व्हेजिटेबल बटरमुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होतेय; राज्य सरकारचं केंद्राला पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2020 17:30 IST2020-07-22T17:19:08+5:302020-07-22T17:30:27+5:30

दुधापासून तयार होणारं बटर आणि भाज्यापासून तयार होणारं बटर यांतील फरक कळून येण्यासाठी रंग वेगवेगळा ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे. जेणेकरून सर्वसामान्यांना या दोघांमधील फरक समजून येईल. 

Vegetable butter reducing immunity maharashtra government letter to center | व्हेजिटेबल बटरमुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होतेय; राज्य सरकारचं केंद्राला पत्र

व्हेजिटेबल बटरमुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होतेय; राज्य सरकारचं केंद्राला पत्र

महाराष्ट्रसरकारने देशातील सर्वच राज्यांमध्ये कोरोना माहामारी वाढण्याचं कारण व्हेजिटेबल बटर असल्याचे सांगितले आहे. महाराष्ट्रसरकारनेकेंद्र सरकारला पत्र लिहून भाज्यापासून तयार होणारं बटर आणि दुधापासून तयार होणारं बटर यांमध्ये फरक असायला हवा असे सांगितले आहे. तसंच दुधापासून तयार होणारं बटर आणि भाज्यापासून तयार होणारं बटर यांतील फरक कळून येण्यासाठी रंग वेगवेगळा ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे. जेणेकरून सर्वसामान्यांना या दोघांमधील फरक समजून येईल. 

महाराष्ट्र सरकाराने या पत्रात म्हटले आहे की कोरोना व्हायरसच्या माहामारीच्या काळात  दुग्धजन्य पदार्थांचे मोठ्या प्रमावर लोक सेवन करत आहे.  पण बाजारात उपलब्ध होणारं स्वस्त बटर दुधापासून तयार झाले आहे की भाज्यांपासून याबाबत ग्राहकांना कल्पना नसते. या बटरच्या सेवनाने रोगप्रतिकारकशक्ती वाढत नाही. म्हणूनच महाराष्ट्र सरकारने केंद्र शासनाला या दोन्ही प्रकारच्या बटरचा रंग बदलण्याचं आवाहन केलं आहे. जेणेकरून लोकांना दुग्धजन्य पदार्थ ओळखता येतील.

महाराष्ट्र सरकारचे मंत्री सुनील केदार यांनी सांगितले की, याबाबात केंद्र सरकारला पत्राद्वारे माहिती देण्यात आली आहे. यासोबतच  महाराष्ट्रातही दुधापासून तयार झालेल्या बटरचे  जास्तीत जास्त उत्पादन कसे केले जाईल याबाबत सरकारी दूध कंपन्याशी चर्चा केली जात आहे. तसंच कोरोना व्हायरसच्या वाढत्या रुग्ण संख्येमागे दुग्धजन्य पदार्थ न वापरता  इतर पदार्थाचे सेवन  करणं हे कारण असू शकतं. कारण  त्यामुळे रोगप्रतिकारकशक्तीवर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता असते. 

दरम्यान सध्याच्या वातावरणात रोगप्रतिकारकशक्ती चांगली असेल तरच आपण आजारांशी लढू शकतो. कोरोनाच्या माहामारीने जगभरात हाहाकार निर्माण केला आहे. अशा स्थितीत कोरोना व्हायसरपासून बचाव करण्यासाठी रोगप्रतिकारकशक्ती चांगली असणं आवश्यक आहे. 

आता कोरोना चाचणी २० मिनिटात होणार; 'या' चाचणीने कमी होईल संक्रमणाचा वेग, तज्ज्ञांचा दावा

कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे मेंदूवर 'असा' होतोय परिणाम; तज्ज्ञांनी सांगितली नवी लक्षणं

Web Title: Vegetable butter reducing immunity maharashtra government letter to center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.