किशोरवयीन मुलांमध्ये जाणवते 'व्हिटॅमिन डी'ची कमतरता; अनेक गंभीर आजारांचा वाढतोय धोका
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 06:57 IST2025-10-01T06:56:28+5:302025-10-01T06:57:57+5:30
भारतीय किशोरवयीन मुलांमध्ये व्हिटॅमिन डी आणि झिंकची कमतरता सर्वाधिक आढळते, ज्यामुळे अनेक गंभीर आजारांचा धोका वाढतो, ५ टक्के किशोरवयीन मुले उच्च रक्तदाबाने ग्रस्त आहेत.

किशोरवयीन मुलांमध्ये जाणवते 'व्हिटॅमिन डी'ची कमतरता; अनेक गंभीर आजारांचा वाढतोय धोका
नवी दिल्ली: भारतीय किशोरवयीन मुलांमध्ये व्हिटॅमिन डी आणि झिंकची कमतरता सर्वाधिक आढळते, ज्यामुळे अनेक गंभीर आजारांचा धोका वाढतो, ५ टक्के किशोरवयीन मुले उच्च रक्तदाबाने ग्रस्त आहेत. केंद्र सरकारच्या अलीकडील अहवाल 'चिल्ड्रन इंडिया'मध्ये किशोरवयीन मुलांच्या आरोग्याविषयी चिंताजनक बाबी समोर आल्या आहेत. १० ते १९ वयोगटातील तब्बल २४ टक्के मुलांमध्ये व्हिटॅमिन डीची तर ३२ टक्के मुलांमध्ये झिंकची कमतरता आढळली आहे.
ग्रामीण भागात जास्त मृत्यू
ग्रामीण भागात बालमृत्युदर २८, तर शहरी भागात १८ एवढा आहे. छत्तीसगड आणि मध्यप्रदेशात सर्वाधिक ३७, तर केरळमध्ये केवळ ५ इतका सर्वात कमी दर नोंदवला गेला आहे.
किशोरावस्थेतील आरोग्याचे वाढते धोके
अहवालात असेही आढळून आले की, पौगंडावस्थेतील मुलांच्या शरीरात अनेक गंभीर आजारांची लक्षणे दिसून येतात. या वयोगटातील १०.४ टक्के मुले मधुमेहपूर्व अवस्थेत, ४.९ टक्के उच्च रक्तदाबाने आणि ४.९ टक्के उच्च कोलेस्ट्रॉलच्या समस्येने ग्रस्त आहेत. तसेच, ५ ते ९ वयोगटातील मुलांमध्ये ट्रायग्लिसराइड्सचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून आले असून, त्यामुळे भविष्यात हृदयरोगाचा धोका वाढू शकतो.