Who says death rate in under 20 year is very less but they are superspreader | 'या' वयोगटातील लोकांमुळे वेगानं वाढतोय कोरोनाचा प्रसार; WHO च्या तज्ज्ञांचा दावा

'या' वयोगटातील लोकांमुळे वेगानं वाढतोय कोरोनाचा प्रसार; WHO च्या तज्ज्ञांचा दावा

कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं आकडेवारीवरून सांगितले की, २० वर्षांपेक्षा कमी वयातील लोकांना कोरोनाच्या माहमारीचा धोका कमी असतो. कारण  या वयोगटातील लोकांमध्ये रोगप्रतिकारकशक्ती जास्त असते. जागतिक आरोग्य संघटनेनं देशातील कोरोना प्रसारासाठी या वयोगटातील लोकांना कारणीभूत ठरवलं आहे. कारण या वयोगटातील लोक कोरोना पसरण्याचं कारण ठरत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या माहितीनुसार कोविड १९ जितके रुग्ण समोर आले आहेत. त्यापैकी २० वर्षांखाली वयोगटातील लोकांची संख्या १० टक्क्यांपेक्षा कमी आहे.  

या वयोगटातील ०.२ लोकांना मृत्यूचा सामना करावा लागला आहे. तज्ज्ञांनी सांगितले की, लहान मुलांसाठी हा व्हायरस कमी जीवघेणा ठरू शकतो याची कल्पना आहे. त्यामुळे त्याच्यात हलकी लक्षणं दिसून येतात. लहान मुलांचा मृत्यूदरही कमी आहे. जगभरातील  अनेक  देशात लहान मुलांना संक्रमणाचा सामना करावा लागला आहे. युनिसेफच्या एक्झिक्यूटिव्ह डायरेक्टर हेनरिचा फोरे यांनी सांगितले की, ''१९२ देशात अर्ध्यापेक्षा जास्त मुलं  शाळेत जाऊ शकत नाहीत कारण या माहामारीचा गंभीर परिणाम या मुलांवर झाला आहे. ''

जवळपास १६ कोटी शाळकरी मुलं या दिवसात घरी बसून आहेत.लाखो मुलं टीव्ही, इंटरनेट किंवा इतर माध्यमांनी आपलं शिक्षण पूर्ण करत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख ट्रेड्रोस गेब्रेयेएसूस यांनी सांगितले की या माहामारीचा गंभीर परिणामांचा सामना सगळ्यांनाच करावा लागत आहे.  ज्या ठिकाणी संक्रमणाचा धोका जास्त आहे त्याठिकाणी आणखी काही दिवस शाळा बंद असायला हव्यात. याशिवाय सोशल डिस्टेंसिंगचं पालन करायला हवं.  

भारतात ऑक्सफोर्ड लसीच्या चाचणीला पुन्हा सुरुवात होणार

ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि एक्स्ट्राजेनेका यांच्या सहयोगाने तयार करण्यात आलेल्या लसीची चाचणी काही दिवसांपूर्वी भारतातही थांबवण्यात आली होती. दरम्यान या लसीबाबत सकारात्मक माहिती समोर येत आहे. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडीयाचे डॉ. वीजी सोमानी यांनी मंगळवारी सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडीयाला ऑक्सफोर्डची लसीच्या चाचण्या पुन्हा सुरू करण्यासाासाठी परवानगी दिली आहे.

याशिवाय DCGI ने  दुसऱ्या आणि  तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी नवीन स्वयंसेवकांना निवडण्यासाठीही बंदी घातली होती.  आता ही बंदी  उठवण्यात आली आहे.  याआधी ११ सप्टेंबरला DCGI नं भारतातील पुण्यात सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडीयाच्या एक्स्ट्राजेनेका आणि ऑक्सफोर्डकडून घेण्यात येत असलेल्या चाचण्यांवर बंदी घातली होती.  ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियानं पुढील सूचना येईपर्यंत चाचण्या बंद ठेवण्याचा आदेश दिला होता. सुरक्षेच्या कारणास्तव ही चाचणी सोखण्यात आली होती. 

ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी आणि  एस्ट्राजेनेका पीएलसीकडून विकसीत करण्यात आलेल्या या लसीचे सुरूवातीचे परिणाम खूपच उत्साहजनक होते. ब्रिटनमध्ये चाचणीदरम्यान डोस दिल्यानंतर एका महिला स्वयंसेवकांच्या शरीरात साईड इफेक्ट्स दिसून आले. म्हणून चाचणी थांबवण्यात आली होती. सीरम इंस्टीट्यूटचे सीईओ आदर पुनावाला यांनी सांगितले होते. की, भारतातल्या लसीच्या चाचणीवर याचा काहीही परिणाम होणार नाही. त्यानंतर DCGI नं भारतातील पुण्यातली सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडीयाला नोटिस दिल्यानंतर  सुरक्षेच्या कारणास्तव तात्पुरत्या स्वरूपात चाचणी रोखण्यात आली. 

भारतात ऑक्सफोर्ड लसीची चाचणी १७ ठिकाणी सुरु असून पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील चाचणी यशस्वी झाल्यानंतर जगभरातील अनेक देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्यासाठी  करार करण्यात आले आहेत. तिसऱ्या टप्प्यातील लसची चाचणी अमेरिका, ब्राझील,  दक्षिण अमेरिका आणि भारतात सुरू होणार आहे. 

हे पण वाचा-

अरे व्वा! कोरोनाशी लढण्यासाठी 'या' २ गोष्टी ठरतील रामबाण उपाय; अमेरिकन तज्ज्ञांचा दावा

'कोरोना तर काहीच नाही; अजून २ मोठी संकटं येणार'; प्रसिद्ध अमेरिकन तज्ज्ञांचा दावा

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Who says death rate in under 20 year is very less but they are superspreader

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.