'या' प्रकारचं दूध पिणाऱ्या लहान मुलांमध्ये लठ्ठपणाचा धोका कमी - रिसर्च

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2020 10:08 AM2020-01-01T10:08:32+5:302020-01-01T10:14:11+5:30

या रिसर्चसाठी अभ्यासकांनी याआधी करण्यात आलेल्या २८ रिसर्चचा आधार घेतला ज्यात १ ते १८ वर्षाच्या साधारण २१ हजार मुलांचा समावेश होता.

Study says children who drink whole milk face lower odds of becoming obese | 'या' प्रकारचं दूध पिणाऱ्या लहान मुलांमध्ये लठ्ठपणाचा धोका कमी - रिसर्च

'या' प्रकारचं दूध पिणाऱ्या लहान मुलांमध्ये लठ्ठपणाचा धोका कमी - रिसर्च

Next

(Image Credit : healthland.time.com)

जी लहान मुले रोज फूल क्रीम दुधाचं सेवन करतात त्यांना लठ्ठपणाचा धोका त्या मुलांच्या तुलनेत ४० कमी असतो, जे लो-फॅट दुधाचं सेवन करतात. याचा खुलासा कॅनडातील सेंट मायकल्स हॉस्पिटलमधील अभ्यासकांनी केलेल्या एका रिसर्चमधून समोर करण्यात आलाय. 

या रिसर्चसाठी अभ्यासकांनी याआधी करण्यात आलेल्या २८ रिसर्चचा आधार घेतला ज्यात १ ते १८ वर्षाच्या साधारण २१ हजार मुलांचा समावेश होता. हे सगळेच गायीच्या दुधाचं सेवन करत होते. या रिसर्चमध्ये मुख्यत्वे लहान मुलांचा दुधाचा आहार आणि त्यातून त्यांना होणारी लठ्ठपणाची समस्या यातील संबंधावर अभ्यास करण्यात आला.

(Image Credit : writeup.co.in)

द अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित ताज्या रिपोर्टनुसार, आधी करण्यात आलेल्या २८ रिसर्चमधील एकातही हे सिद्ध झालं नव्हतं की, लो-फॅट दूध सेवन करणाऱ्या लहान मुलांना लठ्ठपणाचा धोका कमी होतो. याच्या उलट २८ पैकी १८ रिसर्चमध्ये असं आढळून आलं की, फूल क्रीम दूध सेवन करणाऱ्या लहान मुलांमध्ये लठ्ठपणाचा धोका कमी राहतो. 

(Image Credit : verywellfamily.com)

या नव्या रिसर्चमधून लेटेस्ट इंटरनॅशनल गाइडलाइन्सला आव्हान दिल्याचं दिसतं. या गाइडलाईन्समध्ये लठ्ठपणाचा धोका कमी करण्यासाठी दोन वय असल्यापासून लहान मुलांना फूल क्रीमऐवजी लो-फॅट दूध देण्याचा सल्ला दिला जातो.

या रिसर्चचे मुख्य लेखक जॉनथन मॅग्वायर यांच्यानुसार, 'कॅनडा आणि अमेरिकेत जास्तीत जास्त मुले रोज गायीचं दूध सेवन करतात. यातून अनेकांना डायट्री फॅट मिळतं. आमच्या रिव्ह्यूमधून असं समोर आलं की, ज्या मुलांना नव्या गाइडलाईन्सचं पालन करत दोन वर्षाचे असतानापासून लो-फॅट दूध देण्यात आलं होतं, ती मुले फूल क्रीम दूध सेवन करणाऱ्यांपेक्षा बारीक नव्हते'.

अभ्यासक आता फूल क्रीम आणि याने लठ्ठपणाचा धोका कमी होण्याच्या संबंधावर क्लिनिकल ट्रायल करण्याचा प्लॅन करत आहेत. मॅग्वायर यांनी सांगितले की, 'आतापर्यंत जेवढे रिसर्च झाले ते ऑब्जर्वेशनवर आधारित होते. याचा अर्थ हा होतो की, आपण हे निश्चितपणे म्हणू शकत नाही की, फूल क्रीम दुधामुळे लठ्ठपणाचा धोका कमी झाला किंवा नाही. अशी शक्यता आहे की, फूट क्रीम दूध इतर कारकांशी जोडलेलं असेल ज्यामुळे लठ्ठपणाचा धोका कमी झाला असेल. ही बाब क्लिनिकल ट्रायल करून सिद्ध केलं जाऊ शकते'.


Web Title: Study says children who drink whole milk face lower odds of becoming obese

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.