सतत काहीना काही खाण्याची इच्छा म्हणजे 'या' गंभीर आजाराचा संकेत, वेळीच ओळखा नाही तर होईल पश्चाताप
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 11:10 IST2026-01-22T11:04:37+5:302026-01-22T11:10:52+5:30
Why urge to eat again and again: जेवण केल्यावरही पुन्हा पुन्हा भूक लागत असेल तर याला सामान्य लक्षण समजू नका. कारण हे लक्षण एका गंभीर आजाराचं असू शकतं.

सतत काहीना काही खाण्याची इच्छा म्हणजे 'या' गंभीर आजाराचा संकेत, वेळीच ओळखा नाही तर होईल पश्चाताप
Why urge to eat again and again: बरेच लोक असे असतात ज्यांना जेवण केल्यावरही सतत काहीना काही खाण्याची इच्छा होत राहते. जर आपल्यासोबतही असं होत असेल तर या लक्षणाला सामान्य समजण्याची चूक अजिबात करू नका. हेल्थ एक्सपर्ट सांगतात की, हा डायबिटीसचा संकेत असू शकतो. आधीच भारतात डायबिटीसच्या केसेस खूप जास्त वाढत आहेत. येत्या काही वर्षात भारतात डायबिटीसचे रूग्ण सगळ्यात जास्त असतील. आत्ताच भारताला डायबिटीसची राजधानी म्हटलं जातं. यावरून या सायलेंट किलर आजाराचा वाढता पसारा आपण समजू शकता.
पुन्हा पुन्हा भूक का लागते?
काही खाल्ल्यानंतरही पुन्हा पुन्हा भूक लागण्याच्या स्थितीला पॉलीफेगिया असं म्हटलं जातं. पॉलीफेगिया डायबिटीस काही सामान्य लक्षणांपैकी एक आहे. जेव्हा इन्सुलिनची कमतरता होऊ लागते आणि यामुळे ग्लूकोज सेल्सपर्यंत पोहोचू शकत नाही, तेव्हा शरीरात ऊर्जेची कमतरता होते. हेच कारण आहे की, शरीराला सतत भूकेचा संकेत मिळतो. डायबिटीसमध्ये नेहमीच गोड किंवा हाय कार्ब्स फूड्स खाण्याची इच्छा अधिक होते.
काळजी करण्यासारखी लक्षणं
डायबिटीसमध्ये पुन्हा पुन्हा भूक लागणे आणि एनर्जीची कमतरता जाणवणे या लक्षणांसोबतच इतरही लक्षणं दिसू लागतात. पुन्हा पुन्हा लघवी लागणे किंवा खूप जास्त तहान लागणे हे सुद्धा या सायलेंट किलर आजाराचे संकेत असू शकतात. तसेच अचानक वजन कमी होणे आणि धुसर दिसणे ही सुद्धा डायबिटीसची लक्षणं असू शकतात. त्यामुळे यांकडे अजिबात दुर्लक्ष करू नये.
काय काळजी घ्याल
जर आपल्याला डायबिटीससारख्या सायलेंट किलर आणि आयुष्यभर सोबत राहणाऱ्या आजारांपासून दूर रहायचं अशेल तर सगळ्यात आधी लाइफस्टाईलमध्ये बदल करा. त्याशिवाय आहारात पौष्टिक आणि संतुलित ठेवा. हेल्दी लाइफस्टाईल आणि आहाराने डायबिटीस तर आपल्यापासून दूर राहतोच, सोबतच इतर आजारांचाही धोका कमी होतो. नियमितपणे व्यायाम करा. वजन नियंत्रित ठेवा.