शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
4
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
5
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
6
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
7
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
8
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
9
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
10
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
11
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
12
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
13
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
14
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
15
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
16
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
17
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
18
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
19
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
20
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

आई, बाबा, बंटी, बबली सगळ्यांचे टूथब्रश एकत्रच ठेवता का? वेळीच व्हा सावध...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2024 09:04 IST

Oral Health Tips : तुम्ही तुमचा टूथब्रश कुठे ठेवता हेही तेवढंच महत्वाचं आहे. जास्तीत जास्त घरांमध्ये घरातील सगळे सदस्य त्यांचे टूथब्रश एकाच बॉक्समध्ये एकत्र ठेवतात. पण असं करणंही महागात पडू शकतं.

Oral Health Tips : सगळ्याच लोकांच्या दिवसाची सुरूवात ही टूथब्रश सोबत होते. दातांचं आणि तोंडाचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी रोज ब्रश करणं किती महत्वाचं आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे. तरीही ब्रश करताना लोक काही चुका करतात. जर तुमचा टूथब्रश चांगलं नसेल तर तुम्हाला आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या होऊ शकतात. त्यामुळे ब्रश नेहमी स्वच्छ असावा. इतकंच नाही तर तुम्ही तुमचा टूथब्रश कुठे ठेवता हेही तेवढंच महत्वाचं आहे. जास्तीत जास्त घरांमध्ये घरातील सगळे सदस्य त्यांचे टूथब्रश एकाच बॉक्समध्ये एकत्र ठेवतात. पण असं करणंही महागात पडू शकतं. याने इन्फेक्शनचा धोका वाढतो. अशात आज आम्ही तुम्हाला टूथब्रशबाबत काय काळजी घ्यावी हे सांगणार आहोत.

ब्रश भिजवू नका

जास्तीत जास्त लोक हे आधी टूथब्रश पाण्यात भिजवतात आणि मग त्यावर टूथपेस्ट लावतात. असं केल्याने ब्रश दाते नरम होतात. ब्रशची दात चांगल्याप्रकारे स्वच्छ करण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे ही चूक न करण्याचा डॉक्टरही सल्ला देतात. दात स्वच्छ करण्याआधी टूथब्रश भिजवू नका आणि जर तसे करणे गरजेचेच असेल तर १ सेंकदापेक्षा जास्त तो पाण्याखाली धरु नका.

टॉयलेटमध्ये ठेवू नका

अनेक घरांमध्ये टॉयलेट आणि टूथब्रश ठेवण्याची जागा फारच जवळ असते. टॉयलेटमध्ये फ्लश केल्यावर अनेक किटाणू उडतात आणि ते सहजपणे आजूबाजूच्या भिंतींवर वस्तूंवर सहज जाऊन बसतात. त्यात ब्रशही असतो. त्यामुळे ब्रश कधीही टॉयलेटच्या आजूबाजूला ठेवू नये.

बंद करुन ठेवू नका

आजकाल बाजारात ब्रशसोबत त्याचे दाते झाकून ठेवण्यासाठी वेगवेगळे बॉक्सेस मिळतात. पण ब्रश अशाप्रकारे बंद करुन ठेवणे योग्य नाहीये. याने ब्रशमधील किटाणू वाढतात. सोबतच टूथब्रशचा वापर करुन झाल्यावर तो सरळ उभा ठेवा. याने ब्रशमधील पाणी खाली जाईल आणि ब्रश लगेच कोरडा होईल. याने ब्रशमध्ये किटाणू वाढण्यासाठी लागणारा ओलावाही राहणार नाही.

वेगवेगळे ठेवा सर्वांचे ब्रश

जास्तीत जास्त घरांमध्ये ही चूक केली जाते. परिवारातील सगळ्याच सदस्यांचे ब्रश एकाच ठिकाणी एकत्र ठेवले जातात. डॉक्टरांनुसार, असे केल्याने एका टूथब्रशमधील बॅक्टेरिया दुसऱ्या टूथब्रशमध्ये सहजपणे शिरतात. त्यामुळे सर्व ब्रश एकत्र ठेवू नका. तसेच एकाला असलेला आजार दुसऱ्याला होण्याचाही धोका वाढतो.

या गोष्टींची घ्या काळजी

ब्रश हवेमध्ये सुकायला ठेवा, याने फंगस होणार नाही. ब्रश स्वच्छ करण्यासाठी ब्रश उकळत्या पाण्यात ५ मिनिटांसाठी ठेवा. टूथब्रशचं डोकं एका ग्लासमध्ये ठेवून त्यावर थोडा बेकिंग सोडा आणि पाणी टाकून थोडावेळ भिजवा. दात फार ताकद लावून घासू नका. याने हिरड्यांना इजा होऊ शकते. ब्रश केल्यानंतर बोटांनी हिरड्यांची हळूहळू मसाज करा. याने हिरड्या मजबूत होतील. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य