शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
4
सुरक्षित गुंतवणुकीसह जबरदस्त रिटर्न! कमाईची उत्तम संधी आहेत या ५ स्कीम; मिळेल ८% पेक्षा जास्त व्याज
5
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
6
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
7
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
8
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
9
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
10
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
11
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
12
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
13
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
14
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
15
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
16
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
17
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
18
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
19
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
20
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले

भारतात कितपत पसरलाय कोरोनाचा नवा स्ट्रेन? सरकार 'या' मार्गानं माहिती मिळवणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2020 16:33 IST

CoronaVirus News & Latest Updates : याद्वारे कोरोना व्हायरसच्या नवीन स्ट्रेनवर काम केलं जाईल. टास्क फोर्सने दिलेल्या माहितीनुसार कोविड१९ चे जिनोम सर्विलांस करणं गरजेचं आहे. 

ब्रिटनमध्ये पसरलेला व्हायरसचा नवीन स्ट्रेन भारतात किती प्रमाणात पसरला आहे.  हे पाहण्यासाठी जीनोम सिक्वेंसिंगचा वापर केला जाऊ शकतो.  कोविड १९ साठी तयार झालेल्या टास्क फोर्सने यासाठी उपाय सुचवला आहे. 'प्रॉस्‍पेक्टिव सर्विलांस' अंतर्गत सर्व राज्यातील पॉझिटिव्ह केसेसमध्ये ५ टक्के जीनोम सीक्वेंसिंगची चाचणी केली जाईल. त्यासाठी नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोलअंतर्गत  जीनोम सर्विलांस कंसोर्टीयम INSACOG तयार करण्यात आलं आहे. याद्वारे कोरोना व्हायरसच्या नवीन स्ट्रेनवर काम केलं जाईल. टास्क फोर्सने दिलेल्या माहितीनुसार कोविड१९ चे जिनोम सर्विलांस करणं गरजेचं आहे. 

भारतात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी ट्रेसिंग गरजेचं 

कोविड टास्क फोर्सने दिलेल्या माहितीनुसार म्यूटेशननंर ट्रीटमेंट प्रोटोकॉलमध्ये बदल होणं गरजेचं आहे. या बैठकीमध्ये कोरोना व्हायरसचा नवीन स्ट्रेन अधिक संक्रामक आहे. यावर अधिक जोर देण्यात आला होता. त्यासाठी संक्रमित लोकांना ओळखून त्यांना आधी आयसोलेट करायला हवं.  जेणेकरून भारतात इतर ठिकाणी हा व्हायरस पसरणार नाही. सर्विलांसच्या योजनेअंतर्गत २१  ते २३ डिसेंबरच्या मध्ये भारतात आलेल्या प्रवाश्यांची तपासणी केली जाणार आहे. 

विमानतळावर ज्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला त्यांनाच बाहेर जाण्यास परवानगी देण्यात आली. शनिवारी नॅशनल टास्क फोर्सने नवीन स्ट्रेनला  लक्षात घेता कोविडची ट्रीटमेंट आणि प्रोटोकॉल, टेस्टिंग आणि सर्विलांसवर चर्चा केली. या बैठकीचे प्रतिनिधत्व नीती आयोगाचे सदस्य विनोद पॉल आणि इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्चचे प्रमुख बलराम भार्गव यांनी केले होते.

चिंताजनक! कोरोना पुन्हा नवा अवतार घेणार?; AIIMS च्या संचालकांचा सर्तकतेचा इशारा

मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार ब्रिटनमध्ये पसरलेल्या कोरोना व्हायरसला पसरण्यापासून रोखण्यासाठी जिनोमीक निरिक्षण केलं जाणं गरजेचं आहे.  तसंच  सोशल डिस्टेंसिंग, सतत हात धुत राहणं, मास्कचा वापर करणं गरजेचं आहे. दरम्यान काल दिवसभरात देशात १८ हजार ७३२ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. १ जुलैपासून प्रथमच देशात इतक्या कमी संख्येनं कोरोना रुग्ण आढळून आले. देशातील कोरोना बाधितांचा एकूण आकडा १ कोटी १ लाख ८७ हजार ८५० वर पोहोचला आहे. गेल्या २४ तासांत देशात २७९ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या १ लाख ४७ हजार ६२२ वर पोहोचली. देशात आतापर्यंत ९७ लाख ६१ हजार ५३८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर सध्याच्या घडीला २ लाख ७८ हजार ६९० जणांवर उपचार सुरू आहे.

सावधान! तुम्हीसुद्धा जेवल्यानंतर लगेच पाणी पीता? ही सवय ठरू शकते 'या' ४ समस्यांचं कारण

देशात सर्वाधित कोरोना रुग्णांची नोंद महाराष्ट्रात झाली आहे. राज्यातील एकूण कोरोना बाधितांचा आकडा १९ लाखांच्या पुढे गेला आहे. तर मृतांचा आकडा ५० हजारांच्या जवळ पोहोचला आहे. गेल्या २४ तासांत राज्यात २ हजार ८५४ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर ६० जणांचा मृत्यू झाला. महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, दिल्ली आणि केरळला कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. सध्याच्या घडीला देशातील सर्व राज्यांमधील कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट ९० टक्क्यांच्या पुढे आहे.  

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य