शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
3
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
4
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
5
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
6
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
7
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
8
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
9
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
10
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
11
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
12
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
13
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
14
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
15
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
16
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
17
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
18
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
19
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
Daily Top 2Weekly Top 5

सूर्यस्नान करा, हृदयरोग-मधुमेह पळवा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2016 18:29 IST

बदलत्या जीवनशैलीमुळे हृदयरोग, मधुमेहासारखे असाध्य आजार बहुतांश लोकांना कळाले असून, त्यासाठी बरेच उपचार केले जातात. पण अपेक्षित फायदा होताना दिसत नाही

बदलत्या जीवनशैलीमुळे हृदयरोग, मधुमेहासारखे असाध्य आजार बहुतांश लोकांना कळाले असून, त्यासाठी बरेच उपचार केले जातात. पण अपेक्षित फायदा होताना दिसत नाही. मात्र, एका नव्या संशोधनानुसार पुरेशा प्रमाणात विटॅमिन ‘डी’ घेतल्याने तसेच सूर्यस्नानामुळे हृदयविकार आणि मधुमेहाचा धोका कमी होण्यास मदत होत असल्याचे समोर आले आहे. आहारात चरबीयुक्त पदार्थ वाढले की पचनसंस्थेवर परिणाम होऊन चयापचयाच्या समस्या निर्माण होतात. आणि या समस्येला शरीरातील विटॅमिन ‘डी’ची कमतरता कारणीभूत ठरते. त्यामुळे शरीरातील गट जिवाणू अस्थिर होतात, असे संशोधकांना आढळून आले. अभ्यासानुसार, विटॅमिन ‘डी’चे शरीरातील प्रमाण पुरेशा प्रमाणात असणे आवश्यक आहे. विटॅमिन ‘डी’ची कमतरता भरून काढण्यासाठी सूर्यस्नान, पूरक अहार घेणे आवश्यक असल्याचे अमेरिकेतील सिन्हाई आरोग्य केंद्राचे स्टिपेन पॅन्डोल यांनी म्हटले आहे.एकूण लोकसंख्येच्या सुमारे एकचतुर्थांश प्रौढांना चयापचायच्या समस्येने ग्रासले आहे. ही समस्याच मधुमेह आणि हृदयरोग होण्यासाठी कारणीभूत ठरते. अतिस्थूलतेच्या लक्षणांसह रक्तातील साखरेचे प्रमाण वाढणे, उच्च रक्तदाब अथवा उच्च कोलेस्ट्रॉल ही याची लक्षणे आहेत. चयापचायाचा सिंड्रोम होण्यासाठी विटॅमिन ‘डी’ची शरीरातील कमतरता कारणीभूत असल्याचे त्यांनी म्हटले.विटॅमिन ‘डी’च्या कमतरतेमुळे आतड्यातील जिवाणूंचे प्रमाण कमी होते. त्यामुळे विटॅमिन ‘डी’असलेला पूरक अहार घेणे आवश्यक आहे. हे संशोधन फ्रंटियर्स फिजिओलॉजी जर्नलमध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहे.