शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

मुलांची विशेष काळजी घ्या

By admin | Updated: February 21, 2015 00:50 IST

मुलांची विशेष काळजी घ्या

मुलांची विशेष काळजी घ्या
-इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स :स्वाईन फ्लूची भीती नको खबरदारी घ्या :
(फोटो आहे)

नागपूर : गेल्या काही दिवसांत चिमुरड्यांना स्वाईन फ्लूची लागण झाली आहे. राज्यासह नागपुरात स्वाईन फ्लू वाढत आहे. हा संसर्गजन्य आजार असल्यामुळे आणि लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्यामुळे मुलांची विशेष काळजी घ्या, असे आवाहन इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स, नागपूरच्यावतीने शुक्रवारी आयोजित पत्रपरिषदेत करण्यात आले.
यावेळी इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स, नागपूरचे अध्यक्ष डॉ. आर.जी. पाटील, सचिव डॉ. गिरीश चरडे, डॉ. सतीश देवपुजारी, डॉ. संजय मराठे आदी उपस्थित होते.
डॉ. मराठे म्हणाले, स्वाईन फ्लूचा खोकल्यातून, शिंकण्यातून जास्त प्रमाणात संसर्ग होतो. यामुळे लहान मुलांची विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे. लहान मुले एकत्र खेळतात, वर्गात बाजूबाजूला बसतात, एकमेकांच्या वह्या, पुस्तके हाताळतात, खेळणी हाताळतात यामुळे एका मुलाला स्वाईन फ्लूची लागण झाली असल्यास दुसऱ्या मुलांना त्याची लागण पटकन होऊ शकते. लहान मुलांना हवामान बदलामुळे सर्दी, खोकला, ताप असे आजार उद्भवतात. पण साधा फ्लू असल्यास दोन दिवसांत बरा होता. सर्दी, खोकलाही तीन ते चार दिवसांत बरा होतो. पण, मुलांमध्ये ही लक्षणे अधिक काळ आढळून आल्यास तत्काळ डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घ्या, असेही ते म्हणाले.
- स्वाईन फ्लूची लस देता येईल
डॉ. देवपुजारी म्हणाले, कोणती साथ आल्यावर त्याची लस देणे अत्यंत गरजेचे असते. सध्या स्वाईन फ्लूचे रुग्ण दिसून येत आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार लस देणे गरजेचे वाटत असल्यास ती नक्की देण्यात यावी. स्वाईन फ्लू प्रतिबंधक लसीला जागतिक आरोग्य संघटनेची (डब्ल्यूएचओ) मान्यताप्राप्त आहे. सहा महिन्यावरील मुलांपासून ते मोठ्यापर्यंत ही लस घेता येते. परंतु लस दिल्यानंतर हा आजार होणारच नाही, असे नाही. आवश्यक ती खबरदारी घ्यायलाच हवी. या लसीचा प्रभाव साधारण सहा ते आठ महिन्यांचा असतो.