भाज्या शरिरासाठी आवश्यक, पण जास्त खाल्ल्यास सामोरे जाल गंभीर परिणामांना
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2021 16:00 IST2021-06-24T15:59:49+5:302021-06-24T16:00:46+5:30
तुम्हाला माहित आहे का? जास्त भाज्या खाण्याचे दुष्परिणामही असू शकतात. भाज्यांच्या अतिसेवनाने तुम्हाला गंभीर आजार होण्याची शक्यता असते.

भाज्या शरिरासाठी आवश्यक, पण जास्त खाल्ल्यास सामोरे जाल गंभीर परिणामांना
डॉक्टर नेहमी आपल्याला भरपूर भाज्या खाण्याचा सल्ला देतात. जास्त भाज्या खाल्ल्याने आपल्याला फायबर मिळते. त्यामुळे पचनासंबधीच्या समस्या दूर राहतात. भाज्यांमधील गुणधर्म आणि जीवनसत्व आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असतात. मात्र तुम्हाला माहित आहे का? जास्त भाज्या खाण्याचे दुष्परिणामही असू शकतात. भाज्यांच्या अतिसेवनाने तुम्हाला गंभीर आजार होण्याची शक्यता असते.
जाणून घ्या अशा कोणत्या भाज्या आहे ज्या अति प्रमाणात खाल्ल्याने तुम्हाला तोटा होतो.
बीट
बीटाचा उपयोग सँडविच, सॅलडमध्ये केला जातो. बीट हे हिमोग्लोबिनने भरलेले असते. मात्र याचे अतिसेवन तुम्हाला चांगलेच महागात पडू शकते. बीटामध्ये ऑक्सालेट नावाचा घटक असतो ज्याच्या अतिसेवनाने किडनी स्टोन होण्याचा धोका असतो.
गाजर
व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स यांनी भरलेले गाजर आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असते. पण गाजराच्या अतिसेवनाने त्याचा तुमच्या त्वचेवर परिणाम होऊ शकतो. गाजरात बीटा कॅरोटीन असते ज्याचे अतिप्रमाणात सेवन शरिरात त्वचेखाली जमा होते. यामुळे पाय, हात व तळव्याची त्वचा पिवळी किंवा नारंगी दिसू लागते.
कच्च्या भाज्या
भाज्या नीट शिजवून न खाल्ल्याचे अनेक दुष्परिणाम असतात. कोबी, ब्रोकोर्ली, फ्लावर अशा भाज्या कच्च्या खाल्ल्या जातात पण यामुळे अपचन, बद्धकोष्ठता अशा समस्या निर्माण होतात त्यामुळे भाज्या शक्यतो शिजवूनच खाव्यात.
वांग
वांग्यातील सोलनिन गॅस्ट्रोइंटेस्टाईनील समस्यांसाठी कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे वांग शिजवून आणि कमी प्रमाणात खावं. वांग खाल्ल्यानंतक उलटी, चक्कर येणे अथवा पोटदुखी अशा समस्या जाणवतात.