वजन कमी करायचं असेल तर आधी समजून घ्यावा मेटाबॉलिज्मचा फंडा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2019 11:35 IST2019-05-03T11:26:49+5:302019-05-03T11:35:18+5:30
तुम्ही जर वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला हे माहीत असेल की, वजन कमी करणं हे वाटतं तितकं सोपं नाही.

वजन कमी करायचं असेल तर आधी समजून घ्यावा मेटाबॉलिज्मचा फंडा!
(Image Credit : Darryl Rose Fitness)
तुम्ही जर वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला हे माहीत असेल की, वजन कमी करणं हे वाटतं तितकं सोपं नाही. काही लोक वैतागून वजन कमी करण्याचा प्रयत्न सोडून देतात, कारण वजन कमी करण्यासाठी खूपकाही करावं लागतं. काही असे लोक असतात जे म्हणत असतात की, कितीही, काहीही खाल्लं तरी त्यांचं वजन वाढत नाही, तर काही असे असतात जे म्हणतात की, त्यांनी नुसतं पाणी प्यायलं तरी वजन वाढतं.
(Image Credit : Be Fit For Life)
या दोन्ही प्रकारच्या लोकांमध्ये एक गोष्ट सामान्य असते. ज्यामुळे लोकांचं वजन वाढतं सुद्धा आणि जाडेपणा कमीही होत नाही. मेटाबॉलिज्म नावाचा एक असा शब्द आहे, जो वजन वाढणं आणि कमी होण्यासाठी आपल्या शरीरात होणाऱ्या अंतर्गत क्रियांसाठी जबाबदार असते. असेही मानले जाते की, मेटाबॉलिज्म सुस्त झाल्याने जाडेपणा, थकवा, डायबिटीस, हाय बीपी या समस्यांचा धोका वाढतो.
काय आहे मेटाबॉजिज्म?
मेटाबॉलिज्म एक रासायनिक प्रक्रिया आहे. ज्यात आपल्या शरीरातील ऊर्जेची विभागणी होते. याचा अर्थ हा झाला की, जगण्यासाठी आपल्याला जेवढ्या ऊर्जेची गरज असते ती सर्व मेटाबॉलिज्मवर अवलंबून असते. म्हणजे एखादं काम करण्यासाठी आपल्या शरीराला जेवढी ऊर्जा लागते, ती मेटाबॉलिज्मवर ठरते. या प्रक्रियेमध्ये कॅलरी बर्न होतात.
वजन आणि मेटाबॉलिज्मचा संबंध काय?
जसजसं आपलं वय वाढत जातं, तसतसा आपल्या शरीराचा मेटाबॉलिज्म रेट कमी होत जातो आणि या स्थितीत व्यक्ती सहजपणे जाडेपणाची शिकार होऊ शकते. पुरूषांमध्ये याचा कालावधी ४० वर्षाच्या आसपास असते आणि महिलांमध्ये ५० वर्षाच्या जवळपास. इतकेच नाही तर बाहेरचे प्रोसेस्ड फूड खाल्ल्यानेही लहान मुलांमध्ये मेटाबॉलिज्म रेट कमी होतो. ज्यामुळे त्यांचं वजन वाढू लागतं. फास्ट फूड आणि जंक फूड अशात अजिबात खाऊ नयेत.
मेटाबॉलिज्म वाढवायला काय करावं?
1) रोज डेली रूटीनमध्ये व्यायामाचा समावेश करून मेटाबॉलिज्म मजबूत केली जाऊ शकतो.
२) एरोबिक एक्सरसाइजने मेटाबॉलिज्म चांगला होतो.
३) कमी पाणी प्यायल्याने मेटाबॉलिज्मची गती कमी होते, त्यामुळे पाणी भरपूर प्यावे.
४) दोन जेवणामध्ये मोठं अंतर ठेवण्यापेक्षा दो-तीन तासांच्या अंतराने काहीना काही खात रहावे.
५) प्रोटीनयुक्त आहार मेटाबॉलिज्म वाढवण्यासाठी चांगला मानला जातो.
६) ग्रीन टी प्यायल्याने मेटाबॉलिज्म काही तासांनंतर वाढतो.
(टिप : वरील लेखातील मुद्दे हे केवळ माहिती म्हणूण देण्यात आले आहेत. यातील काहीही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवर्जून घेणे महत्त्वाचे ठरेल. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यामुळे वरील टिप्सने सर्वांनाच फायदा होईल याचा दावा आम्ही करत नाही.)