Vaccine 'only way' to end pandemic : 'या' मार्गानं होणार कोरोना महामारीचा अंत; १०४ वर्षीय आजींनी सांगितला उपाय
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2021 14:11 IST2021-03-29T14:01:24+5:302021-03-29T14:11:56+5:30
Vaccine 'only way' to end pandemic : या आजींची नात गेल्या अनेक वर्षांपासून वैद्यकिय क्षेत्रात कार्यरत असल्यामुळे तिनं आजींना लसीकरणाचं महत्व पटवून दिलं होतं.

Vaccine 'only way' to end pandemic : 'या' मार्गानं होणार कोरोना महामारीचा अंत; १०४ वर्षीय आजींनी सांगितला उपाय
कोरोनाच्या माहामारीनं गेल्या वर्षभरापासून कहर केला आहे. गेल्यावर्षी जसजसे लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात येत होते तसतसं कोरोनाची भीती लोकांच्या मनातून कमी होत होती. पण आता पुन्हा कोरोनाच्या उद्रेकानं चिंताजनक वातावरण पसरलं आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे पुन्हा एकदा लॉकडाऊन लागणार का? अशी भीती लोकांच्या मनात आहे. लसीकरणाला सुरूवात झाल्यानंतर कोरोनाचा वेग कमी होईल असा अंदाज लावण्यात आला होता. पण तसं काही झालेलं नाही. त्यामुळे कोरोनाची माहामारी नष्ट होणार तरी कधी? असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे.
रोममधील एका १०४ वर्षीय आजींनी कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला आहे. या आजी कोरोना लसीचा दुसरा डोस घेणाऱ्या सगळ्यात वृद्ध व्यक्ती ठरल्या आहेत. कोरोनाचा पूर्णपणे प्रतिबंध करण्यासाठी या आजींनी दोन्ही डोस घेतले आहेत. बुशारेस्टच्या मुलांच्या पॅलेसमध्ये नातेवाईकांसमवेत त्या राहत आहेत. १९१६ मध्ये जन्मलेल्या झोइया बाल्टॅग यांनी रविवारी फाइजर लसीचा दुसरा डोस घेतला आणि माहामारीचा सामना करण्याचा हाच एकमेव मार्ग असल्याचे जाहीर केले.
सावधान! हृदयाच्या आजारासाठी कारणीभूत ठरतात 'या' ५ सवयी; सर्वाधिक तरूण होताहेत शिकार
''कोरोना व्हायरसपासून मुक्त होण्यासाठी लस हा एकमेव पर्याय आहे. '' (Vaccine 'only way' to end pandemic) असं त्या यावेळी म्हणाल्या. या आजींची नात गेल्या अनेक वर्षांपासून वैद्यकिय क्षेत्रात कार्यरत असल्यामुळे तिनं आजींना लसीकरणाचं महत्व पटवून दिलं होतं. बाल्टॅग या स्पॅनिश फ्लूची माहामारी येण्याच्या २ वर्ष आधी जन्माला आल्या होत्या.
आता कोरोना व्हायरसपासून बचावसाठी फायजरच्या लसीच्या पहिला डोस घेतल्यानंतरही त्यांच्यात कोणतेही साईड इफेक्ट्स दिसून आले नाहीत. लसीकरणानंतर स्थानिक अधिकाऱ्यांनी या आजींचा सत्कारही केला. युरोपमधील बर्याच देशांप्रमाणेच रोमानियादेखील आता या व्हायरसशी लढा देत आहे. रविवारी देशभरात मोठ्या संख्येनं रूग्णांची नोंद करण्यात आली आहे.