शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
5
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
6
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
7
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
8
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
9
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
10
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
11
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
12
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
13
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
14
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
15
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
16
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
17
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
18
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
19
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
20
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
Daily Top 2Weekly Top 5

अतिदुर्गम भागात सूक्ष्म अन्नद्रव्य घटकांच्या वापरावर भर! पंदेकृविचा उपक्रम : आदिवासी शेतकर्‍यांना प्रशिक्षण

By admin | Updated: February 14, 2015 23:51 IST

अतिदुर्गम भागात सूक्ष्म अन्नद्रव्य घटकांच्या वापरावर भर!

अतिदुर्गम भागात सूक्ष्म अन्नद्रव्य घटकांच्या वापरावर भर!
पंदेकृविचा उपक्रम : आदिवासी शेतकर्‍यांना प्रशिक्षण
अकोला : आदिवासी आणि अतिदुर्गम भागात कुपोषणासारख्या समस्यांचा सामना करण्यासाठी सूक्ष्म अन्नद्रव्य घटकांचा वापर करून पोषक आहार आदिवासींना मिळावा, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने अतिदुर्गभ भागातील शेतकर्‍यांसाठी विविध उपक्रम राबविले आहेत. या उपक्रमाचा एक भाग म्हणून ९ फेब्रुवारी रोजी मेळघाटातील चांदपूर-टेंभ्रूसोंडा या दुर्गम भागातील गावात शेतकर्‍यांना पोषक आहार व आरोग्य आणि सूक्ष्म अन्नद्रव्य घटक याबाबत प्रशिक्षण देण्यात आले.
मानवी आरोग्यासाठी अन्नद्रव्यातील सूक्ष्म घटक महत्त्वपूर्ण आहेत. विशेषत: ज्या भागात कुपोषणाची समस्या अधिक आहे, अशा भागात सूक्ष्म अन्नघटकांचे महत्त्व अधिकच वाढते. कुपोषणासारख्या समस्यांवर मात करण्यासाठी आरोग्यविषयक उपाययोजनांसोबतच पोषक आहारही महत्त्वाचा आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मृद विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभागातर्फे अखिल भारतीय समन्वयित सूक्ष्म व दुय्यम अन्नद्रव्य प्रकल्पातील आदिवासी साहाय्यक योजनेंतर्गत आदिवासींच्या पीक उत्पादन वाढीसाठी सूक्ष्म अन्नद्रव्याचे महत्त्व पटवून देण्याकरिता कार्यशाळा घेतल्या जात आहेत. अमरावती जिल्‘ात मेळघाटामध्ये या कार्यशाळा घेण्यात येत आहेत. पंदेकृविचे संशोधक संचालक डॉ. डी.एम मानकर, मृद विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभागप्रमुख प्रा.डी.बी. तामगाडगे यांच्या उपस्थितीत चांदपूर-टेंभ्रूसोंडा येथे शेकडो आदिवासींना सुधारित तंत्रज्ञानाचे धडे देण्यात आले. (प्रतिनिधी)
बॉक्स
जस्ताचा वापर
गहू व हरभरा पिकांकरिता जस्ताचा वापर आवश्यक आहे. जस्त वापरासंबंधी आणि आधुनिक पद्धतीने शेती करून पोषक अन्नधान्य पिकांबाबत शास्त्रज्ञांनी माहिती दिली. त्यामुळे आदिवासीबहुल भागातील कुपोषणासारख्या समस्येचे निराकरण करण्यास मदत होणार आहे.
....................