काय आहे गुलियन बॅरी सिंड्रोम आणि कोणती असतात या आजाराची लक्षणं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 15:27 IST2025-01-22T15:19:27+5:302025-01-22T15:27:28+5:30

Guillain Barre Syndrome: काही दिवसातच गुलियन बॅरी सिंड्रोम पूर्ण शरीरात पसरतो. सुरूवातीला याची लागण झाल्यावर श्वसनांसंबंधी समस्या होतात.

What is guillain barre syndrome know the causes symptoms and treatment | काय आहे गुलियन बॅरी सिंड्रोम आणि कोणती असतात या आजाराची लक्षणं?

काय आहे गुलियन बॅरी सिंड्रोम आणि कोणती असतात या आजाराची लक्षणं?

Guillain Barre Syndrome: पुणे शहरात सध्या गुलियन बॅरी सिंड्रोम आजाराची लागण झालेले २४ रूग्ण सापडले आहेत. त्यामुळे लोकांमध्ये चिंता वाढली आहे. पण अनेकांना गुलियन बॅरी आजार नेमका काय आहे, कुणाला होतो किंवा याची लक्षणं काय असतात? हे माहीत नाही. याच प्रश्नांची उत्तरं आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. गुलियन बॅरी सिंड्रोम एक ऑटोइम्यून डिसऑर्डर आहे. या आजारामुळे लोक पॅरालाइज होत आहेत. 

गुलियन बॅरी सिंड्रोम काय आहे?

गुलियन बॅरी सिंड्रोम आजारात शरीराची इम्युनिटी इम्युनिटी विरोधातच काम करू लागते. त्यामुळे या आजाराला ऑटो इम्यून डिसऑर्डर म्हटलं जातं. ज्यामुळे शरीर कमजोर होऊ लागतं. तर हात आणि पायांमध्ये झिणझिण्या येऊ लागतात. काही दिवसातच गुलियन बॅरी सिंड्रोम पूर्ण शरीरात पसरतो. सुरूवातीला याची लागण झाल्यावर श्वसनांसंबंधी समस्या होते. त्यानंतर पूर्ण शरीराला लकवा मारतो. मात्र, हा लकवा काही काळापुरताच असतो. मात्र, वेळीच या आजारावर उपचार घेतले नाही तर स्थिती गंभीर होऊ शकते. रूग्णाला काही वेळ व्हेंटिलेटरवरही ठेवावं लागू शकतं.

गुलियन बॅरी सिंड्रोमची लक्षणं

- श्वास घेण्यास अडचण येणे

- हात आणि पायांमध्ये झिणझिण्या

- ब्लड प्रेशरची समस्या

- चालण्यात किंवा पायऱ्या चढण्यात अडचण

- चिडचिडपणा वाढतो

- चेहऱ्यावर कमजोरी

गुलियन बॅरी सिंड्रोमची कारणं

सध्या गुलियन बॅरी सिंड्रोम होण्याची कारण समजू शकलेली नाहीत. याबाबत मेडिकल विश्वात वेगवेगळे रिसर्च केले जात आहेत. वैज्ञानिकांनुसार हा आजार बॅक्टेरिअल किंवा व्हायरल इन्फेक्शनमुळे होऊ शकतो. तसेच असंही सांगितलं जातं की, हा आजार श्वसनासंबंधी इन्फेक्शन किंवा गॅस्ट्रोइंटेस्टाइनलमध्ये इन्फेक्शनमुळे होतो. 

कुणाला जास्त धोका?

गुलियन बॅरी सिंड्रोम या आजाराचा धोका वयोवृद्ध लोकांना अधिक असतो. खासकरून असे लोक ज्यांना आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या आहेत. ५० वर्ष आणि त्यावरील वयाचे लोक गुलियन बॅरी सिंड्रोम प्रति जास्त सेन्सिटिव्ह असतात. तसेच एच1एन1 इन्फ्लूएंजा आणि जपानी इंसेफलाइटिस सारख्या इन्फेक्शननंतर हा सिंड्रोम विकसित होऊ शकतो. 

गुलियन बॅरी सिंड्रोमचा वॅक्सीनेशनसोबत थेट संबंध नसतो, पण काही लोकांना खासकरून फ्लू वॅक्सीनेशन किंवा इतर वॅक्सीन घेतल्यावर या सिंड्रोमची लक्षण विकसित होऊ शकतात. त्यासोबतच जे लोक फ्लू किंवा इतर गंभीर इन्फेक्शनचे शिकार असतात, त्यांना गुलियन बॅरी सिंड्रोम होण्याचा धोका अधिक असतो. 

गुलियन बॅरी सिंड्रोमपासून बचाव

सध्यातरी गुलियन बॅरी सिंड्रोम या आजारावर कोणताही ठोस उपाय नाही. तरीही उपचारासाठी प्लाज्मा फोरेसिस आणि हाय इम्युनोग्लोबुलिन थेरपी दिली जाते. प्लाज्मा फोरेसिसनं या आजाराचा धोका कमी केला जातो. याच्या उपचारात सुरूवातीचे दोन आठवडे खूप महत्वाचे असतात. एक्सपर्टनुसार, गुलियन बेरी सिंड्रोमपासून बचावासाठी नियमितपणे संतुलित आहार घेणे, वर्कआउट सोबतच योगा आणि मेडिटेशन करा. तसेच लक्षणं दिसता लगेच डॉक्टरांना संपर्क करा.

Web Title: What is guillain barre syndrome know the causes symptoms and treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.