कोरोनाच्या दोन नव्या व्हेरियंटवर जुनीच लस प्रभावी ठरेल का? तज्ज्ञ म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 13:34 IST2025-05-28T13:32:54+5:302025-05-28T13:34:46+5:30

कोरोनाच्या दोन नव्या व्हेरियंटवर जुनी लस प्रभावी आहे का? असा प्रश्न सगळ्यांच्या मनात उद्भवत आहे. 

Will the old vaccine be effective against two new variants of Corona? Experts say... | कोरोनाच्या दोन नव्या व्हेरियंटवर जुनीच लस प्रभावी ठरेल का? तज्ज्ञ म्हणतात...

कोरोनाच्या दोन नव्या व्हेरियंटवर जुनीच लस प्रभावी ठरेल का? तज्ज्ञ म्हणतात...

Corona Virus News : कोरोना देशभरात पुन्हा एकदा डोकं वर काढताना दिसत आहे. यामुळे सर्वसामान्य लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. देशभरात सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या आता एक हजारांच्या वर पोहोचली आहे. या दरम्यानच आता कोरोनाचे दोन नवीन व्हेरियंट समोर आले आले आहे. या नव्या व्हेरियंटनी लोकांची चिंता आणखी वाढवली आहे. या नव्या व्हेरियंटमुळे संक्रमित झालेल्या रुग्णांमध्ये कोरोनाची अगदी सौम्य लक्षणे दिसत असल्याचे दिसून आले आहे. या रुग्णांमध्ये सर्दी, खोकला, हलका ताप आणि अंगदुखी अशी लक्षणे दिसत आहेत. कोरोनाच्या या दोन नव्या व्हेरियंटवर जुनी लस प्रभावी आहे का? असा प्रश्न देखील सगळ्यांच्या मनात उद्भवत आहे. 

यावेळीस कोरोना व्हायरसने स्वतःमध्ये थोडासा बदल केला आहे. दोन्ही नवे व्हेरियंट ही काहीसे वेगळे आहेत. तज्ज्ञांच्या मते, कोरोनाचे हे नवे व्हेरियंट म्यूटेशनचा परिणाम आहेत. मात्र, याबाबत सतर्क राहणे गरजेचे आहे. सध्या तज्ज्ञ यावर अभ्यास करत असून, यांची लक्षणे, संक्रमणाची क्षमता आणि यापासून किती धोका आहे, यावर संशोधन सुरू आहे. या नव्या व्हेरियंटची लक्षणे सौम्य असली, तरी दुर्लक्ष केल्यास गंभीर परिणाम होऊ शकतात. 

तज्ज्ञ काय म्हणतात?

याबाबत बोलताना विशेषज्ञ डॉ. अजय कुमार म्हणाले की, "सध्या लोकांनी जी लस घेतली आहे, त्याबद्दल अनेक प्रश्न त्यांच्या मनात निर्माण झाले आहेत. त्यातच दोन नवे व्हेरियंट समोर आल्याने लोक आणखी गोंधळले आहेत. मात्र, घाबरण्याचं आणि काळजी करण्याचं काहीच कारण नाही. व्हायरसमध्ये सतत बदल होता असतात. व्हायरसचे म्यूटेशन होते आणि त्याचे नवे व्हेरियंट तयार होतात. या नव्या व्हेरियंटवर कदाचित लस कमी प्रभावी ठरू शकते, मात्र पूर्णपणे निष्फळ ठरेल असे नाही. लस शरीरातील रोगप्रतिकार शक्तील संक्रमणाशी लढण्यासाठी तयार करतात. काही व्हेरियंट्समध्ये लसीचा प्रभाव कमी दिसू शकतो. मात्र, गंभीर संक्रमण टाळता येऊ शकते. यामुळेच ज्यांनी दोन्ही लसी आणि बुस्टर डोस घेतले, अशा लोकांवर हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याची वेळ क्वचितच येत आहे."           

कसा कराल स्वतःचा बचाव?
> गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करा. 
> साबण किंवा सॅनिटायझरकहा वापर करा. 
> जर ताप, सर्दी किंवा खोकला अशी लक्षणे दिसली तर, तपासणी करा आणि स्वत:ला इतरांपासून वेगळं करा.
>कोरोनाची लस घ्या.
> संतुलित आहार आणि व्यायामाची काळजी घ्या.

Web Title: Will the old vaccine be effective against two new variants of Corona? Experts say...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.