World Mental Health Day 2025: टेन्शन वाढले अन् तीन वर्षांत मानसिक आजारग्रस्तही; आज जागतिक मानसिक आरोग्य दिवस
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 09:42 IST2025-10-10T09:42:10+5:302025-10-10T09:42:23+5:30
World Mental Health Day 2025: राज्य सरकारने पुणे, ठाणे, नागपूर आणि रत्नागिरी येथील प्रादेशिक मनोरुग्णालयांसह जिल्हा आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांत मानसिक आरोग्य उपचार सुविधा उपलब्ध केल्या आहेत.

World Mental Health Day 2025: टेन्शन वाढले अन् तीन वर्षांत मानसिक आजारग्रस्तही; आज जागतिक मानसिक आरोग्य दिवस
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : स्पर्धात्मक युग, आधुनिक जीवनशैली आणि कामाच्या ठिकाणचा तणाव, कुटुंबातील कलह आदी कारणांमुळे नैराश्य, चिंता आदी मानसिक रोगाच्या रुग्णात झपाट्याने वाढ झाली आहे. गेल्या तीन वर्षांत राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, जिल्हा रुग्णालये आणि प्रादेशिक मनोरुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्याही लक्षणीयरीत्या वाढली आहे.
राज्य सरकारने पुणे, ठाणे, नागपूर आणि रत्नागिरी येथील प्रादेशिक मनोरुग्णालयांसह जिल्हा आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांत मानसिक आरोग्य उपचार सुविधा उपलब्ध केल्या आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या तीन वर्षांत या सर्व आरोग्य केंद्रांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ नोंदवली गेली आहे.
स्मृतिभ्रंशाचेही रुग्ण
ज्येष्ठ नागरिकांमधील स्मृतिभ्रंशाचा प्रश्नही वाढता आहे.
राज्यातील ३४ जिल्ह्यांतील जिल्हा रुग्णालयांमध्ये सुरू असलेल्या ‘मेमरी क्लिनिक’ अंतर्गत उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या सुमारे ३० हजारांनी
वाढली आहे.
जगात आपल्या देशाची वाटचाल सर्वाधिक आत्महत्या करणारा देश अशी सुरू आहे. आपण सर्व पायभूत सुविधांचे जाळे निर्माण करीत आहोत. मात्र मानसिक आरोग्याच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला कुणाकडे वेळ नाही. प्रत्येक शहरात, जिल्ह्यात मानसिक आरोग्य आयुक्तांची नेमणूक करणे गरजेचे आहे. मानसिक आरोग्य आणि स्मृतिभ्रंश या दोन्ही क्षेत्रांत नागरिकांच्या आरोग्य समस्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे, ज्याकडे प्रशासन आणि समाज दोघांनीही गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
- डॉ. हरीश शेट्टी, मानसोपचारतज्ज्ञ