पालकाची भाजी खाणं 'या' लोकांसाठी पडू शकते महागात, वेळीच व्हा सावध!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2024 16:00 IST2024-07-22T15:56:00+5:302024-07-22T16:00:06+5:30
Spinach side effects : या भाजीचे अनेक फायदे असले तरी या भाजीचं सेवन करणं काही लोकांसाठी फारच नुकसानकारक आहे. अशात ही भाजी कुणासाठी नुकसानकारक आहे हे जाणून घेऊ.

पालकाची भाजी खाणं 'या' लोकांसाठी पडू शकते महागात, वेळीच व्हा सावध!
Spinach side effects : वेगवेगळ्या पालेभाज्यांमध्ये पालक भाजीचं एक वेगळंच महत्व असतं. कारण ही भाजी शरीरात अनेक व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स देते. पालक भाजीमुळे शरीरात रक्तही वाढतं आणि रक्त शुद्ध होतं. पण या भाजीचे अनेक फायदे असले तरी या भाजीचं सेवन करणं काही लोकांसाठी फारच नुकसानकारक आहे. अशात ही भाजी कुणासाठी नुकसानकारक आहे हे जाणून घेऊ.
पालक भाजीतील पोषक तत्व
पालक भाजीमध्ये ते सगळेच पोषक तत्व आढळतात, जे शरीराचं काम योग्यपणे करण्यासाठी गरजेचे आहेत. पालकमध्ये आयरन, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम आणि पोटॅशिअम भरपूर प्रमाणात असतात.
पालक भाजी खाण्याचे फायदे
नियमितपणे पालकाचं सेवन केलं तर बीपी कंट्रोल करणे, डोळे चांगले ठेवणे, डायबिटीस कंट्रोल करण्यास, हृदय निरोगी ठेवण्यात, वजन कमी करण्यास आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत मिळते. कोणत्या आजारांमध्ये पालकाचं सेवन करू नये हे आता जाणून घेऊ.
कुणी खाऊ नये पालक?
रक्त पातळ करण्याचं औषध घेणारे लोक
जर तुम्ही रक्त पातळ करण्यासाठी काही औषधं घेत असाल तर तुम्ही पालकाचं सेवन अजिबात करू नये. कारण यात व्हिटॅमिन के असतं, जे anticoagulant सोबत रिअॅक्शन करतं.
किडनी स्टोनचे रूग्ण
जर तुम्हाला किडनी स्टोन असेल किंवा किडनी स्टोनची हिस्ट्री असेल तर तुम्ही पालक अजिबात खाऊ नये. कारण या कंडीशनमध्ये तुम्हाला किडनी स्टोन वाढण्याचा किंवा होण्याचा धोका असतो.
अॅलर्जी असणारे लोक
डॉक्टरांनी सांगितलं की, पालकांमध्ये हिस्टामिन असतं आणि हे खाल्ल्याने काही लोकांना अॅलर्जी होऊ शकते. जर तुम्हाला अॅलर्जीची समस्या असेल तर तुम्हाला पालक दूरच ठेवलेली बरी.