आता कोरोना चाचणी २० मिनिटात होणार; 'या' चाचणीने कमी होईल संक्रमणाचा वेग, तज्ज्ञांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2020 10:06 AM2020-07-22T10:06:17+5:302020-07-22T10:25:50+5:30

CoronaVirus News & Update : ऑस्ट्रेलियातील संशोधकांनी २० मिनिटात कोरोनाची तपासणी करण्याची नवी चाचणी सुरू केली आहे. तज्ज्ञांच्यामते या ब्लड टेस्टच्या साहाय्याने कोरोनाची चाचणी करता येऊ शकते. 

Coronavirus test in 20 minutes only by new blood sample plasma therapy | आता कोरोना चाचणी २० मिनिटात होणार; 'या' चाचणीने कमी होईल संक्रमणाचा वेग, तज्ज्ञांचा दावा

आता कोरोना चाचणी २० मिनिटात होणार; 'या' चाचणीने कमी होईल संक्रमणाचा वेग, तज्ज्ञांचा दावा

Next

कोरोना व्हायरसचं वाढतं संक्रमण थांबवण्यासाठी सर्वच देशातील शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार जास्तीत जास्त लोकांची तपासणी केल्यास कोरोनाचे वाढते संक्रमण कमी होण्यास मदत होईल. कोरोनाच्या तपासणीसाठी आरटी,पीसीआर टेस्टचा वापर केला जात आहे. या टेस्टसाठी खूप वेळ लागत होता. पण कमी वेळात रिपोर्ट देतील अशा अनेक चाचण्या समोर आल्या आहेत.  ऑस्ट्रेलियातील संशोधकांनी २० मिनिटात कोरोनाची तपासणी करण्याची नवी चाचणी सुरू केली आहे. तज्ज्ञांच्यामते या ब्लड टेस्टच्या साहाय्याने कोरोनाची चाचणी करता येऊ शकते. 

ऑस्ट्रेलियातील  तज्ज्ञांनी विकसित केलेल्या पद्धतीने फक्त २० मिनिटात कोरोना चाचणी करता येऊ शकते. जर एखाद्या व्यक्तीला कोरोनांच संक्रमण झालं असेल  तर काही वेळातच या टेस्टच्या माध्यमातून माहित करून घेता येऊ शकतं. मेलबर्नच्या मोनाश युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार संशोधकांनी एक खास ब्लड टेस्ट विकसित केली आहे.  याद्वारे कोरोना व्हायरसचं वाढतं संक्रमण नियंत्रणात ठेवता येऊ शकतं.

 

कोरोनाची तपासणी करण्यासाठी व्यक्तीच्या शरीरातून रक्ताच्या नमुन्यांमधून २५ मायक्रोलीटर प्लाज्मा घेतला जाणार आहे. जर एखाद्या व्यक्तीला कोरोनाचं संक्रमण झालं आले अशा व्यक्तीच्या रक्ताच्या नमुन्यांमध्ये बदल झालेला दिसून येतो. डोळ्यांनी हा बदल पाहता येऊ शकतो. कोरोना पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह रिपोर्ट देण्यासाठी जवळपास २० मिनिटांचा कालावधी लागतो. 

कोरोनाची चाचणी स्बॅब किंवा पीसीआर टेस्टच्या माध्यमातूनच केली जात आहे. आता संशोधकांनी दावा केला आहे की या नवीन रक्त तपासणी चाचणीसाठी एका  तासात २०० ब्लड सँपल्सची केली जाऊ शकते. ज्या रुग्णांलयांमध्ये डायग्नोस्टिक मशीन उपलब्ध आहे. अशा रुग्णालयांमध्ये एका तासात तब्बल ७०० ब्लड सँपल्सची चाचणी केली जाऊ शकते. म्हणजेच दिवसभरातील २४ तासात १६ हजार ८०० लोकांची तपासणी करता येऊ शकते. 

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या देशात कोरोना  संक्रमणाचा वेग जास्त आहे. अशा देशात कोरोनाला रोखण्यासाठी ही चाचणी परिणामकारकठरू शकते. लवकरात लवकर रुग्णांचे उपचार केले जाऊ शकतात. सध्या तज्ज्ञांनी चाचणीच्या या नवीन मशीच्या पेटेंटसाठी निवेदन केले आहे. लवकरच मोठ्या प्रमाणावर या चाचणीसाठी मशीन्सचं उत्पादन सुरू केले जाणार आहे.

कोरोनाच्या लसीने आशेचा किरण दाखवल्यानंतर; आता WHO च्या तज्ज्ञांनी दिले स्पष्टीकरण

कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे मेंदूवर 'असा' होतोय परिणाम; तज्ज्ञांनी सांगितली नवी लक्षणं

Web Title: Coronavirus test in 20 minutes only by new blood sample plasma therapy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.