व्हिटॅमिन्सचे फायदे माहीत असतीलच आता किडनीला होणारे नुकसानही जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2024 10:27 AM2024-03-23T10:27:22+5:302024-03-23T10:28:07+5:30

How To Keep Kidney Healthy: बरेच लोक व्हिटॅमिन्सच्या सप्लीमेंट्स घेतात जे शरीरासाठी नुकसानकारक ठरू शकतं. कोणत्याही गोष्टी कमी किंवा अति ही नुकसानकारकच असते. तेच व्हिटॅमिन्सबाबत म्हणता येईल.

These vitamins to avoid in kidney disease which can decrease kidney size and function | व्हिटॅमिन्सचे फायदे माहीत असतीलच आता किडनीला होणारे नुकसानही जाणून घ्या!

व्हिटॅमिन्सचे फायदे माहीत असतीलच आता किडनीला होणारे नुकसानही जाणून घ्या!

How To Keep Kidney Healthy: सामान्यपणे व्हिटॅमिन्स शरीरासाठी फार महत्वाचे असतात. वेगवेगळ्या व्हिटॅमिन्सचे वेगवेगळे फायदे होतात. पण कधी कधी हे व्हिटॅमिन नुकसानकारकही ठरू शकतात. लघवीसंबंधी समस्या, थकवा, खाज, वजन कमी होणं किंवा भूक न लागणं यांसारख्या समस्या होत असतील आणि त्यात तुम्ही वेगवेगळ्या माध्यमातून काही व्हिटॅमिन्स घेत असाल तर नुकसान होऊ शकतं. कारण या समस्या किडनीशी संबंधित असतात. अशात काही व्हिटॅमिन्सची हाय लेव्हल किडनी लवकर खराब करू शकतात. बरेच लोक व्हिटॅमिन्सच्या सप्लीमेंट्स घेतात जे शरीरासाठी नुकसानकारक ठरू शकतं. कोणत्याही गोष्टी कमी किंवा अति ही नुकसानकारकच असते. तेच व्हिटॅमिन्सबाबत म्हणता येईल.

किडनी खराब झाल्याची लक्षण

लघवीत फेस तयार होणे, जास्त किंवा कमी लघवी येणे, त्वचेवर खाज येणे, सतत थकवा राहणे, मळमळ किंवा भूक न लागणे, अचानक वजन कमी होणे, श्वास भरून येणे, उलटी, हाय-पाय-टाचांमध्ये सून्नपणा, चांगली झोप न लागणे आणि शरीरातून दुर्गंधी येणे ही किडनी खराब होत असल्याचे किंवा डॅमेज झाल्याचे संकेत आहेत. 
अशात हे व्हिटॅमिन्स जास्त झाले तर किडनी डिजीज अधिक गंभीर होतो. वेगवेगळ्या रिसर्चमधून हे समोर आलं आहे की, या समस्या जास्त वाढल्याने किडनीचे नेफ्रोन डॅमेज होतात आणि किडनीची साइज लहान होऊ लागते. ज्याला किडनी म्हणतात.

जीवाला होऊ शकतो धोका

नॅशनल किडनी फाउंडेशनने सांगितलं की, जर तुमची किडनी खराब असेल आणि तुम्हाला यासंबंधी आजार असेल तर व्हिटॅमिन ए, ई आणि के सप्लीमेंट घेण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. काही शोधांनुसार, व्हिटॅमिन डी सुद्धा घातक आहे. यामुळे जीवालाही धोका होऊ शकतो.

व्हिटॅमिन ए

किडनीचा आजार झाला तर व्हिटॅमिन ए ची लेव्हल जास्त आढळू शकते. याचं सेवन कमी केल्यानेही टॉक्सिटी बनू शकते. यामुळे कमी दिसणे, हाडांमध्ये वेदना, त्वचेमध्ये बदल, लिव्हर डॅमेज आणि मेंदुवर प्रेशर वाढू शकतं. अंडी, हिरव्या पालेभाज्या, पिवळ्या भाज्या-फळं, संत्री, मास्यांमध्ये व्हिटॅमिन ए भरपूर असतं. 

व्हिटॅमिन ई

किडनीच्या गंभीर आजारात व्हिटॅमिन ई जमा होऊन टॉक्सिटी वाढू शकते. यामुळे ब्लीडिंग वाढू शकतं. सोबतच थायरॉइड, कमजोरी, इमोशनल इमोशनल डिसऑर्डर, गॅस्ट्रोइंटेस्टाइनल प्रॉब्लम इत्यादी समस्या होऊ शकतात. अशात व्हिटॅमिन ई चे सप्लीमेंट घेण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. सीड्स, बदाम, अक्रोड, एवोकाडो इत्यादीमध्ये व्हिटॅमिन ई असतं.

व्हिटॅमिन के

व्हिटॅमिन के च्या कमतरतेसारखंच व्हिटॅमिन के ची लेव्हल वाढणं घातक ठरू शकतं. जर किडनीच्या आजारात डायलिसिस सुरू असेल तर व्हिटॅमिन के टॉक्सिटीचा धोका बनू शकतं. पालक, केळी आणि हिरव्या पालेभाज्यांमध्ये व्हिटॅमिन के भरपूर असतं.

व्हिटॅमिन डी

सप्लीमेंटमुळे शरीरात व्हिटॅमिन जास्त वाढू शकतं. याने कॅल्शिअमचं अवशोषण फार जास्त वाढतं. किडनीच्या रूग्णांमध्ये कॅल्शिअम जमा होऊन स्टोन होऊ शकतो. हे व्हिटॅमिन उन्हापासून, दूध, कोड लिव्हर ऑइल, मासे, अंडी आणि मशरूममधून मिळतं.

Web Title: These vitamins to avoid in kidney disease which can decrease kidney size and function

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.