चिंताजनक! कोरोना पुन्हा नवा अवतार घेणार?; AIIMS च्या संचालकांचा सर्तकतेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2020 06:45 PM2020-12-25T18:45:12+5:302020-12-25T18:51:15+5:30

CoronaVirus News & Latest Updates : व्या वर्षाच्या सुरुवातीला व्हॅक्सिनला सरकारकडून मान्यता मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर लशीकरण कार्यक्रम काही टप्प्यांमध्ये राबवण्यात येईल.

Aiims director dr guleria explains all your questions about coronavirus strain | चिंताजनक! कोरोना पुन्हा नवा अवतार घेणार?; AIIMS च्या संचालकांचा सर्तकतेचा इशारा

चिंताजनक! कोरोना पुन्हा नवा अवतार घेणार?; AIIMS च्या संचालकांचा सर्तकतेचा इशारा

Next

कोरोना व्हायरसनं संपूर्ण जगभरात गेल्या वर्षभरापासून हाहाकार केला आहे. कोरोना लसीबाबत सकारात्मक माहिती समोर आल्यानंतर लोकांच्या मनातील भीती कमी झाली होती. दरम्यान आता ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसचा नवी स्ट्रेन सापडल्यामुळे पुन्हा चिंताजनक वातावरण तयार झालं आहे. या नव्या स्ट्रेनचे परिणाम काय होऊ शकतात? याच्याशी कसं लढायचं? व्हायरसच्या या नवीन स्ट्रेनवर लस कितपत प्रभावी ठरणार असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील. नवी दिल्लीतील AIIMS चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया (Dr. Randeep Guleria) यांनी सीएनएन न्यूज 18 शी बोलताना या नवीन स्ट्रेनबाबत अधिक माहिती दिली आहे. डॉ. गुलेरिया हे कोरोनाचा सामना करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या नॅशनल टास्क फोर्सचे सदस्य आहेत.

कोरोनाचा नवीन स्ट्रेन कितपत धोकादायक?

डॉ. गुलेरिया यांनी दिलेल्या माहितीनुसार , ''जगातील अनेक भागात सध्या जी परिस्थीती आहे, त्याचं गांभीर्य आपण ओळखलं पाहिजे. आपल्या देशातील पेशंटची संख्या कमी झालेली आहे. सध्या उतरता ट्रेंड (Downward trend) सुरु असून आपला ‘रिकव्हरी रेट’ ही चांगला आहे. ब्रिटनमध्ये सापडलेला नवा व्हायरस हा अधिक संसर्गजन्य असला तरी यामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या पेशंट्सची संख्या कमी आहे. भारतामध्ये हा व्हायरस आला तरी निर्माण होणाऱ्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी आपण सज्ज आहोत. त्यासाठी सोशल डिस्टेंसिंगचे पालन आणि मास्कचा वापर करायला हवा.''

पुढे त्यांनी सांगितले की, ''नव्या व्हायरची लागण झालेल्या पेशंट्सची संख्या मोठी आहे. मात्र यामुळे मृत्यू पावलेल्या किंवा हॉस्पिटलमध्ये गेलेल्या व्यक्तींची संख्या फार नाही, हे सध्या उपलब्ध असलेल्या डेटावरुन स्पष्ट होते. या व्हायरसचे नाव न ठेवता स्ट्रेन असे नाव का देण्यात आले, हे आपल्याला समजून घेण्याची गरज आहे. 
या व्हायरसमध्ये अनेक म्यूटेशन्स (Mutations) आहेत. यामध्ये दर महिन्यालाला साधारण दोन म्यूटेशन्स आढळतात. म्हणून हे म्यूटेशन्स असे सुरूच राहणार आहेत.

त्याचवेळी याची लक्षणं समान असून त्याच्यावरील उपचारपद्धती देखील सारखी आहे. सध्या उपलब्ध असलेल्या डेटावरुन हे उपचार नव्या व्हायरसची लागण झालेल्या पेशंट्सवरही प्रभावी ठरत आहेत. सध्याची स्थिती पाहता लस निर्मीती प्रक्रयेत बदल करण्याची आवश्यकता वाटत नाही.''

कोरोनामुक्त रुग्णांना जीवघेण्या 'गुलियन बेरी सिंड्रोम'चा धोका; जाणून घ्या लक्षणं

लसी कधी उपलब्ध होईल

नव्या वर्षाच्या सुरुवातीला लसीला सरकारकडून मान्यता मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर लसीकरण कार्यक्रम काही टप्प्यांमध्ये राबवण्यात येईल. सुरुवातीच्या काळात कोरोना योद्धे, फ्रंटलाईन कामगार आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना लस टोचवण्यात येणार आहे. त्यानंतर अन्य गटामधील नागरिकांचे लसीकरण करण्यात येईल. ही सर्व प्रक्रिया राबवण्यासाठी 6 ते 8 महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.

कोरोनाच्या संकटात आता जपानमध्ये बर्ड फ्लूचा हाहाकार; १० लाख कोंबड्यांना मारलं जाणार

 देशातील प्रत्येकाने लस घ्यायलाच हवी?

कोरोनामुळे होणारे मृत्यू  रोखणं हे सध्या गरजेचं आहे. त्यामुळे या आजाराचा सर्वात जास्त धोका असलेले ज्येष्ठ नागरिक, आरोग्य कर्मचारी यांचे सर्वात पहिल्यांदा लसीकरण करण्यात येणार आहे. त्यानंतर या मोहिमेचा विस्तार केला जाईल. ही मोहीम अधिक विस्तारानं राबवल्यानंतर कोरोनाची साखळी तोडण्यामध्ये आपल्याला यश मिळेल. त्यानंतर लसीकरण मोहीम आक्रमक पद्धतीनं राबवण्याची गरज उरणार नाही. अर्थात ही अवस्था येईपर्यंत जास्तीत जास्त व्यक्तींचे लसीकरण होणे आवश्यक आहे.

Web Title: Aiims director dr guleria explains all your questions about coronavirus strain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.