शरीर निरोगी ठेवण्यासाठी रक्त शुद्ध असणं फार गरजेचं आहे. रक्त जर शुद्ध नसेल तर आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या सतत होऊ लागतात. जसे की, पुरळ, त्वचेसंबंधी रोग, तणाव इत्यादी. अनियमित खाणं आणि जंक फूड आपलं रक्त दूषित करतं. त्यामुळे सतत काहीना काही आजार व्यक्तीला आपल्या जाळ्यात घेत असतात. त्यामुळे रक्त शुद्ध ठेवण्यासाठी आपण नेहमी काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी काही औषधे घेण्याची गरज नाही. काही नैसर्गिक उपायांनीच रक्त शुद्ध ठेवता येतं.

१) ब्रोकली

ब्रोकली रक्त शुद्ध करण्यासाठी बेस्ट फूड मानलं जातं. याने शरीरातील नुकसानकारक विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत मिळते. यात व्हिटॅमिन सी, कॅल्शिअम, व्हिटॅमिन के, ओमेगा ३ फॅटी अ‍ॅसिड, पोटॅशिअम, मॅगनीज, फॉस्फोरस सारखे तत्व असतात. त्यामुळे याचा नियमित आहारात समावेश केल्याने रक्त शुद्ध राहण्यासोबतच वेगवेगळ्या दृष्टीने फायदा होतो. 

२) लिंबू

रोज लिंबाचा रस गरम पाण्यात मिश्रित करून सेवन केल्यानेही रक्त शुद्ध होतं. यातील मिनरल्स आणि व्हिटॅमिन शरीरातील विषारी तत्व बाहेर काढण्यास मदत करतात. तसेच याने आपल्या किडनीचं आरोग्यही चांगलं राहतं.

३) हिरव्या भाज्या

हिरव्या पालेभाज्या जसे की, पालक, मेथी, सोया, इत्यादींमध्ये क्लोरोफिल आणि अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट आढळतात. याने रक्त शुद्ध ठेवण्यास मदत मिळते. इतकेच नाही तर यातील एन्जाइम्सम लिव्हरला शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करतात.

४) आलं

आलं सुद्धा नॅच्युरल ब्लड प्यूरिफायर म्हणून काम करतं. आल्याचं सेवन केल्याने रक्त शुद्ध होण्यासोबतच नवीन पेशीही तयार होतात. आलं चवीला तिखट असलं तरी थोड्या प्रमाणात कच्च खाल्ल्याने अधिक फायदा होतो.

५) गाजर

गाजर खाल्ल्याने रक्त शुद्ध राहतं आणि त्वचेवरही चमक येते. यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ए, पोटॅशिअम, फायबर, बायोटिन, व्हिटॅमिन सी, मॅगनीज, फॉस्फोरस सारखे पोषक तत्व असतात. याने रक्त शुद्ध करण्यास मदत मिळते.

६) ताजी फळे

ताजी फळे जसे की, सफरचंद, आलूबुखारा, पेरू यात फळांमध्ये Pectin Fibre असतं. याने रक्तातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत मिळते. त्यासोबतच स्ट्रॉबेरी आणि जांभळं सुद्धा लिव्हरला शरीर डीटॉक्स करण्यास मदत करतात.

७) बीट

बिटात नायट्रेट आणि अनेकप्रकारचे अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स आढळतात. एका रिसर्चनुसार असं सांगण्यात आलं की, बिटाचा ज्यूस सेवन केल्याने बॉडी डीटॉक्स करण्यास मदत मिळते. याने रक्त शुद्ध होतं आणि लिव्हरही निरोगी राहतं. 

८) गूळ

गूळ हा रक्त शुद्ध करण्याचा सर्वात चांगला नैसर्गिक उपाय मानला जातो. गुळात असलेलं आयर्न रक्तातील हीमोग्लोबिनचं प्रमाण वाढतं. याने ब्लड सर्कुलेशन वाढतं. सोबतच शरीरातील विषारी पदार्थ देखील बाहेर काढले जातात. याने शरीरातील Clotted Blood ही बाहेर निघतं.

९) हळद

हळद हे फार चांगलं अ‍ॅंटी-बायोटिक मानलं जातं. याचं सेवन केल्याने रक्ताच्या धमण्यांमध्ये सूज येत नाही आणि त्यात चरबीही जमा होत नाही. दुधात हळद टाकून प्यायल्यास रक्त शुद्ध होतं. त्यामुळे हळदीचा आहारात समावेश करावा.

१०) पाणी

(Image Credit : medicalnewstoday.com)

पाणी सुद्धा एक नॅच्युरल ब्लड प्युरिफायर आहे. आपली किडनी मूत्राद्वारे शरीरातील विषारी पदार्त बाहेर काढते. यात पाण्याची महत्वाची भूमिका असते. आयुर्वेदानुसार, रात्रभर तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं पाणी प्यायल्याने रक्त शुद्ध होतं. 


Web Title: These 10 foods are natural blood purifiers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.