वेळोवेळी Blood Test करत राहण्याचं कारण माहीत आहे का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2019 10:48 IST2019-10-01T10:45:20+5:302019-10-01T10:48:58+5:30
आपलं शरीर योग्यप्रकारे काम करत रहावं यासाठी गरजेचं आहे की, आपलं रक्त शुद्ध रहावं. कारण रक्त हाच आपल्या शरीराला चालवण्याचा आणि ऊर्जा देण्याचा मुख्य स्त्रोत आहे.

वेळोवेळी Blood Test करत राहण्याचं कारण माहीत आहे का?
आपलं शरीर योग्यप्रकारे काम करत रहावं यासाठी गरजेचं आहे की, आपलं रक्त शुद्ध रहावं. कारण रक्तच आपल्या शरीराला चालवण्याचा आणि ऊर्जा देण्याचा मुख्य स्त्रोत आहे. जर आपल्याला शरीर निरोगी ठेवून एक शानदार जीवन जगायचं असेल तर शरीरातील रक्तावर आणि रक्तदाबावर विशेष लक्ष द्यावं लागेल. रक्ताची तपासणी वेळोवेळी करत रहायला हवी. जेणेकरून त्या आजारांबाबत माहिती मिळावी, जे भविष्यात तुम्हाला महागात पडू शकतात.
शरीरात रक्ताची कमतरता असणे, रक्तात कशाप्रकारचं संक्रमण असणे, रक्तातील शुगरचं प्रमाण, पांढऱ्या आणि लाल रक्तपेशींचं प्रमाण, प्लेटलेट्स प्रमाण, प्लाजमा इत्यादी गोष्टींची माहिती रक्त तपासणी करून घेता येते. वेळेवर जर रक्ताच्या सर्वच कंपाउंडबाबत माहिती मिळाली तर भविष्यात कोणत्याही प्रकारचा गंभीर आजार होण्याचा धोका कमी होतो.
अवयवांची तपासणी
रक्त तपासणीच्या माध्यमातून शरीराच्या अनेक इतर अवयवांबाबतही माहिती मिळवता येऊ शकते. हे अवयव ठीकपणे काम करत आहेत की नाही किंवा काही समस्या आहे का. जसे की, किडनी, लिव्हर, हृदयाची तपासणी केली जाऊ शकते. सोबत आनुवांशिक रूपाने एखादा आजार होण्याचा धोका तर नाही ना याचीही माहिती तुम्हाला मिळू शकते.
कधी आणि कशी करावी?
सध्याची धावपळीची लाइफस्टाईल पाहता प्रत्येक व्यक्तीने २० वयानंतर वर्षांतून एकदा कम्प्लिट बॉडी चेकअप आणि ब्लड टेस्ट जरूर करावी. यासाठी तुम्ही एखादी चांगली लॅब आणि हॉस्पिटलमध्ये संपर्क करू शकता. सामान्यपणे रक्ताशी संबंधित सर्व टेस्ट रिपोर्ट २४ तासांच्या आत मिळतात.