जास्त जगण्याचा सोपा शॉर्टकट! दिवसभर फक्त १० मिनिटांची मेहनत, अनेक आजार पळतील दूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 09:37 IST2026-04-09T09:33:39+5:302026-04-09T09:37:20+5:30
Health - Fitness Tips : एका रिसर्चमधून समोर आलंय की, फिट रहायचं असेल आणि आजारांना टाळायचं असेल तर केवळ ५ ते १० मिनिटांचा हलका व्यायामही पुरेसा आहे.

जास्त जगण्याचा सोपा शॉर्टकट! दिवसभर फक्त १० मिनिटांची मेहनत, अनेक आजार पळतील दूर
Health - Fitness Tips : तापमान वाढलं की, आपली फिजिकल अॅक्टिविटी कमी होऊ लागते. बरेच लोक व्यायाम करण्याचा कंटाळा करतात. पण आपल्याला वाचून आनंद वाटेल की, फिट आणि निरोगी राहण्यासाठी जिममध्ये किंवा घरीच तासंतास व्यायाम करण्याची गरज नाही. कारण एका रिसर्चमधून समोर आलंय की, फिट रहायचं असेल आणि आजारांना टाळायचं असेल तर केवळ ५ ते १० मिनिटांचा हलका व्यायामही पुरेसा आहे. यात पायऱ्या चढणे, धावणे यांसारख्या गोष्टींचा समावेश करू शकता. रिसर्चनुसार, यूके बायोबँक रिसर्चमध्ये ७ वर्ष ९६ हजार ४०८ लोकांच्या आजार जसे की, हृदयरोग, हृदयाचे अनियमित ठोके, टाइप २ डायबिटीस, लिव्हरचे आजार, फुप्फुसांचे आजार, किडनी आजार, डिमेंशिया आणि इम्युनिटी या गोष्टींवर नजर ठेवण्यात आली आणि त्यांची तुलना करण्यात आली.
रिसर्चमधून समोर आलंय की, जे लोक जास्त मेहनतीचा व्यायाम करतात, त्यांच्यात कोणतेही आजार होण्याचा धोका कमी असतो. तर असंही समोर आलं की, छोट्या छोट्या अॅक्टिविटी हृदयरोग आणि टाइप - २ डायबिटीस सारख्या समस्या रोखण्यास प्रभावी ठरतात.
एक्सरसाईज स्नॅकिंग काय?
थोड्या थोड्या वेळासाठी जो व्यायाम केला जातो त्याला एक्सरसाईज स्नॅकिंग म्हणतात. सायन्स आता एक्सरसाईज स्नॅकिंगला सपोर्ट करत आहे. ही एक अशी पद्धत आहे, ज्यात आपण दिवसभरात ५ ते १० मिनिटांचे छोटे छोटे वर्कआउट सेशन करून स्वत:ला गंभीर आजारांपासून वाचवू शकता.
हृदयरोग आणि डायबिटीसमध्ये फायदेशीर
संशोधकांचं मत आहे की, छोटा पण इंटेस वर्कआउट सेशन शरीरात ग्लूकोज कंट्रोल करण्यास मदत करतो. जेव्हा दिवसभरात छोट्या छोट्या एक्सरसाईज केल्या तर ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल राहते, ज्यामुळे डायबिटीसचा धोका कमी होतो. त्याशिवाय आपली कार्डिओवस्कुलर फिटनेसही वाढते. या एक्सरसाईज स्नॅकिंगने आपलं ब्लड प्रेशर कमी होतं आणि कोलेस्टेरॉल लेव्हलही नियंत्रित राहते. ज्यामुळे आपलं आयुष्य वाढतं.
कमी वेळात जास्त फायदा
दिवसातून एकदाच खूपसारा व्यायाम करण्यापेक्षा दिवसातून थोडा थोडा वेळ जर व्यायाम केला तर याचा फायदा अधिक होऊ शकतो. अशाने आपला वेळही वाचतो आणि आपण फिटही राहू शकता. रिसर्च सांगतो की, दिवसातून तीन वेळा १० - १० मिनिटांची अॅक्टिविटी केली तर ही अॅक्टिविटी ३० मिनिटांच्या बरोबरीतच होते.
कोणत्या अॅक्टिविटी कराल?
रिसर्च सांगतो की, जर आपण कुणाशी फोनवर बोलत असाल तर बसून न बोलता चालत फिरत बोला. लिफ्टऐवजी पायऱ्यांचा वापर करा. जर आपण घरी असाल, टीव्ही बघत असाल तर ब्रेक दरम्यान जंपिंग जॅक किंवा स्क्वॉट्स करू शकता. हे लक्षात ठेवा की, आपल्याला सतत शरीराची हालचाल करायची आहे.