World Mental Health Day : आपला आहार आपल्या मेंदूवर नियंत्रण ठेवतो का?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2019 11:29 AM2019-10-10T11:29:42+5:302019-10-10T11:31:05+5:30

आपला आहार आरोग्य चांगलं राखण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो. तसेच आहारात समावेश करण्यात येणाऱ्या पदार्थांचा आपल्या आरोग्यावर वेगवेगळ्या स्वरूपात परिणाम होत असतो.

World mental health day does food control the brain know how | World Mental Health Day : आपला आहार आपल्या मेंदूवर नियंत्रण ठेवतो का?

World Mental Health Day : आपला आहार आपल्या मेंदूवर नियंत्रण ठेवतो का?

googlenewsNext

(Image Credit : The Standard)

आपला आहार आरोग्य चांगलं राखण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो. तसेच आहारात समावेश करण्यात येणाऱ्या पदार्थांचा आपल्या आरोग्यावर वेगवेगळ्या स्वरूपात परिणाम होत असतो. या सर्व गोष्टी आपल्याला माहीत आहेत. पण आपला आहार आपल्या मेंदूवर नियंत्रण ठेवण्यासाठी मदत करतो. शरीरिक आरोग्यासाठी आहार जितका फायदेशीर तेवढाच मानसिक आरोग्यासाठीही फायदेशीर ठरतो. डेली डाएटमध्ये समाविष्ट होणारे पदार्थ मेंदूवर नियंत्रण ठेवण्यासाठी मदत करतात. गेल्या काही वर्षांपासून मानसिक आजारांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. डिप्रेशन, स्ट्रेस आणि मेंटल डिसॉर्डर यांसारख्या समस्या आणखी वाढल्या आहेत.
 
मेंदूचं आरोग्य राखण्यासाठी हेल्दी डाएट घेण्याचा सल्ला डॉक्टर नेहमी देत असतात. डाएट एक्सपर्ट्स सांगतात की, हिरव्या पालेभाज्या आणि फळं खाल्याने मानसिक आरोग्यासोबतच मेंदूचं आरोग्य राखण्यासाठीही मदत होते. व्हिटॅमिन, मिनरल्स आणि अॅन्टीऑक्सिडंट असणारे पदार्थ मेंदूच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात. 

तणाव आणि डिप्रेशनपासून बचाव करण्यासाठी अनेक आहारतज्ज्ञ आणि डॉक्टर्सही काही पदार्थ खाण्याचा सल्ला देतात. तसेच आपणही अनेक संशोधनांबाबत ऐकत असतो ज्यातून अनेक पदार्थांच्या आरोग्यदायी फायद्यांबाबत सांगितलेले असते. 

जाणून घेऊया कोणते पदार्थ आपल्या मेंदूसाठी फायदेशीर ठरतात त्याबाबत... 

कॉफी मेंदूचे आरोग्य राखण्यासाठी फायदेशीर... 

काही वर्षांपासून कॉफीचं सेवन करणाऱ्यांचे प्रमाण भारतामध्ये वाढलं आहे. काही लोकांना सकाळी उठताच कॉफी पिण्याची सवय असते. कॉफीमध्ये आढळून येणारी तत्व मेंदूचे आरोग्य राखण्यासाठी उत्तम मानली जातात. कॉफीमद्ये कॅफेन आणि अॅन्टीऑक्सिडंट असतात. ही दोन्ही तत्व मेंदूसाठी फायदेशीर ठरतात. एवढचं नाहीतर स्ट्रेस दूर करण्यासाठी कॉफी मदत करते. तसेच अल्जायमर सारख्या आजारापासूनही बचाव करते. 

साखरही मेंदूसाठी फायदेशीर 

हेल्दी डाएट टिप्समध्ये आपण अनेकदा पाहतो की, साखरेचं सेवन कमी करण्याचा सल्ला देण्यात येतो. परंतु फार कमी लोकांना माहीत आहे की, मेंदूसाठी साखर फार फायदेशीर असते. मेंदूसाठी ग्लूकोज एक प्रकारे ऊर्जा देण्याचं काम करतो. साखर खाल्याने शरीरामध्ये ग्लूकोज तयार होतं आणि जे सेरोटोनिन तयार करण्यासाठी मदत करतं. मेंदूवर नियंत्रण ठेवण्यासाठी सेरोटोनिन अत्यंत आवश्यक असतं. 

ड्राई फ्रूट आणि बिया मेंदूसाठी ठरतात फायदेशीर...

ड्रायफ्रुट्स आणि बियांमध्ये आढळून येणारी पोषक तत्व मेंदूला पोषण देण्यासोबतच इतर रोगांपासून रक्षण करतं. ड्रायफ्रुट आणि बियांमध्ये मॅग्नेशिअम, आर्यन, झिंक यांसारखी पोषक तत्न आढळून येतात. डिप्रेशन, अल्जायमर आणि पार्किंसंस सारख्या आजारांपासून बचाव करण्यासाठी ड्रायफ्रुट्सचं सेवन फायदेशीर ठरतं.

हळद मेंदूसाठी गुणकारी 

आहारामध्ये हळदीचा समावेश अत्यंत फायदेशीर ठरतो. हळद खाल्याने मेंदूच्या पेशींना पोषण मिळतं. तसेच अनेक आजारांपासूनही बचाव होतो. जर पोषक तत्वांबाबात बोलायचे झाले तर हळदीमध्ये अॅन्टीऑक्सिडंट मुबलक प्रमाणात असतात. डिप्रेशन, तणाव आणि अल्जायमरपासून बचाव करण्यासाठी हळदीचं सेवन करणं फायदेशीर ठरतं. 

डार्क चॉकलेट 

तणाव दूर करण्यासाठी चॉकलेट मदत करतं. याशिवाय मेंदूचं आरोग्य राखण्यासाठी मदत करतं. जर तुम्हाला एखाद्या कामामुळे मानसिक थकवा जाणवत असेल तर डार्क चॉकलेट अत्यंत लाभदायक असतं. 

ब्रोकली मेंदूचं कार्य सुरळीत ठेवते

जर तुम्हाला मेंदूचं आरोग्य राखायचं असेल तर त्यांच्या आहारात ब्रोकलीचा समावेश करा.  ब्रोकलीमध्ये आढळून येणारी पोषक तत्व मेंदूच्या पेशींचं आरोग्य राखण्यासाठी मदत करतात.
 
(टिप : वरील सर्व समस्या आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं अत्यंत आवश्यक ठरतं.)

Web Title: World mental health day does food control the brain know how

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.