शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

Weight loss : 'या' चार अ‍ॅक्यूप्रेशर पॉइंट्सला रोज दाबा, लवकर कमी होईल वजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2019 11:29 IST

अ‍ॅक्यूप्रेशर एक चीनमधील प्राचीन उपचार पद्धत आहे. ज्यात शरीरावरील काही विशेष पॉइंट्सवर बोटांनी दबाव टाकला जातो. ​​

अ‍ॅक्यूप्रेशर एक चीनमधील प्राचीन उपचार पद्धत आहे. ज्यात शरीरावरील काही विशेष पॉइंट्सवर बोटांनी दबाव टाकला जातो. असे सांगितले जाते की, या उपचाराने तणाव, डोकेदुखी, वेदना, मळमळ, पीठाचं दुखणं आणि झोपेच्या समस्या दूर करण्यास मदत होते. तसेच या पारंपारिक थेरपीचा वापर वेगवेगळ्या मानसिक आणि शारीरिक रोगांना दूर करण्यासाठी देखील केला जातो.

(Image Credit : naturalhealers.com)

तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, अ‍ॅक्यूप्रेशर केवळ आजार दूर करण्यासाठीच फायदेशीर नाही तर याने मेटाबॉलिज्म वाढवण्यासही आणि वजन कमी करण्यासही मदत मिळते. याची खासियत म्हणजे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला कुणाच्याही मदतीची गरज पडत नाही. तुम्ही स्वत: एकटे हे करू शकता. आपल्या शरीरात भरपूर मसाज पॉइंट्स आहेत, ज्यांवर बोटांनी प्रेशर देऊन सहजपणे वजन कमी करण्यास मदत मिळू शकते.  

ओठ आणि नाकाखालील भाग

(Image Credit : wikihow.com)

ओठावरील आणि नाकाच्या मधे असलेल्या भागावर बोटाने हलकं प्रेशर द्या. या प्रेशर पॉइंटला शुइगो स्पॉट नावाने ओळखलं जातं. नियमितपणे या स्पॉटवर २ ते ३ मिनिटांपर्यंत मसाज केल्याने मेटाबॉलिज्म चांगला होतो आणि याने वजन कमी होण्यास मदत मिळते.

हाताचा कोपरा

(Image Credit : acupressurepointsguide.com)

आपला हात थोडा फोल्ड करा आणि कोपराच्या जवळीत पॉइंट शोधा. हा प्रेशर पॉइंट कोपराच्या ठीक एक इंच खाली असतो. हा पॉइंट रोज २ ते ३ मिनिटे अंगठ्याने दाबावा. याने आतड्यांची क्रिया उत्तेजित करण्यास मदत मिळते. ज्याने अर्थात वजन कमी होण्यास मदत मिळते.

इअर पॉइंट

तुमच्या कानाच्या मागच्या भागाला बोटांनी पकडा आणि त्या भागाल वर-खाली करा. जॉ वर आणि खाली करताना बोटांनी प्रेशर देत रहा. हा पॉइंट रोज १ ते २ मिनिटांपर्यंत दाबत रहा. इअर लोबच्या खाली असलेल्या या प्रेशर पॉइंटने भूक नियंत्रित राहते आणि वजन वाढत नाही.

थंब पॉइंट

(Image Credit : pinterest.fr)

अंगठ्याच्या मधल्या भागात प्रेशर पॉइंट असतो. हा पॉइंट दुसऱ्या हाताच्या बोटांनी दाबा. याने थायरॉइड ग्रंथी उत्तेजित होतात आणि मेटाबॉलिज्मला मजबूती मिळते. हा पॉइंट रोज कमीत कमी दोन मिनिटे दाबावा.

त्यासोबतच शरीरात आणखीही अनेक प्रेशर पॉइंट असतात जे वजन कमी करण्यास मदत करतात. या सर्वच प्रेशर पॉइंटवर प्रेशर देऊन बघा काय होतं. अ‍ॅक्यूप्रेशरचे साइड इफेक्ट नसतात त्यामुळे हे तुम्ही करून बघू शकता. 

टॅग्स :Weight Loss Tipsवेट लॉस टिप्सFitness Tipsफिटनेस टिप्सHealth Tipsहेल्थ टिप्स