(Image Credit : active.com)
वर्कआउट करणे आपली लाइफस्टाइल निरोगी आणि सक्रिय करण्यासाठी फायदेशीर ठरते. पण यासाठी तुम्हाला वेळ काढावा लागतो.. हळूहळू शरीर वर्कआउट करण्यासाठी तयार होतं. मात्र, नियमितता नसेल तर वर्कआउटचे चांगले परिणामही दिसणार नाहीत. तसेच योग्य पद्धतीने तुम्ही एक्सरसाइज करण्याची गरज असते. तुम्हाला वाटत असेल की, तुम्हाला एक्सरसाइजमधून चांगले परिणाम दिसावे तर काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागते. वर्कआउट दरम्यान काय करावे आणि काय करू नये हे तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे.
काय करावे?
1) वार्म-अप गरजेचा
वर्कआउट करताना वार्म-अप हा महत्वपूर्ण भाग चुकूनही स्किप करू नये. हेवी वर्कआउटआधी मसल्स तयार करण्यासाठी आणि शरीर गरम करण्यासाठी वार्म-अप करणे गरजेचं आहे.
२) स्ट्रेच
स्ट्रेच केल्याने तुमच्या मसल्सची लवचिकता वाढते. सोबतच मसल्समधील तणाव येण्याचाही धोका कमी होतो. त्यासाठीच स्ट्रेच करणं गरजेचं आहे.
३) पाण्याची बॉटल
जिमला जात असाल किंवा बाहेर वर्कआउटसाठी जास असाल तर पाण्याची बॉटल जवळ ठेवावी. कारण वर्कआउट करताना तुम्हाला तहान लागत असेल तर याचा अर्थ होतो की, तुम्ही डिहायड्रेटेड होत आहात.
वर्कआउट दरम्यान काय करू नये
१) हेवी वेट लिफ्टिंग
वेट लिफ्टिंगसाठी तुम्ही किती वजन उचलावं हे आधी ट्रेनरकडून विचारून घ्या. जर तुम्हाला वाटच असेल की, जास्त वजन उचलण्यासाठी तयार आहात, तेव्हाच वजन वाढवा. स्वत:च्या मनाने हेवी वेट लिफ्टिंग करू नका.
२) मशीनवर लेटून एक्सरसाइज
जिममधील मशीन्स जसे की, स्टेअऱ क्लायम्बर, ट्रेडमिल, क्रॉस ट्रेनर्सवर लेटून एक्सरसाइज करू नका. असं केल्याने तुमच्या कंबरेवर आणि मनगटावर दबाव पडू शकतो.
३) एनर्जी बार आणि ड्रिंक्स
वर्कआउट दरम्यान एनर्जी बार किंवा एनर्जी ड्रिंक्सचं सेवन करता का? यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की, जर तुम्ही दोन तासांपेक्षा अधिक वर्कआउट करत नसाल तर या गोष्टींचं सेवन करू नये. कारण यात अधिक प्रमाणात कॅलरी असतात. या वरील गोष्टींची काळजी वर्कआउट करताना वेळोवेळी घेतली पाहिजे. तरच तुम्हाला चांगले परिणाम बघायला मिळू शकतात.