शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

खोकला ते श्वासनास त्रास ही आहेत फुप्फुसांमध्ये पाणी भरल्याची लक्षणं, दुर्लक्ष कराल तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2023 11:31 IST

Water in lungs reasons : अडचण तेव्हा जास्त होते जेव्हा पाणी फुप्फुसात श्वसनलिकेत जमा होतं. याने व्यक्तीला श्वास घेण्यास अडचण येते. म्हणजे जीवाला धोका होऊ शकतो.

Water in lungs reasons :  फुप्फुसं आपल्या शरीरातील महत्वाचा अवयव आहे. पण अनेकदा काही लोकांच्या चुकांमुळे फुप्फुसांमध्ये किंवा छातीत पाणी भरतं. ज्याला मेडिकल भाषेत पल्मोनरी एडिमा म्हणतात. ही एक गंभीर समस्या आहे. अडचण तेव्हा जास्त होते जेव्हा पाणी फुप्फुसात श्वसनलिकेत जमा होतं. याने व्यक्तीला श्वास घेण्यास अडचण येते. म्हणजे जीवाला धोका होऊ शकतो.

फुप्फुसात पाणी भरण्याची कारणे

मेयो क्लीनिकनुसार, फुप्फुसात पाणी भरण्याचं मोठं कारण हृदयरोग आहे. पण इतरही काही कारणांमुळे फुप्फुसात पाणी भरतं. निमोनिया, काही विषारी पदार्थांच्या संपर्कात येणे, काही औषधं, छातीवर आघात होणे आणि उंचावर चढणे किंवा एक्सरसाइज करतानाही फुप्फुसात पाणी जाऊ शकतं

लक्षणे

फुप्फुसात पाणी भरल्याने श्वास घेण्यास त्रास, कफातून रक्त येणे, हृदयाचे ठोके वाढणे, त्वचा थंड होणे, श्वास घेताना धाप लागणे, थकवा, अस्वस्थता, चिंता, पाय आणि शरीराच्या इतर भागावर सूज येणे यांचा समावेश आहे. इतरही काही लक्षणे खालीलप्रमाणे सांगितली जातात.

- खोकला

- जास्त घाम येणे

- चिंता व अस्वस्थता

- घाबरल्यासारखं वाटणे

- त्वचा पिवळी पडणे

- श्वास घेताना अडचण

- हृदयाचे ठोके वाढणे

- छातीत दुखणे

- सपाट झोपल्यावर श्वास घेण्यास अडचण

- पायांवर सूज

घरगुती उपाय

mayoclinic च्या रिपोर्टनुसार, जर तुम्हाला ही समस्या असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने हेल्दी डाएट घेतली पाहिजे. तुम्ही आहारात ताजी फळं, हिरव्या भाज्या, नट्स, शेंगा, दूध, केळी, बिया यांचा समावेश केला पाहिजे.

काय करू नये?

1) शरीरात जास्त प्रमाणात मीठ असेल तर याने जास्त तरल पदार्थ तयार होतात. शरीर निरोगी ठेवायचं असेल तर मिठाचं सेवन कमी करा.

2) स्मोकिंग केल्याने या स्थितीत समस्या आणखी गंभीर होऊ शकते. इतकंच नाही तर तुम्हाला सेकंड हॅंड धुरापासूनही बचाव केला पाहिजे.

3) मद्यसेवन आणि इतर नशेच्या पदार्थांच सेवन बंद करा. याने पल्मोनरी एडिमा समस्या होऊ शकते.

4) जास्त फिजिकल अॅक्टिविटी केल्याने पल्मोनरी एडिमाची लक्षणे आणखी बिघडू शकतात. जर तुम्ही काही जड काम करत असाल तर तुम्ही तुमच्या श्वसन तंत्राला आराम देण्यासाठी दर एका तासाने छोटा ब्रेक घ्या.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य