शहरं
Join us  
Trending Stories
1
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
2
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
3
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
4
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
5
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
6
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
7
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
8
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
9
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
10
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
11
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
12
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
13
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
14
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
15
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
16
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
17
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
18
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
19
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
20
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती

 ‘म्यूकोर्मिकोसिस’ने ग्रस्त महिलेचे प्राण वाचवण्यात यश, कोरोनाचीही होती लागण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2021 1:37 AM

mucormycosis : म्यूकोर्मिकोसिसचा संसर्ग हा अतिशय गंभीर आहे. एक प्रकारे फंगल इन्फेक्शन असून, कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये हा आजार झाल्याची अनेक प्रकरणे समोर आलेली आहे.

मुंबई : कोरोनातून बरे झाल्यानंतर ‘म्यूकोर्मिकोसिस’ हा दुर्मीळ जंतुसंसर्ग झालेल्या एका महिलेचे प्राण वाचवण्यात परळ येथील रुग्णालयातील डॉक्टरांना यश आले आहे. या फंगल इन्फेक्शनमुळे हाडांची झीज आणि स्नायू कमकुवत होणे असे काही दुष्परिणाम दिसून आले आहेत. डोळ्यांवरही घातक परिमाण होऊ शकतो. हे लक्षात घेऊन म्यूकोर्मिकोसिस आणि विविध फंगल इन्फेक्शनवर तातडीने उपचार व्हावेत, यासाठी परळ येथील खासगी रुग्णालयात ‘म्यूकोर्मिकोसिस’ क्लिनिक सुरू करण्यात आले आहे.धुळे जिल्ह्यात राहणाऱ्या शैला सोनार यांना कोरोनामुळे रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्याने आणि रक्तातील साखरेच्या कमतरतेमुळे ‘म्यूकोर्मिकोसिस’ हा दुर्मीळ आजार झाला. या महिलेच्या नाकात आणि डोक्यापर्यंत हा जंतुसंसर्ग पोहोचला होता. स्थानिक रुग्णालयात या महिलेवर चार शस्त्रक्रिया करण्यात आल्या. परंतु, प्रकृतीत सुधारणा झाली नाही. त्रास वाढू लागल्याने कुटुंबीयांनी तिला डिसेंबर २०२० रोजी मुंबईतील रुग्णालयात दाखल केले. या ठिकाणी महिलेवर अँटिफंगल थेरपी सुरू करण्यात आली. शस्त्रक्रियेद्वारे संसर्ग झालेल्या डोक्यावरील टाळूचा अर्धा भाग काढून टाकण्यात आला. वेळीच उपचार झाल्याने या महिलेचे डोळे वाचवण्यात डॉक्टरांना यश मिळाले आहे.

रुग्णांची संख्या वाढतेयम्यूकोर्मिकोसिसचा संसर्ग हा अतिशय गंभीर आहे. एक प्रकारे फंगल इन्फेक्शन असून, कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये हा आजार झाल्याची अनेक प्रकरणे समोर आलेली आहे. सध्या या रुग्णांची संख्या सध्या वाढताना दिसून येत आहे. मधुमेह असलेले आणि रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्या रुग्णांना याचा धोका अधिक असतो. या बुरशीजन्य संसर्गाने हाडांची झीज होणे, स्नायू कमकुवत होणे, डोळ्यांवर दुष्परिणाम होणे अशा तक्रारी समोर येत आहेत.

म्यूकोर्मिकोसिस म्हणजे काय?परळ येथील रुग्णालयातील कान-नाक-घसा सर्जन डॉ. मिलिंद नवलखे म्हणाले की, कोरोनातून बरे झालेले ५०हून अधिक रुग्ण मागील तीन महिन्यांत रोगप्रतिकारशक्तीच्या कमतरतेमुळे बुरशीजन्य आजाराचा संसर्ग झाल्याने उपचारासाठी आले. या आजारात रुग्णाला सर्दी होते. नाकाला सूज येऊन वेदना जाणवू लागतात. वेळीच उपचार न झाल्यास डोळ्यावर परिणाम होऊन दृष्टी जाण्याचीही शक्यता असते. परंतु, अनेकांना या आजाराबद्दल माहिती नसल्याने रुग्ण उशिरा डॉक्टरांकडे जातात. या आजाराला नाकाची पोकळी आणि नाकासंबंधी सायनसपासून सुरुवात होते. त्यानंतर डोळ्यांवर आणि मेंदूवर याचा परिणाम होतो. 

टॅग्स :Healthआरोग्यCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस