शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

लक्षणे जाणवू न देता दृष्टी हिरावून घेणारा घटक आजार: ग्लुकोमा (काचबिंदू)

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2023 17:15 IST

हा आजार नेमका काय आहे आणि तुमच्यावर त्याचा काय परिणाम होऊ शकतो हे समजून घेतल्यास भारतात या आजाराचा धोका कमी करण्यात मदत होऊ शकते.

(डॉ. मितेश जे बाफना,  कॅटरॅक्ट व रिफ्रॅक्टीव्ह सर्जन, एएसजी आय हॉस्पिटल, डोंबिवली) 

अंधत्व येण्यामागचे दुसरे सर्वात मोठे कारण म्हणजे ग्लुकोमा किंवा काचबिंदू. हा आजार संपूर्ण जगभरात आढळतो. ग्लुकोमा हा नेत्र विकारांचा एक समूह आहे, ज्यामुळे ऑप्टिक मज्जातंतूंचे नुकसान होऊन अंधत्व येते.  भारतामध्ये दरवर्षी या आजाराच्या १२ मिलियनपेक्षा जास्त केसेस आढळून येतात. डोळ्याच्या आतील दाब (इंट्राऑक्युलर प्रेशर) वाढणे हे यामागचे प्रमुख कारण असते. पण ग्लुकोमाच्या सर्वच केसेसमध्ये हेच कारण नसते आणि डोळ्याच्या आतील दाब वाढण्याच्या सर्वच केसेसमध्ये ग्लुकोमा होतोच असे नाही. हा आजार नेमका काय आहे आणि तुमच्यावर त्याचा काय परिणाम होऊ शकतो हे समजून घेतल्यास भारतात या आजाराचा धोका कमी करण्यात मदत होऊ शकते.

ग्लुकोमाचे प्रकार 

- प्रायमरी ओपन-अँगल ग्लुकोमा: हा ग्लुकोमाचा सर्वात जास्त आढळून येणारा प्रकार आहे.  जेव्हा डोळ्यातील ड्रेनेज अँगल खुला असतो पण डोळ्यातील द्राव नीट वाहून जात नाही तेव्हा हा आजार होतो.  यामुळे डोळ्यातील दाब वाढतो आणि ऑप्टिक मज्जातंतूंचे नुकसान होऊ शकते. 

-अँगल-क्लोजर ग्लुकोमा: जेव्हा डोळ्यातील ड्रेनेज अँगल बंद किंवा काही प्रमाणात ब्लॉक झालेला असतो तेव्हा देखील डोळ्यातील दाब वाढतो. 

-नॉर्मल-टेन्शन ग्लुकोमा: जेव्हा डोळ्यातील दाब सर्वसामान्य श्रेणीत असतो तेव्हा या प्रकारचा ग्लुकोमा होतो. नॉर्मल-टेन्शन ग्लुकोमाचे कारण संपूर्णपणे समजून येत नाही पण ऑप्टिक मज्जातंतूंना पुरेशा प्रमाणात रक्तपुरवठा न झाल्यामुळे ते होत असावे.

व्यक्तीचे वय जसजसे वाढत जाते तसतशी ग्लुकोमा होण्याची शक्यता वाढते आणि ४० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना याचा धोका सर्वात जास्त असतो. भारतात ४० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या ग्लुकोमा रुग्णांची संख्या ११ मिलियनपेक्षा जास्त आहे. वय झालेल्या व्यक्तींमध्ये ग्लुकोमा होण्याचे प्रमाण अधिक जास्त असते असे जरी असले तरी विविध वयोगटात ग्लुकोमाचे वेगवेगळे प्रकार आढळून येतात.  

1)  काहीवेळा नवजात बाळाला त्याचा त्रास होतो, त्याला 'कॉन्जेनिटल ग्लुकोमा' म्हणतात. 2)  ३ ते १० वर्षे वयोगटातील लहान मुलांना 'डेव्हलपमेंटल ग्लुकोमा' होऊ शकतो. 3) १० ते ४० वर्षे वयोगटातील व्यक्तींना होणाऱ्या विकारास 'ज्युवेनाईल ग्लुकोमा' म्हणतात.

लक्षणे:

स्थितीच्या गांभीर्यानुसार विविध लक्षणे आढळून येतात. काही केसेसमध्ये सुरुवातीच्या टप्प्यात काहीच लक्षणे आढळून येत नाहीत पण विकार जसजसा वाढत जातो, पुढील लक्षणे आढळून येऊ शकतात. 

