नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हरची काय असतात कारणे आणि लक्षणे?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2019 10:23 AM2019-10-07T10:23:46+5:302019-10-07T10:24:32+5:30

नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हरची समस्या त्या लोकांमध्ये अधिक असते, जे अल्कोहोल म्हणजेच मद्यसेवन करत नाहीत.

What is non alcoholic fatty liver disease symptoms and prevention | नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हरची काय असतात कारणे आणि लक्षणे?

नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हरची काय असतात कारणे आणि लक्षणे?

googlenewsNext

(Image Credit : hawaiipacifichealth.org)

नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हरची समस्या त्या लोकांमध्ये अधिक असते, जे अल्कोहोल म्हणजेच मद्यसेवन करत नाहीत. सामान्यपणे फॅटी लिव्हर म्हणजेच लिव्हरवर चरबी जमा होणे ही समस्या मद्यसेवन करणाऱ्या लोकांनाच मद्यसेवन करणाऱ्यांमध्ये होते. नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर नाव देण्याचा उद्देश हा आहे की, जे लोक मद्यसेवन करत नाही, त्यांच्या फॅटी लिव्हरच्या समस्येला वेगळ्या दृष्टीने बघितलं गेलं पाहिजे. नॉन फॅटी लिव्हरच्या समस्येबाबत म्हटले जाते की, याचा उपचार पूर्णपणे केला जात नाही.

नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हरची कारणे

लिव्हरच्या आजारांचा संबंध जास्तीत जास्त खाणं-पिणं आणि लाइफस्टाईलशी संबंधित मानलं जातं. पण नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हरबाबत अजून हे पूर्णपणे समोर आले नाही की, ही समस्या का होते. ज्या व्यक्तीला नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हरची समस्या असते. त्यांना ही समस्या नेहमीसाठी राहते. नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हरमुळे कोलेस्ट्रॉल वाढण्याचा धोका वाढतो. काही लोकांमध्ये टाइप २ डायबिटीसची समस्या देखील होते. तसेच नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हरमुळे लठ्ठपणा देखील वाढतो.

नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हरची लक्षणे

एखाद्याला जेव्हा लिव्हरशी संबंधित आजार होतो, तेव्हा काही खास लक्षणे दिसत नाहीत. पण काही नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हरच्या केसेसमध्ये थकवा येणे, शरीरात वेदना होणे आणि अचानक वजन होण्यासोबतच लिव्हर सूज ही लक्षणे असू शकतात. काही केसेसमध्ये नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हरमुळे लिव्हर सिरोसिसची समस्या देखील होऊ शकते.

नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हरवर उपचार

आता नॉन अल्कोबहोलिक फॅटी लिव्हरच्या समस्येवर कोणताही खास उपाय उपलब्ध नाही. डॉक्टरही यामुळे होणाऱ्या समस्यांवर उपचार करतात. जे लोक लठ्ठपणाचे शिकार असतात, त्यांच्या पोटाची बायपास सर्जरी करून फॅटी लिव्हर कमी केलं जातं. 

नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हरपासून बचावाचे उपाय

हेल्दी लाइफसाठी हेल्दी लाइफस्टाईलच सर्वात फायदेशीर मानली जाते. चांगल्या लाइफस्टाईलमध्ये खाणं-पिणं आणि सकाळी उठण्यापासून ते रात्री झोपण्यापर्यंतच्या गोष्टींचा समावेश असतो. नियमितपणे एक्सरसाइज आणि हेल्दी फूडचं सेवन केल्याने तुम्ही नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हरची समस्या दूर ठेवू शकता. 

Web Title: What is non alcoholic fatty liver disease symptoms and prevention

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.