शहरं
Join us  
Trending Stories
1
११ युवकांचं ब्रेनवॉश करण्यासाठी... ; दिल्ली स्फोटातील दहशतवादी डॉ. उमरबाबत आणखी धक्कादायक माहिती उघड
2
राज ठाकरेंमुळे काँग्रेस आणि ठाकरे गटात दुरावा?, वर्षा गायकवाड म्हणाल्या, ‘त्यांना सोबत घेण्यापूर्वी…’  
3
"...मग हा ग्रुप आला कुठून, या अपयशाला जबाबदार कोण?" ; ओवेसींनी अमित शाहांना करून जुनी दाव्याची आठवण
4
जमीन घोटाळ्यात पार्थ पवारांना वगळले! अंबादास दानवे म्हणाले, '९९% भागीदारी असताना चौकशी अहवालात नाव कसं नाही?'
5
वेदनादायी! ऑस्ट्रेलियात BMW ची भारतीय महिलेला धडक, जागीच मृत्यू; होती ८ महिन्यांची गर्भवती
6
NWA: नवी मुंबई महापालिका ठरली देशात अव्वल! जलशक्ती मंत्रालयाचा 'राष्ट्रीय जल पुरस्कार २०२४' पटकावला
7
अनगरात 'सही'चा खेळ! अर्ज बाद होताच उज्ज्वला थिटेंचा आरोप, 'मुलगा सोबत असूनही सही राहिलीच कशी?
8
Video: सिंहीणीने सिंहाला मारली एक 'फाईट', पुढे जे झालं ते पाहून तुम्हालाही होईल हसू अनावर
9
तुमचा आधार पुन्हा एकदा बदलणार; आता ना नाव असेल ना पत्ता, फक्त फोटोसोबत असेल QR कोड
10
भारतीय तटरक्षक दलाची मोठी कारवाई; बांगलादेशाच्या तीन नौका जप्त, 79 जणांना अटक
11
काल हिडमाचा खात्मा, आज ‘टेक शंकर’सह 7 नक्षलवादी ठार; आंध्र-ओडिशा सीमेजवळ भीषण चकमक
12
VVPAT: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 'व्हीव्हीपॅट' वापरण्यास आयोगाचा नकार, कारणही सांगितलं!
13
५४ तास विपरीत महालक्ष्मी राजयोग: ५ राशींना ४ पट लाभ, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ; अकल्पनीय फायदा!
14
संरक्षण, विमा आणि धातू क्षेत्रातील 'या' ५ कंपन्यांचे शेअर्स येणार तेजीत! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज
15
Video: "अजित पवार, सगळ्यांचा नाद करायचा, पण..."; भाजपा नेते राजन पाटलांच्या मुलाचं थेट चॅलेंज
16
‘ही मुलगी आमच्या मुलाची नाही’, सासू-सासरे सारखा घ्यायचे संशय, संतप्त सुनेने केलं भयंकर कृत्य
17
Rinku Singh Century In Ranji Trophy : टी-२० स्टार रिंकू सिंहचा रेड बॉल क्रिकेटमध्ये शतकी धमाका!
18
आता काळ बदलतोय! घर सांभाळण्यासाठी कपलने ठेवला 'होम मॅनेजर'; महिन्याला १ लाख पगार
19
हृदयद्रावक! डीजेवर नाचताना हवेत गोळीबार; नवरदेवाच्या मित्राच्या मुलीने गमावला जीव
20
'इंग्लिश विंग्लिश'मधली छोटी मुलगी आता दिसते सुंदर; अभिनेत्रीचं अरेंज मॅरेज ठरलं; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

Weight Loss Tips : कधीच कमी होणार नाही वजन जर खात असाल हे ५ पदार्थ, वेळीच व्हा सावध!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2022 13:22 IST

Weight Loss tips : काही पदार्थ असे असतात जे मेटाबॉलिज्मला हळूवार करतं आणि वजन फार कमी वेगाने कमी होतं. चला जाणून घेऊ कोणते पदार्थ आहेत जे मेटाबॉलिज्मसाठी चांगले नाहीत.

