(Image Credit : Verywell Fit)
वजन कमी करण्यासाठी किंवा चांगल्या फिटनेससाठी पायी चालण्याचा सल्ला नेहमीच दिला जातो. मग ते हळू असो वा वेगाने. पण नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चनुसार समोर आलं आहे की, जे लोक हळुवार चालतात त्यांचं सरासरी आयुष्य त्या लोकांच्या तुलनेत कमी असतं जे वेगाने चालतात. मेओ क्लिनिक प्रोसिडिंग्स नावाच्या जर्नलमध्ये हा रिसर्च प्रकाशित करण्यात आला आहे.
वेगाने चालणाऱ्यांचं आयुष्य अधिक
या रिसर्चनुसार, ज्या लोकांना वेगाने चालण्याची सवय असते त्यांचं सरासरी आयुष्य अधिक असतं. मग त्यांचं वजन सामान्यपेक्षा कमी असो वा ते जाडेपणाचे शिकार असतो याचा काहीही फरक पडत नाही. तर ज्या लोकांचं वजन सामान्यापेक्षा कमी असतं आणि ते हळुवार चालतात त्यांचा जीवनाचा सरासरी कालावधी सर्वात कमी असतो. असे पुरूष सरासरी ६४.८ वर्ष जगतात तर महिला ७२.४ वर्ष जगतात.
वजनापेक्षा अधिक फिजिकल अॅक्टिविटी महत्त्वाची
या रिसर्चचे मुख्य लेखक प्राध्यापक टॉम येट्स सांगतात की, 'एखाद्या व्यक्तीचा जीवनकाळ किती जास्त असेल हे त्याच्या शरीराच्या वजनापेक्षाही जास्त त्याच्या फिजिकल फिटनेसवर अवलंबून असतं, हे या रिसर्चमधून स्पष्ट होण्यास मदत मिळते. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर रिसर्चचे निष्कर्ष सल्ला देतात की, जेव्हा विषय लाइफ एक्सपेक्टेंसी म्हणजेच सरासरी जीवनकाळाचा येतो, तेव्हा फिजिकल फिटनेस, बॉडी मास इंडेक्सच्या तुलनेत जास्त चांगल्याप्रकारे इंडिकेट करतं. त्यामुळे तुम्हाला जर ब्रिस्क वॉकिंग म्हणजेच वेगाने चालण्यासाठी प्रोत्साहित केलं गेलं तर याने तुमचं आयुष्य वाढण्यास मदत मिळू शकते'.
हळुवार चालणाऱ्यांना हृदयरोगाचा धोका
गेल्यावर्षी सुद्धा प्राध्यापक येट्स यांच्या टीमने एक रिसर्च केला होता. त्यात समोर आलं होतं की, जे लोक मध्यम वयाचे लोक हळुवार चालतात, त्यांना हृदयाशी संबंधित आजार होण्याचा धोका इतरांच्या तुलनेत अधिक असतो. त्यामुळे वेगाने चालता येतं का याकडे लक्ष दिलं पाहिजे.
वेगाने चालण्याचे आणखी फायदे
दुसऱ्या एका रिसर्चमधून समोर आले आहे की, वेगात चालण्याने डिप्रेशनपासून मुक्ती मिळते. इटलीच्या युनिव्हर्सिटी ऑफ फरेराच्या संशोधकर्त्यांनुसार, वेगात चालण्याने रुग्णालयात अॅडमिट होण्याची आणि तिथे जास्त काळ राहावं लागण्याची भीती कमी होते.
या अभ्यासात 1,078 हाय ब्लड प्रेशर ग्रस्त लोकांना सहभागी करुन घेतले होते. हळू चालणा-यांच्या तुलनेत वेगाने चालणा-यांची तीन वर्षात रुग्णालयात अॅडमिट होण्याची 37 टक्के शक्यता कमी आढळली आहे. अभ्यासक म्हणाले की, चालणे वयोवृद्धांमध्ये अधिक लोकप्रिय आहे. हा व्यायाम एकही पैसा खर्च न करता आणि कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय केला जाऊ शकतो.