शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

पॅरासिटामॉलचे अधिक सेवन केल्याने होऊ शकतात हे गंभीर आजार; जाणून घ्या, आरोग्य तज्ज्ञ काय सांगतात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 14:19 IST

जर आपण रोज 4 ग्रॅम पॅरासिटामॉल घेतले, तर यकृत खराब होण्याची शक्यता वाढते.

पॅरासिटामॉल हे एक असे औषध आहे जे लोक, ताप, डोकेदुखी आणि अंगदुखीसाठी सर्रास घेताना दिसतात. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात, हे औषध आपल्या आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक असल्याचे म्हण्यात आले आहे. ब्रिटनच्या नॉटिंगहॅम युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी नुकताच खुलासा केला आहे की, पॅरासिटामॉलच्या अतिसेवनाने आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतात. प्रामुख्याने, वृद्ध अथवा 65 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांना किडनीच्या आजाराचा धोका वाढू शकतो. तसेच, कमी कालावधीत पॅरासिटामॉलचे अधिक सेवन केल्यास यकृतावरही वाईट परिणाम होऊ शकतो. अर्थात याच्या सेवनाने अनेक दुष्परिणाम होऊ शकतात.

यकृत खराब होण्याचा दोका वाढतो -जर आपण रोज 4 ग्रॅम पॅरासिटामॉल घेतले, तर यकृत खराब होण्याची शक्यता वाढते. कावीळ आणि यकृत खराब होण्यासारख्या समस्यादेखील उद्भवू शकतात. काही प्रकरणांत, ही स्थिती वेनुसार बरीही होऊ शकते. मात्र धोका कायम राहतो. याशिवाय, त्वचेवर लाल पुरळ उठणे, श्वासनास त्रास होणे, अॅलर्जी, गॅस आणि ऍसिडिटी सारख्या समस्याही असू शकतात. क्वचित प्रसंगी, अल्प-मुदतीच्या वापरामुळे किडनीचे त्वरित नुकसान देखील होऊ शकते. तसेच काही प्रकरणांत, थोड्या वेळासाठीही याचा वापर केल्यास कीडनीवर लगेच परिणाम होऊ शकतो.

किडनी खराबही होऊ शकते - पॅरासिटामॉलचे दीर्घकाळ सेवन केल्याने यकृतावर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो.  दीर्घकाळात, ही स्थिती क्रॉन यकृत डिसीजचे रूपही धारण करू शकते. यामुळे यकृत पूर्णपणे खराब होऊ शकते. एवढेच नाही तर, यकृत बदलाचीही वेळ  येऊ शकते. याच बरोबर, पॅरासिटामॉलचा दीर्घकाळ वापर केल्याने किडनीही खराब होऊ शकते.  

हार्ट अॅटॅक आणि स्ट्रोकचा धोकाही वाढतो -जे लोक नियमितपणे पॅरासिटामॉल घेतात त्यांच्या शरीराला याची सवय होते. परिणामी, आवश्यकता पडल्यास नेहमीचा डोस प्रभावी राहत नाही. यामुळे जेव्हा गरज असते तेव्हा औषध काम करत नाही. याशिवाय पॅरासिटामॉल दीर्घकाळ घेतल्याने हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका वाढतो. याचा मानसिक आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. तसेच, नैराश्य आणि चिंता यांसारख्या समस्याही वाढू शकतात. यामुळे पॅरासिटामॉल आवश्यकतेनुसार आणि डॉक्टरांनी सांगितल्यानुसारच घ्यायला हवी. पॅरासिटामॉल अधिक प्रमाणावर घेणे अथवा विचार न करता त्याचे सेवन करणे, यामुळे गंभीर दुष्परिणामांनाही सामोरे जावे लागू शकते.

(टीप - प्रिय वाचक, ही माहिती केवळ सर्वसामान्य माहितीच्या आधारे देण्यात आली आहे. आपण आरोग्याशी संबंधित कुठलीही गोष्ट आमलात आणण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यायला हवा.) 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स