'ही' आहे चहा पिण्याची सगळ्यात चुकीची वेळ, शरीराला मिळणार नाही अन्नातील पोषक तत्व!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 12:45 IST2025-01-08T12:45:01+5:302025-01-08T12:45:34+5:30
Right time to drink tea : भारतात जास्तीत जास्त लोक सकाळी उपाशीपोटी चहा पितात किंवा नाश्त्यासोबत चहा पितात.एक्सपर्ट सांगतात की, चहा पिण्याची ही वेळ खूप चुकीची आहे.

'ही' आहे चहा पिण्याची सगळ्यात चुकीची वेळ, शरीराला मिळणार नाही अन्नातील पोषक तत्व!
Right time to drink tea : जास्तीत जास्त लोकांच्या दिवसाची सुरूवात गरमागरम चहानं होते. चहा घेतल्याशिवाय अनेकांची कामंही होत नाहीत. सकाळी झोपेतून उठल्यावर चहा पिणं ही एक सवय झाली आहे. पण ही सवय आरोग्याचं नुकसान करू शकते. चहा पिताना बरेच लोक काही चुका करतात. ज्यामुळे आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. भारतात जास्तीत जास्त लोक सकाळी उपाशीपोटी चहा पितात किंवा नाश्त्यासोबत चहा पितात.
एक्सपर्ट सांगतात की, चहा पिण्याची ही वेळ खूप चुकीची आहे. तसेच बरेच लोक चहा बनवताना त्यात अशा काही गोष्टी टाकतात, ज्यामुळे चहा अधिक नुकसानकारक ठरतो. अनेकांना हे माहीत नसतं की, अशाप्रकारच्या चहामुळे कुपोषणाचे शिकार होऊ शकता. अमेरिकेतील हेमाटोलॉजिस्ट ऑनकोलॉजिस्ट डॉ. रवि के गुप्ता यांनी याबाबत माहिती देणारा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.
डॉक्टरांनुसार वृद्ध लोकांनी उपाशीपोटी चहा पिणं फारच नुकसानकारक ठरतं. यामुळे हृदयावर वाईट प्रभाव पडतो आणि अॅसिडिटीची गंभीर समस्याही होऊ शकते. अशात चहाऐवजी काय प्यावं? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. चला तर मग तेच जाणून घेऊ..
अंगाला लागणार नाही अन्न
चुकीच्या वेळी चहा प्यायल्यानं कुपोषणाचे शिकार होऊ शकता. डॉक्टरांनुसार, तुम्ही ज्या गोष्टीसोबत चहा पित आहात, त्यातील पोषक तत्व शरीराला मिळणार नाहीत. ज्यामुळे कमजोरी, थकाव, श्वास भरून येणे अशा समस्या होऊ शकतात.
चहात दूध टाकण्याचे नुकसान
जास्तीत जास्त लोक चहामध्य दूध टाकतात. दुधाशिवाय काही लोक चहा अजिबात पित नाहीत. पण डॉक्टर सांगतात की, दुधाचा चहा अजिबात पिऊ नये. दुधाचा चहा प्यायल्यानं शरीराला आयर्न मिळत नाही आणि एनीमियाचा धोका वाढतो.
अॅसिडिटी आणि ब्लोटिंग
सकाळचा चहा फारच नुकसानकारक असतो. उपाशीपोटी चहा प्यायल्यामुळे शरीरात अॅसिड जास्त बनतं. यानं पोटाचं आतून नुकसान होतं. अशात अॅसिडिटी आणि ब्लोटिंगची समस्या होते. पुन्हा पुन्हा चहा घेतल्यानं हार्ट रेट आणि बीपीही वाढतो. जे हृदयासाठी घातक आहे.
काय कराल?
आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी चहाऐवजी दुसरं ड्रिंक प्यायला हवं. तुळशी, ग्रीन टी आणि कॅमोमाइल टी सारख्या हर्बल चहानं डायजेशन आणि इम्यूनिटी चांगली राहते. तुम्ही मसाला किंवा काळा चहाही पिऊ शकता.
चहा पिण्याची योग्य पद्धत?
चहा नेहमी सकाळचा नाश्ता केल्यावरच प्यावा. यामुळे नाश्त्यातील पोषक तत्व शरीराला आरामात मिळतील. उपाशीपोटी चहा कधीच पिऊ नये. यानं आरोग्यासंबंधी अनेक समस्या होतात.