कोरोनाच्या लसीने आशेचा किरण दाखवल्यानंतर; आता WHO च्या तज्ज्ञांनी दिले स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2020 04:58 PM2020-07-21T16:58:34+5:302020-07-21T17:09:54+5:30

CoronaVirus News & Latest Updates : लसीच्या शोधात माहिती आणि संसाधनांची खूप मदत होत आहे. लँसेट जर्नलमध्ये जागतिक आरोग्य संघटनेचे डॉक्टर मायकल रेयान यांचा अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे.

CoronaVirus : who on coronavirus vaccine the lancet report michael joseph ryan | कोरोनाच्या लसीने आशेचा किरण दाखवल्यानंतर; आता WHO च्या तज्ज्ञांनी दिले स्पष्टीकरण

कोरोनाच्या लसीने आशेचा किरण दाखवल्यानंतर; आता WHO च्या तज्ज्ञांनी दिले स्पष्टीकरण

Next

कोरोना व्हायरसच्या संक्रमणाचा सामना संपूर्ण जगभरासह भारतालाही करावा लागत आहे. जागितक आरोग्य संघटनेनं तयार केलेल्या अहवालानुसार कोरोनाच्या लसीचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. पण आता लस तयार करण्यासाठी खूप मोठा प्रवास करावा लागणार आहे. कारण मोठ्या प्रमाणात वैद्यकिय परिक्षण केलं जाणार आहे. लसीच्या शोधात माहिती आणि संसाधनांची खूप मदत होत आहे. लँसेट जर्नलमध्ये जागतिक आरोग्य संघटनेचे डॉक्टर मायकल रेयान यांचा अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे.

डॉक्टर मायकल रेयान हे ऑक्सफोर्ड युनिव्हरर्सिटीचे तज्ज्ञ सुद्धा आहेत. अहवालात दिलेल्या माहितीनुसार लसीच्या चाचणीदरम्यान शेकडो संक्रमितांना लस देण्यात आली होती. त्यानंतर लस घेतलेल्या लोकांच्या शरीरात व्हायरसशी लढण्याची क्षमता विकसित झाली. ब्रिटनची ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि एक्स्ट्राजेनका या कंपनीकडून केले जाणारे लसीचे परिक्षण हे पूर्णपणे सुरक्षित आहे. तसंच  लसीमुळे शरीरात व्हायरसशी लढण्याची क्षमता वाढते.

द लँसेंट जर्नलच्या अहवालानुसार कोरोना लसीच्या सिंगल डोजने माणसांवर सकारात्मक परिणाम घडून आले आहेत. ही लस विकसित करणाऱ्या तज्ज्ञ सारा गिल्बर्ड यांनी दिलेल्या माहितीनुसार लस तयार झाली पण अजूनही खूप काम बाकी आहे. सगळी परिक्षणं यशस्वीरित्या पार पडल्यानंतर लसी तयार असल्याची घोषणा केली जाणार आहे.  सुरूवातीच्या  सकारात्मक परिणामांनी आशेचा किरण दाखवला आहे. 

या रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की AZD1222 या लसीचे कोणतेही साईड इफेक्ट्स दिसून आलेले नाहीत. कोरोना विषाणूंविरुद्ध अंटीबॉडी विकसित करण्यासाठी ही लस फायदेशीर ठरत आहे. सध्या ब्राझिल, दक्षिण आफ्रिका आणि ब्रिटेनमध्ये या लसीची चाचणी सुरू असून कोरोनाची लस  दिल्यानंतर कोणत्याही स्वयंसेवकांमध्ये गंभीर लक्षणं दिसून आली नाहीत.

फक्त शरीरालाच नाही तर मेंदूलाही नुकसान पोहोचवू शकतात तुमच्या 'या' चुकीच्या सवयी

धोका वाढला! कोरोनापेक्षाही महाभयंकर विषाणू पसरण्याचा धोका; तज्ज्ञांनी सांगितलं 'हे' कारण

Web Title: CoronaVirus : who on coronavirus vaccine the lancet report michael joseph ryan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.