दोन बालकांसह महिला पॉझिटीव्ह
By admin | Updated: February 15, 2015 22:36 IST
दोन बालकांसह महिला पॉझिटीव्ह
दोन बालकांसह महिला पॉझिटीव्ह
दोन बालकांसह महिला पॉझिटीव्ह- स्वाईन फ्लू बळीची संख्या २६ : पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या १३६ (स्वाईन फ्लूचा लोगो वापरावा)नागपूर : वातावरणातील बदलांमुळे सर्दी-पडसे यांच्या रुग्णांत वाढ झाली आहे. विशेषत: लहान मुलांमध्ये हा आजार मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. यामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. यातच रविवारी दोन बालकांसह एका महिलेला स्वाईन फ्लू असल्याचे निष्पन्न झाले आहे. हे तीनही रुग्ण मेडिकलच्या स्वाईन फ्लू वॉर्डात उपचार घेत आहेत. तापमानात वाढ होत असतानाही स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या कमी होत नसल्याचे दिसून येत आहे. आज रविवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाकडून (मेडिकल) संशयित रुग्णांचे पाच नमुने मेयोच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यातील तिघे पॉझिटीव्ह आले आहेत. यात ६ आणि १० वर्षाचा मुलगा असून ३० वर्षाची महिला आहे. हे तिन्ही रुग्ण नागपुरातील रहिवासी आहे. शहरात आतापर्यंत स्वाईन फ्लूने ११ रुग्णांचा मृत्यू झाला असून ९५ रुग्ण पॉझिटीव्ह आले आहेत. -पाच रुग्णांच्या मृत्यूची नोडेल अधिकाऱ्याकडून तोंडी माहितीशनिवारी स्वाईन फ्लूने पाच रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती स्वाईन फ्लूचे नोडल अधिकारी डॉ. यु. बी. नावाडे यांनी दिली. परंतु नावाडे यांना या मृताची सविस्तर माहिती विचारली असता, ही माहिती तोंडी असल्याचे सांगितले. यावरून नोडल अधिकारी जबाबदारीने बोलत नसल्याचे आणि स्वाईन फ्लूची दहशत पसरवित असल्याचा आरोप तज्ज्ञांकडून होत आहे.-शनिवारी एका महिलेचा मृत्यूरामदासपेठ येथील एका खासगी इस्पितळात उपचार घेत असलेल्या नागपुरातीलच एका महिलेचा शनिवारी मृत्यू झाला. रुंदा वालदे असे मृताचे नाव आहे. मागील काही दिवसांपासून ही महिला व्हेंटिलेटरवर उपचार घेत असल्याची माहिती आहे. नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत स्वाईन फ्लू बळीची संख्या २६ झाली असून १३६ पॉझिटीव्ह आले आहेत.