शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
3
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
18
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
19
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
20
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत

७० टक्के लोकांनी 'हा' उपाय केल्यास नियंत्रणात येईल कोरोनाचा प्रसार; संशोधनातून खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2020 11:30 AM

CoronaVirus News & latest Updates : मास्क वापरल्याने कोरोना व्हायरसपासून बचाव होतो म्हणून सर्वच ठिकाणी मास्क वापरण्याबाबत सक्ती करण्यात आली आहे.

कोरोना व्हायरसच्या प्रसाराबाबत वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कारण  दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.  कोरोनाच्या माहामारीला आटोक्यात आणण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत. पण अजूनही काही लोक कोरोनाला गांभीर्याने घेत नसल्यामुळे संक्रमणाचा वेग वाढत आहे. मास्क वापरल्याने कोरोना व्हायरसपासून बचाव होतो म्हणून सर्वच ठिकाणी मास्क वापरण्याबाबत सक्ती करण्यात आली आहे. ७० टक्के लोकांनी सतत मास्क लावला तर कोरोनाच्या माहामारीला व्यापक होण्यापासून वाचवता येऊ शकतं. 

या संशोधनात दिसून आलं की, साधारण कापडाने तोंड झाकल्यानं संक्रमण पसरण्याचा धोका कमी होतो.  'फिजिक्स ऑफ फ्लुइड्स' या पत्रकात हा अभ्यास प्रकाशित करण्यात आला आहे. या संशोधनात फेसमास्कवर अभ्यास करण्यात आला होता. यात असं दिसून आलं की, मास्कच्या वापरामुळे एका व्यक्तीकडून इतरांपर्यंत पोहोचणारं संक्रमण कमी होतं.  

नोटांद्वारे कोरोना व्हायरस पसरण्याचा धोका? बँकेच्या संशोधनात मोठा खुलासा

या अभ्यासानुसार  प्रभावशाली फेस मास्क ७० टक्के लोकांनी वापरल्यास सार्वजनिक ठिकाणांमध्ये पसरणारा कोरोनाचा धोका कमी होईल. यामुळे माहामारीला वाढण्यापासून रोखलं जाऊ शकतं. रिपोर्ट्सनुसार या संशोधकनात नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ  सिंगापूरचे  तज्ज्ञ संजय कुमार यांचाही समावेश होता. 

चिंताजनक! ९४ टक्के यशस्वी लसीनेही कोरोनाचा प्रसार थांबणार नाही, मॉर्डनाच्या तज्ज्ञांचा दावा

सध्या भारताभरासह जगभरात कोरोनाचं  संक्रमण वेगाने पसरत आहे. लोकांनी सावधगिरी बाळगल्यास,  लॉकडाऊनच्या नियमांचे पालन केल्यास संक्रमणाचा धोका कमी होतो. कोरोनापासून बचावासाठी मास्क वापरणं, साबणाने हात धुणं,  सॅनिटायजरचा वापर, सोशल डिस्टेंसिंग पाळणं, गर्दीच्या ठिकाणी जायचे टाळणं या नियमांचे पालन करायला हवे. 

प्लाझ्मा स्प्रे ने 30 सेकंदांत कोरोना  होईल नष्ट

मास्क, सॅनिटायझर आदी गोष्टी हवेतील, हातावरील व्हायरस नाकात जाण्यापासून रोखू शकतात परंतू तो व्हायरस मुळापासून नष्ट करू शकत नाहीत. यामुळे वस्तूंवर बसलेला कोरोना व्हायरस वेळीच नष्ट करणे खूप गरजेचे ठरणार आहे. एका नवीन संशोधनानुसार प्लाझ्माचा स्प्रे धातू, चामडे आणि प्लॅस्टिकच्या पृष्ठभागाला चिकटलेला कोरोनाव्हायरस अवघ्या 30 सेकंदांत मारू शकतो. हे संशोधन कोरोनाच्या लढाईत मोठी भूमिका निभावण्याची आशा निर्माण झाली आहे. प्लाझ्मा हा पदार्थाच्या चार महत्वाच्या अवस्थांपैकी एक आहे.

हा प्लाझ्मा स्थिर गॅसवर गरम करून किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटीक फील्डच्या संपर्कात आणत बनविता येणार आहे. हे संशोधन फिजिक्स ऑफ फ्लूड्स नावाच्या जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे. जूनमध्ये हे संशोधन करण्यात आले आहे. यामध्ये कोल्ड प्लाझ्माचा उपयोग धातू, चामडे आणि प्लास्टिकसारख्या वस्तूंवर करण्यात आले. यावर बसलेले कोरोना व्हायरससारखे असंख्य विषाणू काही सेकंदांत नष्ट झाल्याचे दिसून आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealth Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य