अरे व्वा! कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखणारा नेजल स्प्रे लवकरच बाजारात येणार, तज्ज्ञांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2021 04:05 PM2021-01-25T16:05:29+5:302021-01-25T16:15:19+5:30

CoronaVirus News & Latest Updates : या स्प्रेमुळे कमीत कमी वेळात कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्याचं काम होऊ शकतं.

Uk scientists finalize nejal spray that prevented covid-19 could be in shops by summer | अरे व्वा! कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखणारा नेजल स्प्रे लवकरच बाजारात येणार, तज्ज्ञांचा दावा

अरे व्वा! कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखणारा नेजल स्प्रे लवकरच बाजारात येणार, तज्ज्ञांचा दावा

googlenewsNext

कोरोना व्हायरसच्या माहामारीने संपूर्ण जगभरावर परिणाम झालेला दिसून येत आहे. हळूहळू आता लोकांना कोरोनासोबत जगायची सवय झाली असून दुसरीकडे  लसीकरणाला सुरूवात झाल्यामुळे लोकांमध्ये उत्साहाचं वातावरण दिसून येत आहे. दरम्यान कोरोना रोखण्यासाठी वेगवेगळ्या अत्याधुनिक उपाययोजना कशाप्रकारे करता येतील यासाठी सर्वत्र प्रयत्न सुरू आहेत. ब्रिटनच्या (Britain) बर्मिंगहॅम विद्यापीठाच्या वैज्ञानिकांनी एक खास ‘नेजल स्पे’ बनवला आहे. या स्प्रेमुळे कमीत कमी वेळात कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्याचं काम होऊ शकतं. यावर्षी उन्हाळ्यापर्यंत हा स्प्रे औषधांच्या दुकानात उपलब्ध होईल, असा दावा ब्रिटनच्या एका वृत्तपत्रानं केला आहे.

कसा उपयोग होणार?

मुख्य संशोधक डॉ. रिचर्ड मोक्स यांनी ‘द संडे टेलिग्राफ’शी बोलताना सांगितले की, ''सार्वजनिक ठिकाणी वावरताना पाळावी लागणारी बंधनं कमी करण्यासाठी तसंच शाळा पुन्हा सुरु होण्यासाठी याचा उपयोग होईल. अर्थात या ‘नेजल स्प्रे’ ला अजून कोणतंही नाव दिलेलं नाही. हा स्प्रे बनवण्यासाठी ज्या प्रकारचे केमिकल्स वापरण्यात आले आहेत, त्यांना मेडिकल उपयोगासाठी वापरण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. तसंच ते माणसांना वापरासाठी देखील सुरक्षित आहेत.''

CoronaVirus : Anti corona nasal spray to kill virus in few hours and prevent infection | आता नेझल स्प्रे ने कोरोनापासून होईल बचाव; ४८ तासात व्हायरस होणार नष्ट, तज्ज्ञांचा दावा

दोन महिन्यानंतर हा स्प्रे इतरांना वापरण्यास उपलब्ध होईल अशी आशा मोक्स यांना आहे. कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून हा स्प्रे साधारणपणे चारवेळा वापरावा लागेल याबाबत अधिक माहिती शास्त्रज्ञांनी दिली आहे. गर्दीच्या ठिकाणीसुद्धा तुम्ही या स्प्रेचा वापर करू शकता.  याशिवाय नव्या कोरोना व्हायरसमुळे ब्रिटनमधील अनेक भागांमध्ये कडक लॉकडाऊन लागू करण्यात आलं आहे. त्याचबरोबर अन्य देशांनीही ब्रिटनशी होणाऱ्या वाहतुकीवर कडक निर्बंध घातले आहेत. सावधान! हिवाळ्यात पाणी कमी पिणं पडू शकतं महागात, किडनीसहीत 'या' अवयवांवर होतो गंभीर परिणाम....

दरम्यान  गेल्या २४ तासांत १३ हजार २०३ नवीन कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून, १३१ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.  केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशभरातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता ०१ कोटी ०६ लाख ६७ हजार ७३६ वर पोहचली आहे. तर आतापर्यंत ०१ कोटी ०३ लाख ३० हजार ८४ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच ०१ लाख ५३ हजार ४७० रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे, असेही आरोग्य विभागाने सांगितले. Corona Vaccine: कोरोना लसीविषयी गैरसमजूत बाळगू नका; अफवांकडे दुर्लक्ष करा, परंतु 'हे' लक्षात ठेवा 

गेल्या २४ तासांत १३ हजार २९८ जण कोरोना मुक्त झाले असून, त्यांना घरी सोडण्यात आले आहे. देशात ०१ लाख ८४ हजार १८२ रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत. १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली असून, आतापर्यंत १६ लाख १५ हजार ५०४ जणांना कोरोना लस देण्यात आली आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
 

Web Title: Uk scientists finalize nejal spray that prevented covid-19 could be in shops by summer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.