धुम्रपान सोडण्याचा संकल्प करताय? 'या' गोष्टींची होईल मदत!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2018 01:56 PM2018-12-27T13:56:24+5:302018-12-27T13:57:11+5:30

नवीन वर्ष म्हणजे पार्टीसोबतच नवीन वर्षांच्या संकल्पाची तयारीही सुरू होते. कोणी वजन कमी करण्याचा संकल्प करतात तर कोणी स्मोकिंग सोडण्याचा. नव वर्ष सुरू झाल्यानंतर अनेकांचे हे संकल्प फक्त तेवढ्यापुरतेच मर्यादीत राहतात.

Want to quit smoking eat these herbs ways to quit smoking | धुम्रपान सोडण्याचा संकल्प करताय? 'या' गोष्टींची होईल मदत!

धुम्रपान सोडण्याचा संकल्प करताय? 'या' गोष्टींची होईल मदत!

Next

नवीन वर्ष म्हणजे पार्टीसोबतच नवीन वर्षांच्या संकल्पाची तयारीही सुरू होते. कोणी वजन कमी करण्याचा संकल्प करतात तर कोणी स्मोकिंग सोडण्याचा. नव वर्ष सुरू झाल्यानंतर अनेकांचे हे संकल्प फक्त तेवढ्यापुरतेच मर्यादीत राहतात. जर तुम्हीही या वर्षी नवा संकल्प करण्याच्या तयारीत असाल आणि  स्मोकिंग सोडण्याचा निर्धार केला असेल तर काह उपाय जाणून घेऊया. सिगरेटमध्ये असणाऱ्या निकोटीनमुळे फुफ्फुसांचा कॅन्सर, हृदय विकार आणि इतर अनेक आजार होण्याचा धोका संभवतो. धुम्रपानाच्या सवयीपासून सुटका करण्यासाठी हे पदार्थ करतील मदत... 

आलं

आल्यामध्ये अॅन्टीऑक्सिडंट आणि अॅन्टीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. जे तुमच्या रेस्पिरेट्री सिस्टमवर (Respiratory system) परिणाम करतो. हे धुम्रपानाची सवय सोडवण्यासाठी मदत करतात. आलं शरीराला उष्णता देण्याचं काम करत. हे शरीरातील विषारी घटक घामावाटे शरीराबाहेर टाकण्यासाठी मदत करतात. आपल्या शरीरातून सिगरेटचे हानिकारक पदार्थ बाहेर टाकण्यासाठी आलं मदत करतं. तसेच त्यामुळे तुम्हाला लागलेली सिगरेटची सवय सोडवण्यासही मदत होईल. 

लाल मिरची 

लाल मिरची सिगरेटमध्ये आढळून येणारे तंबाखू आणि इतर केमिकल्सला रेस्पिरेट्री सिस्टमपर्यंत पोहचवण्यापासून रोखतं. सिगरेट पिण्याची इच्छा कमी करण्यासाठी मदत करतं. लाल मिरचीमध्ये अॅन्टीऑक्सिडंट गुणधर्म असतात. जे फुफ्फुसांसाठी हानिकारक ठरतात. याचं तिखट आणि तीव्र चव धुम्रपान करण्याची इच्छा रोखण्यासाठी मदत करते. 

अश्वगंधा

अश्वगंधा सिगरेट पिण्याची इच्छा कमी करण्यासाठी मदत करतं. हे अड्रेनल ग्लँडसाठी एका टॉनिकप्रमाणे काम करतं आणि रक्तप्रवाहामध्ये कोर्टिसोलचा स्तर निर्माण करण्यासाठी मदत करतात. अश्वगंधा शारीरिक आमि भावनिक तणावासोबत शरीरात होणाऱ्या अन्य आजारांच्या लक्षणांना संतुलित करतात. हे हानिकारक विषारी पदार्थ शरीरातून बाहेर काढून टाकण्यासाठी मदत करतात. तसेच फुफ्फुसांमधील विषारी पदार्थ स्वच्छ करण्यासाठी मदत करतात. आपल्या नाश्त्यामध्ये एक ग्लास दूधामध्ये एक चमचा अश्वगंधा पावडर एकत्र करून प्यायल्याने धुम्रपान करण्याची इच्छा कमी होते. 

पेपरमिंट 

पेपरमिंटचा वापर करून तुम्ही अगदी सहज सिगरेट सोडवू शकता. कारण यामध्ये निकोटीनच्या अति सेवनाने झालेल्या पोटाच्या समस्या दूर करण्याचं गुणधर्म असतात. धुम्रपानाची सवय सोडवण्यासाठी पेपरमिंटच्या गोळ्या खाणं उत्तम उपाय आहे. याचा गंध आणि चव धुम्रपान करण्यापासून रोखण्यासाठी मदत करते. पेपरमिंटमध्ये अॅन्टीऑक्सिडंट आणि अॅन्टीफंगल गुणधर्म असतात. जे धुम्रपान करण्याची इच्छा रोखण्यासाठी मदत करतात. 

Web Title: Want to quit smoking eat these herbs ways to quit smoking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.