Top five healing crystals that may help you to lose weight | क्रिस्टलनेही कमी करता येतं वजन? जाणून घ्या हे कसं होतं...

क्रिस्टलनेही कमी करता येतं वजन? जाणून घ्या हे कसं होतं...

सामान्यपणे वजन कमी करण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करतात. काही लोक एक्ससाइज तर काही लोक डायटिंग करतात. पण या सर्वच उपायांसोबतच काही ज्योतिषी उपाय सुद्धा लोक करतात. ज्याने लोकांना वजन कमी होण्यास मदत होते. काही पारदर्शक रत्ने किंवा खास खड्यांमध्ये विशेष प्रकारची एनर्जी असते. या एनर्जीमुळे केवळ पचनक्रियाच सुधारते असं नाही तर शरीराचं मेटाबॉलिज्मही मजबूत होतं. तसेच याने खाण्या-पिण्याच्या सवयींवरही नियंत्रण ठेवलं जात असल्याचा दावा आम्ही नाही लोक करतात. 

हे क्रिस्टल म्हणजेच रत्ने व्यक्तीवर वेगवेगळ्या प्रकारे काम करतात. काही लोकांना फार लवकर परिणाम बघायला मिळतो, तर काही लोकांना वजन कमी करण्यासाठी वेळ लागतो. वजन कमी करण्यासाठी तुम्ही हे क्रिस्टल वापरू शकता. पण याने वजन कमी करण्यासाठी फायदा कसा होतो, हे जाणून घेऊ...

लोलाइट

या क्रिस्टलचा वापर केल्यास वजन कमी करण्यास मदत मिळत असल्याचा दावा केला जातो. कारण या स्टोनचा वापर शरीरावर केला तर शरीरातील फॅट नष्ट होऊ लागतं. ज्याचा परिणाम म्हणजे शरीराला एनर्जी मिळते. आणि मेटाबॉलिज्म मजबूत होतं. त्यासोबतच क्रिस्टलमध्ये इतरही गुण असतात. ज्याने वेगवेगळे विकार दूर होतात.

पिकासो मार्बल

वजन कमी करण्यासाठी हा क्रिस्टल वेगळ्या प्रकारे कार्य करतो. या क्रिस्टलमधील एनर्जी मेटाबॉलिज्म मजबूत करते आणि मेटाबॉलिज्म रेगुलेट करण्याचं काम करते. याचं कंपण तुमच्या आत्म नियंत्रणाला मजबूत करण्यास मदत करतं. सोबतच याने ओव्हरइटिंग रोखण्याचं कामही होतं. या स्टोनची एनर्जी मेटाबॉलिज्मचा वेग वाढवण्यासोबतच वजन कमी करण्याच्या प्रयत्नादरम्यान तुम्हाला शांत ठेवते.  

जेस्पीट

हा स्टोन वजन  कमी करण्यासाठी अधिक फायदेशीर मानला जातो. याने मेटाबॉलिज्म उत्तेजित होतं आणि याची प्रक्रिया अधिक चांगली होते. या क्रिस्टलने ऊर्जा उत्सर्जित होते, ज्यामुळे तुमच्या खाण्या-पिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवलं जातं. तसेच या क्रिस्टलमुळे वजनही कमी होतं. 

एपिडोट

या किस्टलमध्ये भरपूर प्रमाणात ऊर्जा असते, जी व्यक्तीला भावनात्मक रूपाने मजबूत करते आणि डिप्रेशनच्या समस्येपासून आराम देण्यासही मदत करते. त्यासोबतच या क्रिस्टलमुळे वाढलेलं अधिक वजनही कमी केलं जातं. हा क्रिस्टल तुम्ही शरीरावर वापरू शकता किंवा जवळ ठेवू शकता. 

टोपाज म्हणजेच पुखराज

पुखराज एक फॅट बर्निंग क्रिस्टल आहे. ज्याने तुमच्या शरीरातील जमा अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत मिळते. जर तुम्ही हेव्ही फूड खाण्याचे शौकीन असला तर पुखराजमुळे तुम्हाला वजन कमी करण्यास मदत करू शकतो. कॅलरी बर्न करण्यासाठीही या क्रिस्टल फायदेशीर मानला जातो.

(टिप : क्रिस्टलमुळे वजन कमी होतं असा दावा आम्ही करत नाही. वरील लेखातील मुद्दे केवळ माहिती म्हणून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय वरील कोणताही उपाय करू नये.)


वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Top five healing crystals that may help you to lose weight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.