यकृत खराब झाल्याचा संकेत देतात लक्षण, वेळीच उपचान न घेतल्यास उरतो 'हा' शेवटचा पर्याय
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2021 21:44 IST2021-06-15T21:43:44+5:302021-06-15T21:44:30+5:30
तुम्ही यकृताची योग्य काळजी न घेतल्यास हे तुम्हाला महागात पडू शकतं. जर तुमचं यकृत खराब असेल तर ही लक्षण तुम्ही ध्यानात ठेवलीच पाहिजेत.

यकृत खराब झाल्याचा संकेत देतात लक्षण, वेळीच उपचान न घेतल्यास उरतो 'हा' शेवटचा पर्याय
आपल्या शरीरातील सर्व क्रिया सुरळीत चालण्यासाठी यकृत हा अत्यंत महत्वाचा अवयव आहे. तसेच यकृत हा मानवी शरीरातील सर्वात दुसरा मोठा अवयव आहे. अन्नपदार्थाचं रुपांतर उर्जेत करणं हे यकृताचं प्रमुख कार्य असतं. मात्र तुम्ही यकृताची योग्य काळजी न घेतल्यास हे तुम्हाला महागात पडू शकतं. जर तुमचं यकृत खराब असेल तर ही लक्षण तुम्ही ध्यानात ठेवलीच पाहिजेत.
लिव्हर खराब झाल्याची लक्षणं
लिव्हर खराब होण्याचे अनेक लक्षणं आहेत. विशेष म्हणजे लिव्हर खराब होण्याची बहुतांश लक्षणं ही सर्वसाधारण आहेत. हे संकेत डॉक्टरांच्या उपचारांशिवाय मिळतात. काही वेळा तर ही लक्षणं समजून येत नाहीत. याचं निदान फार उशीरा होतं. परिणामी तो पर्यंत फार उशीर झालेला असतो.
उलटी, कमी भूक, थकावट, वजनात घट, शरीरात खाज हे आणि यासारखे ही यकृत खराब होण्याची प्राथमिक लक्षणं आहेत. तज्ज्ञांनुसार निरोगी यकृतासाठी मद्यपान टाळावे. तसेच तेलकट आणि मसालेदार पदार्थ खाणं टाळा.
यकृताच्या समस्यांवर योग्य वेळेस उपचार केल्यास आजार बरा होता. पण ठराविक टप्प्यानंतर यकृत प्रत्यारोपण हा शेवटचा पर्याय उरतो.
साधारणपणे यकृताचा मोठा भाग खराब झाल्यास यकृत खराब झाल्याचं म्हणता येतं. यावर जवळपास उपचार अशक्य असतात. लिव्हर खराब होण्यामागे अनेक कारणं आहेत. यामध्ये वायरल हेपटायटिस, सिरोयसिस, मद्यपान, तळलेले आणि मसालेदार पदार्थ यांचा समावेश आहे.