Who Guidelines : कापडाचा मास्क की आणखी कुठला? कोणासाठी, कसा मास्क योग्य?; WHO नं दिल्या गाईडलाईन्स

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2021 12:23 PM2021-04-20T12:23:10+5:302021-04-20T12:24:02+5:30

Who shares guidelines on Mask : जागतिक आरोग्य संघटनेने जारी केलेल्या पोस्टमध्ये मास्क कसे घालायचे हे स्पष्ट केले आहे.

Who Guidelines : Medical face masks or fabric masks who shares guidelines on who should wear what | Who Guidelines : कापडाचा मास्क की आणखी कुठला? कोणासाठी, कसा मास्क योग्य?; WHO नं दिल्या गाईडलाईन्स

Who Guidelines : कापडाचा मास्क की आणखी कुठला? कोणासाठी, कसा मास्क योग्य?; WHO नं दिल्या गाईडलाईन्स

Next

गेल्या एका वर्षापासून कोरोना व्हायरसनं  सगळ्यांच्या जीवनात बदल घडवून आणला आहे. कोरोनाच्या या लढ्यात मास्कचा वापर एखाद्या शस्त्राप्रमाणे केला जात आहे. कोविड -१९ साठी मेडिकल मास्क आणि फॅब्रिक मास्क हे एक महत्त्वपूर्ण सावधगिरीचे उपाय आहेत. दररोज संसर्गाचा आलेख वाढत असताना, आरोग्य तज्ञ  सुरक्षा, मास्क यांच्यासह इतर उपाययोजनांमध्ये निष्काळजीपणा न करण्याचं आवाहन करत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने जारी केलेल्या पोस्टमध्ये मास्क कसे घालायचे हे स्पष्ट केले आहे.

मेडिकल किंवा सर्जिकल मास्क 

ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये जागतिक आरोग्य संघटनेने असा सल्ला दिला आहे की या प्रकारचे मास्क घालावे. आरोग्य कर्मचारी, ज्या लोकांना कोविड -१९ ची लक्षणे आहेत. तसंच कोविड -१९  चा संसर्ग झालेल्या एखाद्याची काळजी घेत असलेले लोक, ज्या ठिकाणी विषाणूचा व्यापक प्रसार झाला आहे अशा ठिकाणी मेडिकल मास्क वापरावे आणि कमीतकमी एक मीटर अंतर लोकांपासून ठेवायला हवे.  जे लोक 60 किंवा त्यापेक्षा वयानं मोठे आहेत तसंच ज्यांना इतर कोणतेही आजार असतील त्यांनी या प्रकारचे मास्क वापरायला हवेत.

पॉझिटिव्ह आल्यापासून उपचारांपर्यंत; लवकर बरं होण्यासाठी कोरोनाबाबत या गोष्टी माहीत करून घ्या

फॅब्रिक्स मास्क

जगात मेडिकल मास्कची कमतरता असताना असे मास्क पूरक म्हणून उदयास आले आहेत. डब्ल्यूएचओने सूचित केले की कोविड -१९ ची लक्षणे नसलेल्या लोकांना फॅब्रिक मास्क घालता येतात. यात सोशल वर्करर्स, कॅशिअर, यांच्याशी जवळीक साधणारे लोक देखील समाविष्‍ट आहेत. वाहतूक, कामाची ठिकाणे, किराणा दुकान आणि इतर गर्दी असलेल्या वातावरणात  सार्वजनिक ठिकाणी फॅब्रिक मुखवटे घालावेत.

समोर आली कोरोनाची ५ गंभीर लक्षणं; सामान्य समजून दुर्लक्ष करणं ठरु शकतं संसर्गाचं कारण

मेडिकल मास्क

मेडिकल मास्क एकदाच वापरायला चालतात. वापर झाल्यानंतर  दररोज कचर्‍यामध्ये टाकला जाणे आवश्यक आहे मेडिकल मास्कला सर्जिकल मास्क देखील म्हटले जाते, तर फॅब्रिक मास्क पुन्हा वापरण्यायोग्य असतो. फॅब्रिक मास्क प्रत्येक उपयोगानंतर कोमट पाण्याने धुणे आवश्यक आहे.

Web Title: Who Guidelines : Medical face masks or fabric masks who shares guidelines on who should wear what

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.