•    दृष्टी कमी होणे, खासकरून परिधीय दृष्टी कमी होणे. •    दिवांभोवती प्रभामंडल दिसणे. •    डोळ्यांमध्ये वेदना होणे. 

ही लक्षणे सौम्य असू शकतात आणि जोपर्यंत दृष्टी लक्षणीय प्रमाणात कमी होत नाही तोपर्यंत दिसून देखील येत नाहीत.

उपचार 

ग्लुकोमावर कोणताही इलाज नाही पण औषधोपचार आणि शस्त्रक्रियेने त्याचे व्यवस्थापन केले जाऊ शकते. डोळ्यात घालायचे ड्रॉप्स आणि गोळ्या अशा औषधांनी डोळ्यातील दाब कमी करण्यात मदत होऊ शकते. काही केसेसमध्ये या औषधांमुळे दृष्टी कमी होण्याचा वेग कमी केला जाऊ शकतो किंवा त्याला आळा घातला जाऊ शकतो. पण जर दृष्टी आधीच कमी झालेली असेल तर ती काही परत मिळवली जाऊ शकत नाही. काही केसेसमध्ये जेव्हा औषधे प्रभावी ठरत नाहीत तेव्हा शस्त्रक्रिया करण्यास सुचवले जाते. ग्लुकोमासाठी विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया केल्या जातात, यामध्ये लेजर सर्जरी आणि पारंपरिक पद्धतीच्या शस्त्रक्रियेचा समावेश होतो.

गैरसमज आणि तथ्य 

ग्लुकोमाविषयी समाजात अनेक गैरसमज आहेत, ते दूर होणे गरजेचे आहे.

•    गैरसमज - ग्लुकोमा फक्त वयस्क व्यक्तींनाच होतो. तथ्य - ग्लुकोमा होण्याचा धोका वयोमानानुसार वाढतो हे जरी खरे असले तरी हा विकार कोणालाही होऊ शकतो. तुमचे वय कितीही असू द्या, ग्लुकोमा किंवा डोळ्यांचे इतर आजार झालेले नाहीत याची खात्री करून घेण्यासाठी नियमितपणे डोळे तपासून घेणे महत्त्वाचे आहे. 

•    गैरसमज - ग्लुकोमा काही गंभीर नाही आणि त्याकडे दुर्लक्ष केले तरी चालते. तथ्य - हे चूक आहे. ग्लुकोमावर जर उपचार केले नाहीत तर अंधत्व येऊ शकते.  दृष्टी कमी होऊ नये यासाठी डोळ्यांच्या डॉक्टरकडे जाऊन त्यांनी सांगितलेले उपचार व सूचना यांचे नीट पालन करावे. 

•    गैरसमज - नैसर्गिक उपाययोजना करून ग्लुकोमा बरा केला जाऊ शकतो. तथ्य - काही नैसर्गिक उपायांमुळे डोळ्यातील दाब कमी करण्यात मदत होऊ शकते. पण नैसर्गिक उपाययोजना वैद्यकीय उपचारांना पर्याय म्हणून वापरल्या जाऊ शकत नाहीत. डोळ्यांच्या डॉक्टरकडून तपासणी करून त्यांनी सांगितलेले उपचार व सूचना यांचे पालन करणे गरजेचे आहे.

ग्लुकोमा किंवा डोळ्यांचे इतर काही विकार झाले आहेत का किंवा होत आहेत का याची खात्री करून घेण्यासाठी डोळ्यांची नियमितपणे तपासणी करून घेणे महत्त्वाचे आहे. वय, कौटुंबिक इतिहास, डोळ्यातील दाब वाढणे आणि मधुमेह, उच्च रक्तदाब यासारखे आजार यामुळे ग्लुकोमाचा धोका वाढतो. तुमच्या बाबतीत यापैकी कोणताही धोका असेल किंवा तुम्हाला ग्लुकोमाची लक्षणे जाणवत असतील तर लवकरात लवकर डोळ्यांच्या डॉक्टरकडून तपासणी करून घ्या. आजाराचे लवकरात लवकर निदान केले गेल्यास आणि त्यावर उपचार केल्यास दृष्टी कमी होण्याचा वेग कमी केला जाऊ शकतो किंवा त्याला प्रतिबंध घातला जाऊ शकतो.

टॅग्स :eye care tipsडोळ्यांची निगाHealth Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य