शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

तुम्हीही दुसऱ्यांसमोर 'गॅस पास' करत नसाल तर हे वाचाच!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2018 10:59 AM

भलेही तुम्ही या गोष्टीला गंमतीत घेत असाल पण तुम्ही दररोज सरासरी अर्धा लिटर गॅस फार्टच्या माध्यामातून बाहेर टाकत असता. 

शरीरातील गॅस पास करणे (फार्ट किंवा पादणे) पूर्णपणे एक सामान्य आणि नैसर्गिक प्रक्रिया आहे. पण अनेकजण हे मान्यच करत नाहीत की, त्यांनी हे केलंय. या नैसर्गिक गोष्टीला शरमेची बाब करुन ठेवलंय. भलेही तुम्ही या गोष्टीला गंमतीत घेत असाल पण तुम्ही दररोज सरासरी अर्धा लिटर गॅस फार्टच्या माध्यामातून बाहेर टाकत असता. 

जर तुम्हाला असे करण्यात लाज वाटत असेल किंवा दुसऱ्यांसमोर तुम्ही गॅस रोखून धरण्याचा प्रयत्न करत असाल तर याचे फार गंभीर दुष्परिणाम तुम्हाला भोगावे लागू शकतात. एक्सपर्टनुसार, जर तुम्ही गॅस रोखून ठेवत असाल तर गॅस तुमच्या शरीरात फिरु लागतो आणि दुसऱ्याच जागेतून बाहेर निघतो. 

ऑस्ट्रेलियाचे न्यूट्रिशन आणि डायटेटिक्स प्रोफेसर क्लॅअर कोलिन्स यांनी सांगितले की, जेव्हा तुम्ही फार्ट रोखता तेव्हा काय होतं, जर तुम्हाला जाणवेल की, पोटात गॅस आहे आणि बाहेर येण्याच्या तयारीत आहे तर एखाद्या अशा ठिकाणावर जावे जिथे तुम्हाला गॅस पास करण्यास अडचण होणार नाही. तुमच्या पचनक्रियेसाठी हे योग्य ठरेल की, तुम्ही गॅस पास करा. गॅसमुळे पोट फुगतं, सोबतच काही गॅस सर्कुसेशनमध्ये पुन्हा येतो आणि तुमच्या श्वासाच्या माध्यमातून बाहेर येतो. 

हेही जाणून घ्या

- जर तुम्हाला माहीत नसेल की, गॅस पोटात येतो कुठून? आपण जे अन्न खातो त्याची पचनक्रिया झाल्यावर त्यातून काही गॅस निघतो आणि हा गॅस तुम्ही फार्टच्या माध्यमातून बाहेर काढता.

- फार्ट करत असताना आवाज होणं हे तुमच्या शरीरातील गॅसचं प्रमाण, त्याची इंटेसिटी आणि तुमच्या बॉडी पॉश्चरवर अवलंबून असतं. 

- फार्टमधून दुर्गंधी येण्याचं कारण म्हणजे आपण जे खातो त्यात सल्फर असतं. पचनप्रक्रियेत या सल्फरपासून हायड्रोजन सल्फाइड गॅस तयार होतो आणि याचाच घाण वास येतो. जर तुमच्या फार्टमधून फारच घाण वास येत असेल तर तुम्हाला तुमच्या  पचनक्रियेवर लक्ष द्यायला हवं. 

-  अनेकदा असं होतं की, जेव्हा आपण गॅस पास करतो तेव्हा घाण वास येत नाही. कारण ही ती हवा असते जी श्वास घेत असताना फुफ्फुसांपर्यंत पोहोचलेली असते. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य