शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
2
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
3
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
4
४८ तासांत मतदानाची अंतिम टक्केवारी अपलाेड करणे कठीण; निवडणूक आयाेगाला निर्देश देण्यास SC चा नकार
5
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
6
२४ वर्षे जुन्या खटल्यात मेधा पाटकर दोषी
7
विधान परिषदेच्या चार जागांसाठी २६ जूनला मतदान
8
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
9
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
10
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
11
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
12
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल
13
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
14
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
15
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
16
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
17
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
18
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
19
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
20
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर

Coronavirus News : भारतात कोरोनाची तिसरी लाट कधी येणार? पहिल्यांदाच तज्ज्ञांनी वर्तवली शक्यता....

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2021 12:32 PM

Coronavirus Third Wave : कोरोना व्हायरसची ही तिसरी लाट कधी येणार याची कुणीही चर्चा केली नव्हती. मात्र, आता पहिल्यांदाच तिसरी लाट कधी येणार याची शक्यता काही तज्ज्ञांकडून वर्तवण्यात आली आहे. 

(Image Credit : business-standard.com)

सध्या देशात कोरोना व्हायरस (Coronavirus News) संक्रमणाची दुसरी लाट थैमान घालत आहे. अशात तिसऱ्या लाटेबाबतही तज्ज्ञांकडून चर्चा केली जात आहे. तिसरी लाट (Coronavirus Third Wave) निश्चित येणार असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. पण कोरोना व्हायरसची (C0ronavirus Wave) ही तिसरी लाट कधी येणार याची कुणीही चर्चा केली नव्हती. मात्र, आता पहिल्यांदाच तिसरी लाट कधी येणार याची शक्यता काही तज्ज्ञांकडून वर्तवण्यात आली आहे. 

केंद्र सरकारचे प्रिन्सिपल सायंटिफिक सल्लागार प्राध्यापक विजय राघवन हे बुधवारी म्हणाले की, दुसऱ्या लाटेनंतर तिसरीही लाट येणार. पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, 'तिसरी लाटही येणार. पण कधी येणार आणि किती घातक असणार याबाबत काही सांगितलं जाऊ शकत नाही. कोरोना व्हायरसचे व्हेरिएंट सतत बदलत आहे. त्यामुळे आपल्याला तिसऱ्या लाटेच्या तयारीत रहावं लागेल'. (हे पण वाचा : दिलासादायक! भारतात कोरोना महामारीचं थैमान कधी थांबणार? वैज्ञानिकांनी सांगितली तारीख....)

कधी येणार तिसरी लाट?

कोरोनाची तिसरी लाट कधी येईल? याबाबत बंगळुरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थमध्ये महामारी तज्ज्ञ डॉ. गिरिधर बाबू म्हणाले की, 'तिसरी लाट हिवाळ्यात येण्याची शक्यता आहे. नोव्हेंबरच्या अखेरच्या दिवसात किंवा डिसेंबरच्या सुरूवातील ही तिसरी लाट येऊ शकते. त्यामुळे या संक्रमणापासून ज्यांना सर्वात जास्त धोका आहे, त्यांना वॅक्सीनेट करण्याची गरज आहे'. (हे पण वाचा : देशात कोरोना संसर्गाची तिसरी लाट येणे अटळ, शास्त्रज्ञांचा दावा)

ते असंही म्हणाले की, 'तिसरी लाट तीन गोष्टींवर अवलंबून आहे. पहिली तर ही की डिसेंबरपर्यंत आपण किती लोकांना वॅक्सीनेट करतो. दुसरी ही की, सुपर स्प्रेडर इव्हेंट आपण किती रोखू शकतो आणि तिसरी म्हणजे आपण किती लवकर व्हायरसच्या नव्या व्हेरिएंटची ओळख पटवू शकत आणि त्याला रोखू शकतो'.

कोरोनाची तिसरी लाट आल्यावर काय होऊ शकतं?

यावर मॅथमॅटिक मॉडल एक्सपर्ट प्राध्यापक एम. विद्यासागर म्हणाले की, 'दुसऱ्या लाटेत जास्त लोक संक्रमित होत आहेत. यात ते लोकही आहेत ज्यांची टेस्ट होत नाहीये किंवा एसिप्म्टोमॅटिक आहेत. पण ते संक्रमित आहेत. अशात जे संक्रमित होत आहेत त्यांच्यात कमीत कमी सहा महिन्यांसाठी व्हायरस विरोधात इम्युनिटी राहील. पण त्यानंतर इम्युनिटी कमजोर पडू शकते. त्यामुळे वॅक्सीनेशन प्रोग्राम वेगाने व्हायला हवा. ६ महिन्याच्या आत हाय रिस्क असलेल्या लोकांना वक्सीन दिली गेली पाहिजे. जेणेकरून तिसरी लाट दुसऱ्या लाटेसारखी भयावह असू नये'. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतHealth Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य