Weight Loss tips :  वजन कमी करणं काही सोपं काम नाही. लोक जिमपासून खाण्या-पिण्यात वेगवेगळे बदल करतात. तरी सुद्धा लोक हवं तसं वजन कमी करू शकत नाहीत. वजन कमी करण्यासाठी आणि हेल्दी राहण्यासाठी तुम्हाला तुमच्या मेटाबॉलिज्मवर जास्त लक्ष देण्याची गरज आहे. मेटाबॉलिज्म एक अशी प्रक्रिया आहे ज्यात तुमचं शरीर अन्नाला एनर्जीत बदलतं. तुमची बॉडी कॅलरी बर्न करून त्या जेवढ्या जास्त एनर्जीमध्ये बदलाल तेवढ तुमचं वजन कमी होईल. पण काही पदार्थ असे असतात जे मेटाबॉलिज्मला हळूवार करतं आणि वजन फार कमी वेगाने कमी होतं. चला जाणून घेऊ कोणते पदार्थ आहेत जे मेटाबॉलिज्मसाठी चांगले नाहीत.

रिफाइंड धान्य - पास्ता, ब्रेड आणि पिझ्झासारखे पदार्थ आरोग्यासाठी चांगले नसतात. पण जर तुम्ही वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर हे पदार्थ खाऊ नका. जर खायचेच असतील तर यांचं प्रमाण योग्य ठेवा. जास्त प्रमाणात ग्लूटन, स्टार्च आणि फायटिक अॅसिडने मेटाबॉलिज्मला नुकसान पोहोचतं. अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशनच्या एका रिसर्चनुसार, रिफाइंडऐवजी कडधान्य खाल्ल्याने कॅलरी वेगाने घटते. कारण कडधान्याने मेटाबॉलिज्म जास्त अॅक्टिव होतं.

अल्कोहोल - प्रमाणापेक्षा जास्त मद्यसेवन करणं हे आरोग्यासाठी नुकसानकारक आहे. महिलांनी दररोज एक आणि पुरूषांनी दोनपेक्षा जास्त ड्रिंक करणं धोक्याचं असतं. यापेक्षा जास्त ड्रिंक मेटाबॉलिज्मवर प्रभाव पडतो. जास्त मद्यसेवन केल्याने शरीराची वजन कमी करण्याची क्षमता ७३ टक्क्यांपर्यंत कमी होते. जास्त मद्यसेवन केल्याने शरीरात एसीटॅल्डिहाइड बनतं. या विषारी पदार्थाने शरीराच्या पचनक्रियेचं नुकसान होतं.

फ्रूट ज्यूस - फ्रूट ज्यूसने शरीराला नुकसान होतात. फ्रूट ज्यूसमध्ये शुगरचं प्रमाण जास्त असतं आणि यामुळे ब्लड ग्लुकोज फार जास्त वाढतं. ब्लड ग्लुकोज वाढल्याने मेटाबॉलिज्म हळूवार होतं. याचा अर्थ हा आहे की, तुम्ही कॅलरी कमी बर्न करत आहात आणि फॅट जास्त वाढत आहे.

रेस्टॉरन्ट फ्राइड फूड- रेस्टॉरन्टच्या फ्राइड फूड्समध्ये हायड्रोजेनेटेड ऑइल किंवा ट्रान्स फॅट असतं. वेक फॉरेस्ट यूनिव्हर्सिटीच्या वैज्ञानिकांनुसार, मोनोअनसॅच्युरेटेड फॅटऐवजी ट्रान्स फॅट डाएटने वजन वेगाने कमी होतं. इतकंच काय तर या फॅटसोबत कॅलरीच्या प्रमाणावरही प्रभाव करत नाही. फ्राइड फूडने लठ्ठपणा वाढतो आणि आरोग्यालाही नुकसान पोहोचतं.

फ्रोजन फूड - फ्रोजन फूडमध्ये कॅलरी आणि फॅटचं प्रमाण फार जास्त असतं. याने मेटाबॉलिज्म स्लो होतं. टेस्ट वाढवण्यासाठी अनेक फ्रोजन फूडमध्ये हायड्रोजेनेटेड ऑइलच्या रूपात खूप सारी शुगर, मीठ आणि ट्रान्स फॅट टाकलं जातं. या सर्वांमुळे लठ्ठपणा वेगाने वाढतो. 

टॅग्स :Weight Loss Tipsवेट लॉस टिप्सHealth Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य