शहरं
Join us  
Trending Stories
1
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
2
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
3
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
4
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
5
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
6
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
7
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
8
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
9
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
10
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
11
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
12
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
13
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
14
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
15
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
16
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
17
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
18
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
19
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
20
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

गरोदरपणात स्त्रियांच्या मेंदूत होतात सकारात्मक बदल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2016 18:27 IST

गरोदरपणात स्त्रियांच्या मेंदूत सकारात्मक बदल होत असल्याचे एका संशोधनानुसार नुकतेच सिद्ध झाले आहे. हे बदल बुद्धिमत्तेमध्ये होत असून, यामुळे स्मरणशक्ती व मानसिक क्षमतेवर कोणताही परिणाम होत नाही, असेही अभ्यासात नमूद करण्यात आले आहे.

गरोदरपणात स्त्रियांच्या मेंदूत सकारात्मक बदल होत असल्याचे एका संशोधनानुसार नुकतेच सिद्ध झाले आहे. हे बदल बुद्धिमत्तेमध्ये होत असून, यामुळे स्मरणशक्ती व मानसिक क्षमतेवर कोणताही परिणाम होत नाही, असेही अभ्यासात नमूद करण्यात आले आहे. गरोदर महिलांना भविष्यात मूल सांभाळताना येणाºया आव्हानांशी सामना करण्यात यावा म्हणून हे बदल घडत असतात. पहिल्यांदाच गरोदर होणाऱ्या महिलांच्या गरोदरपणाच्या काळात आणि प्रसूतीनंतरच्या काळात मेंदूत होणाऱ्या बदलांचे निरीक्षण संशोधकांनी केले. तसेच पहिल्यांदा पिता होणाऱ्या पुरुषांच्या व अपत्य नसलेल्या जोडप्यांच्या मेंदूचेही निरीक्षण केले. त्यामध्ये गरोदर महिलांच्या बुद्धिमत्तेत सकारात्मक बदल होत असल्याचे समोर आले. यामुळे बाळाला होणारे आजार, भावना तसेच त्याच्या संरक्षणाची गरज समजण्याची क्षमता निर्माण होते. त्यामुळे त्या मातेच्या मानसिक स्वास्थ्यावर कोणताही परिणाम होत नाही. दरम्यान प्रसूतीनंतर दोन वर्षे मातांवर संशोधन करण्यात आले पण हे बदल किती दिवस टिकतील हे त्यामुळे समोर आले नाही.