शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

चक्कर येतेय म्हणून जास्त मीठ खाताय? असं करणं पडू शकतं महागात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2019 13:13 IST

आपल्या जेवणाची चव वाढविण्याचं काम मीठ करतं, हे तर आपण सारेच जाणतो. मिठाशिवाय जेवण अगदी बेचव लागतं. योग्य प्रमाणात मीठ असेल तर मात्र पदार्थाच्या चवीची बातच न्यारी. पण जास्त मीठ आरोग्यासाठी घातक असल्याचे आपण सारेच जाणतो.

आपल्या जेवणाची चव वाढविण्याचं काम मीठ करतं, हे तर आपण सारेच जाणतो. मिठाशिवाय जेवण अगदी बेचव लागतं. योग्य प्रमाणात मीठ असेल तर मात्र पदार्थाच्या चवीची बातच न्यारी. पण जास्त मीठ आरोग्यासाठी घातक असल्याचे आपण सारेच जाणतो. अनेकदा डॉक्टर्सही मीठ कमी खाण्याचा सल्ला देत असतात. मिठामध्ये सोडियम असतं. अनेकदा लोक डोकेदुखीवर किंवा चक्कर येण्यावर उपाय म्हणून जास्त मिठाचे सेवन करतात. पण असं करणं आरोग्यासाठी घातक ठरू शकतं, असं आम्ही नाही तर संशोधकांनी सांगितलं आहे. 

(Image Credit : Medical News Today)

संशोधकांनी सोडियमवर केलेल्या संशोधनातून त्याच्या सेवनाने होणाऱ्या परिणामांवर सखोल अभ्यास केला आहे. त्यामध्ये एखाद्या व्यक्तीला कधी कधी फक्त उभं राहिल्यानंतर चक्कर येते आणि डोकेदुखीच्या त्रासाला सामोरं जावं लागतं. अनेकदा यामध्ये रक्तातील शुगर कमी झाली किंवा सोडियम लेव्हल कमी झाली असं समजण्यात येतं. परंतु संशोधनानुसार, गुरूत्वाकर्षणामुळे ब्लड प्रेशर कमी झाल्यामुळे होत असल्याचं सिद्ध झालं असून वयोवृद्ध व्यक्तींना असं होणं ही सामान्य गोष्ट असल्याचेही समोर आले आहे.

संशोधनादरम्यान, सोडियमचे जास्त सेवन केल्यामुळे येणारी चक्कर रोखण्यासाठी खरचं फायदा होतो का? याचा अभ्यास करण्यात आला. यामध्ये बसण्याच्या पद्धतीसोबतच उभं राहण्याच्या पद्धतींचाही अभ्यास करण्यात आला. 

बेथ इजराइल डेकोनेस मेडिकल सेंटर (बीआईडीएमसी)च्या संशोधकांना असं आढळून आलं की, सोडियमच्या अधिक सेवनाने येणारी चक्कर कमी होत नाही तर ती वाढते. बीआईडीएमसी बोस्टनचे संशोधक स्टीफेन जुराशेक यांनी सांगितले की, 'आम्ही करत असलेले संशोधन हे क्लिनिकल आणि रिसर्च बेस्ड आहे.'

स्टीफेन जुराशेक यांनी सांगितले की, आम्ही केलेल्या संशोधनातून सिद्ध झालेल्या गोष्टींमुळे डॉक्टरांना अशा रूग्णांना योग्य उपचार करण्यासाठी मदत करतील. तसेच या उपचारादरम्यान सावधानता बाळगण्याचा सल्लाही देतात. याव्यतिरिक्त आमच्या संशोधनातील निष्कर्ष सोडियमचे प्रमाण आणि आहार यांबाबत सविस्तर संशोधन करण्याचा सल्लाही देतात. 

सोडियमचे अधिक सेवन हृदयासाठीही घातक

अमेरिकेमध्ये करण्यात आलेल्या एका संशोधनातून एक गोष्ट समोर आली आहे की, ज्या व्यक्ती गरजेपेक्षा दुप्पट मिठाचे सेवन करतात. त्याचा सरळ परिणाम त्यांच्या वयावर आणि हृदयाच्या आरोग्यावर होत असतो. अमेरिकेतील सेंटर्स फॉर डिजीज कंट्रोल अ‍ॅन्ड प्रिवेंशन (सीडीसी) द्वारे करण्यात आलेल्या संशोधनातून सिद्ध झाल्यानुसार, अधिक मिठाचे सेवन करणं ब्लड प्रेशर वाढण्यास परिणामकारक ठरतं. ज्यामुळे हृदयाच्या आरोग्यावर विपरित परिणाम दिसून येतात. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी जर मिठाचे प्रमाण कमी केलं तर मात्र ब्लड प्रेशरही कमी होतं. ज्यामुळे हार्ट अटॅकचा धोका आणखी वाढतो. 

का सोडियम ठरतं आरोग्यासाठी धोकादायक?

शरीरावर सोडियम आणि पोटॅशियमचा होणारा परिणाम समजून घेण्यासाठी अमेरिकेतील वैज्ञानिकांनी 15 वर्षांपर्यंतच्या 12 हजार लोकांवर संशोधन केलं. या संशोधनादरम्यान, 2270 लोकांचा मृत्यू हृदयविकाराचा झटका आल्यामुळे, ब्लड क्लॉटिंगमुळे झाला होता. या संशोधनातून सिद्ध झाल्यानुसार, अधिकाधिक लोक सोडियम आणि कमी पोटॅशियमचं सेवन करण्याच्या चुका करतात. 

ब्लड प्रेशर वाढतं

अधिक सोडियम रक्त प्रवाह वाढविण्यास मदत करतं. तर दुसरीकडे पोटॅशिअम ते कमी करतं. ज्यामुळे शरीराचं संतुलन व्यवस्थित राहण्यास मदत होते. जर सुरुवातीलाच जास्त मिठाचं सेवन केलं तर ब्लड प्रेशर वाढल्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता 200 टक्क्यांनी वाढते. 

टॅग्स :ResearchसंशोधनHealth Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यFitness Tipsफिटनेस टिप्सHeart Attackहृदयविकाराचा झटकाHeart Diseaseहृदयरोग