घामाच्या दुर्गंधीतून मिळते आरोग्यासंबंधी बरीच माहिती, जास्त घाम येत असेल तर वेळीच व्हा सावध!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 13:08 IST2025-01-31T13:08:19+5:302025-01-31T13:08:50+5:30

Sweat Health : रिसर्चमध्ये सांगण्यात आलं की, घाम तुमच्या आरोग्याबाबत खूपकाही सांगत असतो. पण एक अडचण अशी आहे की, हे बायो मार्कर्स कशाप्रकारे मोजावे. कारण घामात यांचं प्रमाण खूप कमी असतं.

What sweat tells about your health you should know | घामाच्या दुर्गंधीतून मिळते आरोग्यासंबंधी बरीच माहिती, जास्त घाम येत असेल तर वेळीच व्हा सावध!

घामाच्या दुर्गंधीतून मिळते आरोग्यासंबंधी बरीच माहिती, जास्त घाम येत असेल तर वेळीच व्हा सावध!

Sweat Health : घाम येणं ही एक सामान्य प्रक्रिया आहे. त्यामुळे घाम येत असेल तर त्याचा फार कुणी विचार करत नाही किंवा त्याकडे गंभीरतेनं बघत नाहीत. मात्र, अनेकदा गरमी नसताना किंवा एखादं मेहनतीचं काम न केल्यावरही घाम येत असेल तर चिंतेची बाब असू शकते. तसेच घामाची दुर्गंधीही तुमच्या आरोग्याबाबत खूपकाही सांगत असते. 

घामामध्ये खूपसारे बायो मार्कर्स असतात जसे की, ग्लूकोस, लॅक्टिक, अॅसिड, इलेक्ट्रोलाइट इत्यादी. रिसर्चमध्ये सांगण्यात आलं की, घाम तुमच्या आरोग्याबाबत खूपकाही सांगत असतो. पण एक अडचण अशी आहे की, हे बायो मार्कर्स कशाप्रकारे मोजावे. कारण घामात यांचं प्रमाण खूप कमी असतं.

एन सी बी आई च्या एका रिपोर्टनुसार, या आव्हानावरही येणाऱ्या काळात काही सोल्यूशन मिळेल आणि तुमचा घाम पुन्हा तुमच्या आरोग्यासंबंधी माहिती देईल. 

थायरॉईड असंतुलन

जर तुम्हाला विनाकारण खूप जास्त घाम येत असेल, तर हायपरथायरॉयडिज्मचा संकेत असू शकतो. या स्थितीत मेटाबॉलिज्म फास्ट होतं, ज्यामुळे शरीर अधिक तापमान निर्माण करतं आणि घाम जास्त येऊ लागतो. जर यासोबत तुमचं वजन अचानक कमी झालं, घाबरल्यासारखं वाटत असेल, हार्ट रेट वाढले असतील तर वेळीच टेस्ट करावी.

डायबिटीस आणि ब्लड शुगरचं कनेक्शन

तुम्हाला थंडीच्या दिवसातही खूप जास्त घाम येत असेल तर हा ब्लड शुगर लेव्हल कमी झाल्याचा संकेत असू शकतो. जेव्हा ब्लड शुगर लेव्हल कमी होते, तेव्हा शरीर अधिक घाम काढून संकेत देत असतं. जर तुम्हाला चक्कर येणे, कमजोरी आणि अचानक लागणे अशा समस्या होत असेल तर शुगरची टेस्ट करावी.

हॉर्मोन्समध्ये बदल

महिलांना मेनोपॉज किंवा प्रेग्नेन्सी दरम्यान हार्मोन्समध्ये बदल झाल्यानं जास्त घाम येऊ शकतो. त्याचप्रमाणे पुरूषांमध्ये टेस्टोस्टेरॉन असंतुलन झाल्यानंही अधिक घाम येतो. जर रात्री जास्त घाम येत असेल किंवा कोणत्याही कारणाशिवाय गरमी वाटत असेल तर हा हार्मोनमध्ये असंतुलनाचा संकेत असू शकतो.

तणाव आणि मानसिक आरोग्याचा प्रभाव

जर मानसिक तणाव, चिंता किंवा डिप्रेशनमध्ये असाल तर याचा प्रभाव घामाच्या ग्रंथींवर पडू शकतो. जास्त तणाव घेतल्यास नर्वस सिस्टीम अॅक्टिव होतं, ज्यामुळे हात-पाय आणि कपाळावर जास्त घाम येऊ लागतो. जर तुम्हाला घाम तणावात जास्त येत असेल तर हा संकेत आहे की, मानसित शांतता आणि रिलॅक्सेशनची गरज आहे.

इन्फेक्शन किंवा एखाद्या आजाराचा संकेत

जर तुम्हाला खूप जास्त घाम येत असेल आणि त्यासोबत ताप, थंडी, थकवा किंवा शरीरात वेदना होत असेल तर हा एखाद्या बॅक्टेरिअल इन्फेक्शन किंवा वायरल इन्फेक्शनचा संकेत असू शकतो. ट्यूबरक्युलोसिस (टीबी), मलेरिया किंवा एखाद्या गंभीर आजाराही जास्त घाम येऊ शकतो. 

Web Title: What sweat tells about your health you should know

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.