जखमेवर कापड बांधू नका. ती जखम मोकळी ठेवा.
  • जखम पाण्याने स्वच्छ करा. तुमच्या घरी अल्कोहल असल्यास त्याने जखम स्वच्छ करा. त्यामधील अ‍ॅन्टीसेप्टीक घटक परिणामकारक ठरतात. लाळ किंवा धूळ, माती स्वच्छ करण्यास मदत होते.
  • कुत्रा चावल्यानंतर २४ तासांच्या आत डॉक्टरांचा सल्ला घ्या. त्यानुसार इंजेक्शन घ्या. यामुळे इंफेक्शन रोखण्यास मदत होते.
  • कुत्र्याच्या चावा घेण्याच्या तीव्रतेवर डॉक्टर त्यावरील उपचार पद्धती ठरवतात. काही वेळेस केवळ केवळ जखम स्वच्छ केली जाते तर काही वेळा इंजेक्शन दिले जाते. 
  • लहानसा ओरखडा पडल्यास, केवळ इंजेक्शन दिले जाते. मात्र जखम खोलवर असल्यास अ‍ॅन्टी रेबीज इम्युनोग्लोबुलिनचे उपचार सुरू केले जातात.
  • शक्यतो डॉक्टर जखम शिवण्याऐवजी मोकळी ठेवण्याचा प्रयत्न करतात. मात्र चेहर्‍यावर किंवा प्रमुख शारिरीक अवयवांवर जखम असल्यास टाके घातले जातात.
  • घरगुती कुत्रा चावल्यास ३ इंजेक्शनचा डोस   दिला जातो. पहिले इंजेक्शन त्याच दिवशी, दुसरे ३ दिवसांनंतर तर तिसरे ७ दिवसांनंतर दिले जाते.
  • मात्र रस्तावरील कुत्रा चावल्यास ५-७ अधिक इंजेक्शन दिली जातात. तिसर्‍या इंजेक्शननंतर पुढील इंजेक्शन्स आठवड्याभराच्या फरकाने दिली जातात. यामुळे इंफेक्शनचा धोका कमी होतो तसेच रोगप्रतिकारशक्ती वाढवली जाते.

कुत्रा चावल्यावर अनेकदा डॉक्टरपर्यंत पोहोचण्यास विलंब होऊ शकतो. परंतु, त्यामुळे घाबरून जाण्याचे काहीच कारण नाही. फक्त पूढील घरगूती उपाय करा.

  • कुत्रा चावलेल्या ठिकाणी बारीक कुटलेली मिरची पूड त्वरीत लावा.
  • कांद्याचा रस आक्रोडसोबत योग्य प्रमाणात बारीक कूटून त्यात मीठ टाका त्याची पेस्ट बनवा. ही पेस्ट मधासोबत कुत्रा चावल्याच्या ठिकाणी लेप करून लावा. असे केल्याने कुत्र्याचे विष शरीरात मिसळत नाही.
  • मधात कांद्याचा रस मिसळून कुत्रा चावल्याच्या जखमेवर लावल्यास वेदना कमी होऊन कुत्र्याचे विष शरीरात मिसळण्याला विरोध होतो.
  • १० ते १५ काळे मिरे आणि २ लहान चमचे जीरे पाण्यात टाकून ते त्याचे छान मिश्रण बनवा. हे मिश्रण जखमेवर लावा. काही दिवसातच आराम मिळे.
  • साबण आणि पाण्याने कुत्रा चावल्याची जाग स्वच्छ धूवून घ्या. त्यानंतर जखमेची जागा डेटॉलने पुन्हा साफ करा. असे केल्याने कुत्र्याचे विष शरीरात वाढत नाही.

Web Title: world rabies day home remedies after dog bite tips to do after dog bite

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.